केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्यासह
भाजप आणि शिवसेना यांच्या लोकप्रतिनिधींची ग्रंथप्रदर्शनाला भेट
नाशिक – येथील श्री काळाराम मंदिरात सनातन संस्थेने आयोजित केलेल्या ‘ग्रंथ सप्ताहा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सनातन संस्थेच्या वतीने श्री काळाराम मंदिर परिसरात आणि जिल्ह्यातील विविध ठिकाणी ‘ग्रंथ सप्ताहा’चे आयोजन केले होते. ‘ग्रंथ सप्ताहा’चा रामनवमीला समारोप करण्यात आला. या ‘ग्रंथ सप्ताहा’त सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित केलेले ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने ठेवण्यात आली होती. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील रामबाग श्रीराम मंदिरात लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी भेट दिली. तसेच शहरातील सुप्रसिद्ध श्री काळाराम मंदिरातील ग्रंथप्रदर्शनाला येथील शिवसेनेचे खासदार श्री. हेमंत गोडसे, भाजपचे आमदार श्री. बाळासाहेब सानप, भाजपचे श्री. लक्ष्मण सावजी आणि श्री. वसंत गीते यांनी भेटी दिल्या. अन्य काही मान्यवरांनी ग्रंथप्रदर्शनांना भेटी दिल्या.
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांच्याकडून ‘हिंदु राष्ट्र का हवे?’ या ग्रंथाची खरेदी
ग्रंथप्रदर्शनाला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी भेट दिली असता त्यांनी येथील अनेक ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने पाहिली. तसेच ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’ हा ग्रंथ खरेदी केला.