सनातन आश्रम आध्यात्मिक जगताची अनुभूती
देणारा ! – डॉ. मधुसूदन घाणेकर, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्योतिर्विद
रामनाथी, गोवा – सनातनच्या आश्रमात अनेक ठिकाणी सूक्ष्म गंध येतो आणि सकारात्मक स्पंदनेही जाणवली. आश्रम पहातांना दीड घंट्याच्या कालावधीत मी स्वत:ला विसरून गेलो. जराही थकवा जाणवला नाही. उत्साह वाटला. आश्रमात मला बरेच काही शिकता आले. आध्यात्मिक जग कसे असते, हे प्रत्यक्ष अनुभवता आले. आश्रमात आध्यात्मिक शक्ती जाणवली, असे गौरवोद्गार आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्योतिषी तथा पुणे येथील ज्येष्ठ ज्योतिर्विद डॉ. मधुसूदन घाणेकर (वय ६३ वर्षे) यांनी काढले. २६ मार्च या दिवशी डॉ. मधुसूदन घाणेकर आणि त्यांची पत्नी सौ. मेघना घाणेकर यांनी येथील सनातनच्या आश्रमास सदिच्छा भेट दिली. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते श्री. अरविंद पानसरे यांनी त्यांना आश्रमात चालणार्या राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या कार्याची माहिती दिली.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कार्यातील सहभाग
वर्ष २०१४ मध्ये रामनाथी येथे झालेल्या सहाव्या महिला ज्योतिष परिषदेत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या सौ. प्राजक्ता जोशी यांना विषय मांडण्याची संधी दिली होती. त्यानंतर डॉ. घाणेकर आणि काही ज्योतिषी यांनी आश्रमाला भेट दिली होती.
डॉ. मधुसूदन घाणेकर यांचा परिचय
१. डॉ. घाणेकर हे ज्येष्ठ ज्योतिषी आहेत. अनेक नियतकालिकांमधून त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना ‘ज्योतिष जीवन गौरव पुरस्कारा’ने गौरवण्यात आले आहे.
२. ध्यानाच्या एका अवस्थेपर्यंत ते जातात. (ज्याला ते ‘ब्रह्मध्यानाची अवस्था’ असे म्हणतात.)
३. ‘विश्वजोडो अभियाना’च्या अंतर्गत हास्ययात्रा, हास्यकविता, गाणी, स्वाक्षरीवरून स्वभाव, ‘फेस रिडिंग’, संमोहन, रेकी इत्यादी करतात. ‘पाणी वाचवा’, ‘विश्वावर प्रेम करा’, ‘प्राणीमात्रांवर प्रेम करा’, ‘गरीब-विकलांग यांना सहकार्य करा’, असा संदेश ते समाजापर्यंत पोचवतात.
४. त्यांनी जागतिक हास्य परिषद, जागतिक हस्ताक्षर, मनोविश्लेषक परिषद यांसह १० महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय परिषदांचे अध्यक्षपद भूषवले आहे. चित्रपट गीत, गझल लेखन, कथा-पटकथा-संवादलेखन यांसाठी, तसेच हास्यकवितांसाठी आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
५. अखिल भारतीय बहुभाषिक हास्य-कविसंमेलन (वर्ष २०००), पहिले विनोदी साहित्य संमेलन (वर्ष २००१), पहिले राज्य विद्युत साहित्य संमेलन (वर्ष २००२), मुलांचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (वर्ष २००२), अखिल भारतीय मराठी कविसंमेलन (वर्ष २००४), कवी केशवसुत शताब्दी स्मृती कविसंमेलन आदी महत्त्वाच्या १० साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद डॉ. घाणेकर यांनी भूषवले आहे.
६. डॉ. घाणेकर हे महिला ज्योतिर्विद, साहित्यगौरव, व्ही.आर्ट्स, ‘फ्रेंड्स इंटरनॅशनल हाहाहाऽऽ लाफ इंटरनॅशनल’, ‘हँडरायटिंग अॅनालिसिस रिसर्च फाऊंडेशन’, ‘युनिव्हर्सल अॅस्ट्रॉलॉजिकल फाऊंडेशन’, ‘दत्तोपासक कै. ताई घाणेकर शताब्दी समिती’ या संस्थांचे अध्यक्ष आहेत.
७. त्यांनी २०० हून अधिक पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांनी अनेक विश्वविक्रम केले आहेत. त्याची नोंद ‘लिम्का बूक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये झाली आहे.