
जळगाव, २४ मार्च – पाचोरा येथील रेल्वे स्थानक रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात २३ मार्च या दिवशी सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे आणि ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनास येथील शिवसेनेचे आमदार श्री. किशोर पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.
या वेळी श्री. किशोर पाटील म्हणाले, ‘‘लव्ह जिहादला प्रत्युत्तर देण्यासाठी तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंचे संघटन करा.’’ धर्मशिक्षणावर आधारित ग्रंथ पाहून त्यांनी ‘लव्ह जिहाद’च्या २०० ग्रंथांची मागणी केली. महाविद्यालयीन तरुणींपर्यंत हा विषय पोचवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या वेळी ‘आशिर्वाद इन्फ्रा’चे मुकुंदजी बिल्दीकर, लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहिल, जिल्हा परिषदेचे सदस्य रावसाहेब पाटील, पदमबापु पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, शहरप्रमुख किशोर बारवकर, युवासेना उपजिल्हा युवाधिकारी अजयकुमार जैस्वाल आदी उपस्थित होते.