पनवेल – देवद येथील सनातनच्या आश्रमात येण्याचे आणि आश्रम पहाण्याचे सौभाग्य मला मिळाले. सात्त्विक शक्तीचे केंद्रीय भूतपूर्व स्थान भारतच आहे. या सत्याला ओळखून सात्त्विक शक्तीचा जागर आणि त्या आधारावर धर्मबोध अन् शौर्यबोध या दोन्हींना जागृत करण्याचे सनातन संस्थेने हाती घेतलेले काम पुष्कळ स्तुत्य आहे, असे उद्गार देहली येथील ‘इटर्नल हिंदू फाऊंडेशन’चे संघरक्षक आणि मुख्य मार्गदर्शक श्री. के.एन्. गोविंदाचार्य यांनी काढले.
श्री. के.एन्. गोविंदाचार्य हे ‘इटर्नल हिंदू फाऊंडेशन’च्या एका कार्यक्रमानिमित्त पनवेल येथे ११ मार्च या दिवशी आले होते. त्यानिमित्ताने त्यांनी कार्यकर्त्यांसमवेत सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. सनातनचे ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. शिवाजी वटकर यांनी श्री. के.एन्. गोविंदाचार्य यांचा सन्मान करून ‘परात्पर गुरु डॉ. आठवलेजीके ओजस्वी विचार’ हा हिंदी ग्रंथ भेट दिला. या वेळी त्यांच्या समवेत ‘इटर्नल हिंदू फाऊंडेशन’चे कार्यकर्ते सर्वश्री संजय शर्मा, अरविंद तिवारी, अजय सिंग, प्रशांत कोळी, सौ. मंजुषा गोनरकर, सौ. स्मिता श्रीवास्तव, सौ. प्रद्या लाल आदी उपस्थित होते.
आश्रम पाहिल्यानंतर श्री. के.एन्. गोविंदाचार्य म्हणाले, ‘‘सनातन संस्थेचे कार्य हे भारतातील सध्या आणि येणार्या युगानुयुगांमध्ये प्रेरित आणि शिक्षित करण्यामध्ये यशस्वी होईल, असे मला वाटते. हा माझा विश्वास आहे. हे कार्य चालवणारे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु जयंत आठवले यांना मी वंदन करून शुभेच्छा देतो.’’
क्षणचित्रे…
१. श्री. के.एन्. गोविंदाचार्य हे आश्रम पहातांना साधकांची आदराने आणि आपुलकीने विचारपूस करत होते.
२. सनातनचे श्री. शिवाजी वटकर यांनी त्यांना सनातन आश्रमाच्या वतीने प्रसाद दिल्यानंतर त्यांनी तो कपाळाला लावून भावपूर्ण नमस्कार केला.