अनुक्रमणिका
अ. शिवाच्या पिंडीतून प्रक्षेपित होणारे तेज पेलवता येणे
आ. शिवाच्या पिंडीतून येणारा शक्तीचा झोत अधिक प्रमाणात कार्यरत होणे
इ. अशा प्रकारे केलेल्या मुद्रेमुळे शक्तीची स्पंदने संपूर्ण शरिरात पसरतात.
४. शृंगदर्शनामुळे होणारे सूक्ष्मातील लाभ दर्शवणारे चित्र
६. शृंगदर्शनाच्या सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रासंबंधीचे लिखाण टंकलिखित करतांना त्यासंदर्भात ज्ञान मिळणे
अ. शृंगदर्शनाविना शिवपिंडीचे दर्शन घेण्यासाठी आवश्यक असणारी व्यक्तीची आध्यात्मिक पातळी
आ. सामान्य व्यक्तीने शृंगदर्शनाविना दर्शन घेतल्यास तिच्यावर होणारे दुष्परिणाम
९. पिंडीला अर्धप्रदक्षिणा का घालावी ?
शिवाच्या पिंडीतून प्रक्षेपित होणारे तेज हे सर्वसामान्य पूजकाला पेलवणारे नसते, त्यामुळे शिवपिंडीचे दर्शन घेतांना ते नंदीच्या दोन्ही शिंगातून घ्यावे असे शास्त्र सांगते. शृंगदर्शनाविना शिवपिंडीचे दर्शन घेतल्याने होणारी हानी तसेच शृंगदर्शनामुळे पूजकाला होणारे लाभ यांविषयीचे शास्त्रीय विवेचन या लेखात केले आहे.
१. शृंगदर्शनाची योग्य पद्धत
वामहस्ती वृषण धरोनि ।
तर्जनी अंगुष्ठ शृंगी ठेवोनि ।। – श्री गुरुचरित्र, अध्याय ४९, ओवी ४४
सविस्तर अर्थ : नंदीच्या उजव्या अंगाला बसून किंवा उभे राहून डावा हात नंदीच्या वृषणावर ठेवावा. उजव्या हाताची तर्जनी (अंगठ्याच्या जवळचे बोट) आणि अंगठा नंदीच्या दोन शिंगांवर ठेवावे. दोन्ही शिंगे आणि त्यांवर ठेवलेली दोन बोटे यांच्यामधील पोकळीतून शिवलिंग न्याहाळावे.
२. शृंगदर्शनाचा भावार्थ
नंदीच्या वृषणाला हात लावणे म्हणजे, कामवासनेवर नियंत्रण ठेवण्यास शिकणे. शिंग हे अहंकार, पौरुष आणि क्रोध यांचे प्रतीक आहे. शिंगांना हात लावणे म्हणजे अहंकार, पौरुष आणि क्रोध यांवर नियंत्रण ठेवायला शिकणे.
३. शृंगदर्शनाचे लाभ
अ. शिवाच्या पिंडीतून प्रक्षेपित होणारे तेज पेलवता येणे
शिवाच्या पिंडीतून प्रक्षेपित होणारे तेज सहसा सर्वसामान्य व्यक्तीला न पेलवणारे असते. नंदीच्या शिंगांतून प्रक्षेपित होणार्या शिवतत्त्वाच्या सगुण मारक लहरींमुळे व्यक्तीच्या शरिरातील रज-तम कणांचे विघटन होऊन व्यक्तीची सात्त्विकता वाढण्यास साहाय्य होते. त्यामुळे शिवाच्या पिंडीतून बाहेर पडणार्या शक्तीशाली लहरी पेलवणे व्यक्तीला शक्य होते. नंदीच्या शिंगांतून दर्शन न घेताच शिवाचे दर्शन घेतल्यास तेजाच्या लहरींचा आघात झाल्याने शरिरात उष्णता निर्माण होणे, डोके बधीर होणे, शरिराला अचानक कंप सुटणे यांसारखे त्रास होऊ शकतात.
आ. ‘शिवाच्या पिंडीतून येणारा शक्तीचा झोत अधिक प्रमाणात कार्यरत होणे
उजव्या हाताची तर्जनी आणि अंगठा नंदीदेवाच्या शिंगांवर टेकवल्याने निर्माण होणार्या मुद्रेमुळे भाविकांना आध्यात्मिक स्तरावर अधिक लाभ होतो. नळीमधून वारा सोडला असता त्याचा वेग आणि तीव्रता अधिक असते, तर याउलट पंख्याचा वारा सर्वत्र पसरतो. वरील मुद्रेमुळे नळीप्रमाणे कार्य होत असल्याचे जाणवते. या मुद्रेमुळे शिवाच्या पिंडीतून येणारा शक्तीचा झोत अधिक प्रमाणात कार्य करतो.
इ. अशा प्रकारे केलेल्या मुद्रेमुळे शक्तीची स्पंदने संपूर्ण शरिरात पसरतात.
– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था
४. शृंगदर्शनामुळे होणारे सूक्ष्मातील लाभ दर्शवणारे चित्र
खालील सूक्ष्म-चित्र मोठे करून पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा !
५. इतर सूत्रे
अ. नंदी हे शिवाचे वाहन असल्याने नंदीच्या शृंगांमध्ये शिवाची अप्रकट क्रियाशक्ती सामावलेली असते.
आ. शृंगदर्शन घेतांना व्यक्तीच्या देहावरील काळ्या शक्तीचे विघटन होते आणि मनातील अयोग्य विचार नष्ट होतात, तसेच तिची बुद्धीही शुद्ध होते.
इ. शिवाच्या पिंडीतून प्रक्षेपित होणारी स्पंदने सामान्य व्यक्तीला सहन होणारी नसतात. शृंगदर्शनामुळे ती सहज ग्रहण होतात.
ई. शृंगदर्शनामुळे व्यक्तीचा भाव जागृत होतो आणि ती शिवपिंडीचे प्रत्यक्ष दर्शन घेते, त्या वेळी तिच्यातील आत्मशक्ती (काही क्षणांसाठी) जागृत होते, तसेच तिचे ध्यानही लागते.
– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था. (अधिक वैशाख शु. १२, कलियुग वर्ष ५११२, २५.४.२०१०)
६. शृंगदर्शनाच्या सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रासंबंधीचे लिखाण
टंकलिखित करतांना त्यासंदर्भात ज्ञान मिळणे
अ. शृंगदर्शनाविना शिवपिंडीचे दर्शन घेण्यासाठी आवश्यक असणारी व्यक्तीची आध्यात्मिक पातळी
श्री. राम होनप
किती टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधकाला शृंगदर्शन घेतल्याविना शिवाच्या पिंडीतून प्रक्षेपित होणारी स्पंदने सहज ग्रहण होतात ?
उत्तर
व्यष्टी साधना करणार्यासाठी ५५ टक्के, तर समष्टी साधना करणार्यासाठी ४५ टक्के पातळीला शृंगदर्शन घेतल्याविना शिवाच्या पिंडीतून प्रक्षेपित होणारी स्पंदने सहज ग्रहण होतात.
आ. सामान्य व्यक्तीने शृंगदर्शनाविना दर्शन घेतल्यास तिच्यावर होणारे दुष्परिणाम
१. शारीरिक
अ. ‘शरिरातील उष्णता वाढणे
आ. उष्णतेमुळे होणारे विकार होणे (सामान्य व्यक्तीने सातत्याने ६ मास अशा पद्धतीने दर्शन घेतल्यास हा त्रास होतो.)
२. मानसिक
अ. मनाची अस्वस्थता वाढणे
आ. दर्शन घेतल्यामुळे मनाला मिळणारे समाधान न मिळणे
३. आध्यात्मिक
अ. या स्तरावर होणारा लाभ अल्प प्रमाणात होणे
आ. सामान्य व्यक्तीला शिवाची शक्ती न पेलवल्यास त्या त्रासात टिकून रहाण्यासाठी त्या व्यक्तीची साधना वापरली जाणे’
– श्री. राम होनप, सनातन संस्था, अधिक वैशाख शु. १२, कलियुग वर्ष ५११२, २५.४.२०१०, रात्री ८ वाजता
७. पिंडीचे प्रत्यक्ष दर्शन घेतांना पिंडी आणि नंदी यांच्यामध्ये
उभे न रहाता किंवा न बसता, पिंडी अन् नंदी यांना जोडणार्या रेषेच्या शेजारी (बाजूला) उभे रहाणे
शिवाकडून येणार्या शक्तीशाली सात्त्विक लहरी प्रथम नंदीकडे आकृष्ट होऊन नंतर नंदीकडून वातावरणात प्रक्षेपित होत असतात. नंदीचे वैशिष्ट्य म्हणजे नंदीकडून या लहरी आवश्यकतेप्रमाणेच प्रक्षेपित होत असतात. त्यामुळे पिंडीचे दर्शन घेणार्याला प्रत्यक्षात शिवाकडून लहरी मिळत नाहीत; त्यामुळे त्याला शिवाकडून येणार्या शक्तीशाली लहरींचा त्रास होत नाही. येथे लक्षात घ्यायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शिवाकडून येणार्या लहरी सात्त्विकच असल्या, तरी सर्वसाधारण व्यक्तीची आध्यात्मिक पातळी अधिक नसल्याने त्या सात्त्विक लहरी सहन करण्याची क्षमता तिच्यात नसते़ त्यामुळे त्या लहरींचा तिला त्रास होऊ शकतो. या कारणासाठीच सर्वसाधारण व्यक्तीने पिंडीचे दर्शन घेतांना पिंडी आणि नंदी यांच्यामध्ये उभे न रहाता किंवा न बसता, पिंडी अन् नंदी यांना जोडणार्या रेषेच्या शेजारी उभे रहावे.
(वरील तत्त्वानुसार श्रीविष्णु इत्यादी देवतांच्या देवळांत देवतेची मूर्ती आणि तिच्यासमोर असणारी कासवाची प्रतिकृती यांच्यामध्ये उभे राहून किंवा बसून देवतेचे दर्शन घेऊ नये. दर्शन घेऊ इच्छिणार्याने कासवाच्या प्रतिकृतीच्या शेजारी उभे राहून दर्शन घ्यावे.)
५० टक्क्यांपेक्षा अधिक पातळी असलेल्या भक्तात देवाकडून येणार्या सात्त्विक लहरी सहन करण्याची क्षमता असते आणि त्यामुळे त्या लहरींचा त्याला त्रास होत नाही. अशा भक्ताने देवाचे दर्शन समोरूनच घ्यावे. यामुळे त्याला देवतेकडून प्रक्षेपित होणार्या लहरी सहजपणे ग्रहण करता येतात.
८. शिवपिंडीचे दर्शन घेतांना पिंडी आणि नंदी
यांच्यामध्ये उभे राहून दर्शन घेतल्याने होणारे सूक्ष्मातील परिणाम
खालील सूक्ष्म-चित्र मोठ्या आकारात पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा !
९. पिंडीला अर्धप्रदक्षिणा का घालावी ?
शिवाच्या पिंडीला प्रदक्षिणा घालतांना शिवपिंडीच्या समोर उभे राहिल्यावर उजवीकडे अभिषेकाच्या पाण्याची पन्हाळी (शाळुंकेचा पुढे नेलेला स्रोत) असते. प्रदक्षिणेचा मार्ग तेथून चालू होतो. प्रदक्षिणा घालतांना पन्हाळीपासून स्वतःच्या डाव्या बाजूने पन्हाळीच्या दुसर्या कडेपर्यंत जावे. मग पन्हाळी न ओलांडता परत फिरावे आणि पुन्हा पन्हाळीच्या पहिल्या कडेपर्यंत येऊन प्रदक्षिणा पूर्ण करावी. शाळुंकेच्या स्रोतातून शक्ती बाहेर पडत असल्याने सर्वसाधारण भाविकाने तो स्रोत वारंवार ओलांडल्यास त्याला शक्तीचा त्रास होऊ शकतो; म्हणून शिवपिंडीला अर्धप्रदक्षिणाच घालावी. स्वयंभू किंवा घरातील लिंगास हा नियम लागू नाही.
१०. शिवपूजेतील काही विधीनिषेध
पांढर्या अक्षता (धुतलेले अखंड तांदूळ) आणि फुले वहा !
अक्षतांकडे निर्गुण ईश्वरी तत्त्वाशी संबंधित उच्च देवतांच्या लहरी आकर्षिल्या जातात; म्हणून अधिकाधिक निर्गुणाशी संबंधित असलेल्या शिवाला त्याच्या पांढर्या रंगाशी साधर्म्य असलेल्या पांढर्या रंगाच्या अक्षता वहा. त्याचप्रमाणे शाळुंकेला निशिगंध, जाई, जुई, मोगरा यांसारखी पांढरी फुले १० किंवा १० च्या पटीत त्यांचे देठ पिंडीकडे करून वहावीत.
उदबत्ती आणि अत्तर वापरा !
उदबत्ती आणि अत्तर यांतून प्रक्षेपित होणार्या गंधलहरींकडे देवतांच्या लहरी लवकर आकृष्ट होतात; म्हणून शिवपूजेत केवडा, चमेली किंवा हीना या शिवाला प्रिय असणार्या गंधांच्या उदबत्त्यांनी तीन वेळा ओवाळावे आणि केवड्याचे अत्तर वापरावे.
हळद-कुंकू वाहू नये !
हळद-कुंकू उत्पत्तीचे प्रतीक आहे; म्हणून लयाची देवता असलेल्या शिवाला हळद-कुंकू वाहू नये.
शिवाला वाहिलेला बेल इत्यादी अग्राह्य !
शिव वैराग्यदायी आहे. शिवाला अर्पण केलेले ग्रहण केल्यास वैराग्य येऊ शकते.