आचार्य महामंडलेश्वर अनंत श्री विभूषित स्वामी
अवधेशानंदगिरीजी महाराज यांची सनातन संस्थेच्या वतीने सदिच्छा भेट !
प्रयागराज (कुंभनगरी) – हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने जुना आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर अनंत श्री विभूषित स्वामी अवधेशानंदगिरीजी महाराज यांची १५ फेब्रुवारी या दिवशी सदिच्छा भेट घेण्यात आली. या वेळी समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी महाराजांचा सन्मान करून त्यांना शाल आणि ‘अध्यात्म विश्वविद्यालय’ हा ग्रंथ भेट दिला. या प्रसंगी सनातन संस्थेचे धर्मप्रसारक पू. प्रदीप खेमका, त्यांच्या धर्मपत्नी पू. (सौ.) सुनिता खेमका आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस उपस्थित होते. या वेळी महाराजांना रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला भेट देण्याचे निमंत्रण देण्यात आले. त्यावर ‘‘सनातन संस्था धर्माचे असाधारण कार्य करत आहे. गोवा भेटीत मी नक्कीच आपल्या आश्रमात येईन’’, असे महाराज म्हणाले. महाराजांनीही सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचा माळ घालून सन्मान केला.
सनातन संस्थेच्या आसामी भाषेतील ‘धर्मशिक्षा फलक’ ग्रंथाचे प्रकाशन !
या वेळी आचार्य महामंडलेश्वर अनंत श्री विभूषित स्वामी अवधेशानंदगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते सनातनच्या आसामी भाषेतील ‘धर्मशिक्षा फलक’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.