प्रयागराज (कुंभनगरी) – कुंभमेळ्यात माझ्या कार्यक्रमानंतर मला ग्रंथ आणि धर्मशिक्षण फलक प्रदर्शन पहाण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. सध्याच्या काळात सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी संकलित केलेले ग्रंथ म्हणजे मोठे खाद्य आहे; कारण हे ग्रंथ वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर, पाहिल्यानंतर पूर्ण भारताची काया पालटू शकतील, असे मला वाटते. या प्रदर्शनाचे मी कौतुक करतो, असे प्रतिपादन पंजाबच्या पठाणकोट येथील प्रवचनकार आचार्य सतीश शास्त्री यांनी ८ फेब्रुवारी या दिवशी येथे केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथे लावण्यात आलेले ‘ग्रंथ आणि धर्मशिक्षण फलक’ प्रदर्शन पाहिल्यानंतर ते बोलत होते.
आचार्य सतीश शास्त्री म्हणाले की,
१. भारत हा ऋषि आणि कृषी परंपरा, सनातन सिद्धांत, आपली मर्यादा, गौरव यांनी जोडलेला आहे; मात्र दुर्भाग्याने हिंदु समाजाने सनातन संस्कृती आणि धर्मशिक्षण यांसह आयुर्वेद यांना सोडचिठ्ठी दिली आहे.
२. ऋषिमुनींनी हिंदूंना पुष्कळ प्रसाद दिला आहे. त्यांनी अनेक विषयांत प्रचंड अन्वेषण केले आहे.
३. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यासारख्या संतांनी आपल्याला एवढे ज्ञान दिले आहे की, आपल्या झोळीतून ते पुष्कळ प्रमाणात बाहेर पडते, तरी दुर्भाग्याने आपली दृष्टी पाश्चात्त्य संस्कृतीकडे वळते.
४. कुंभमेळ्यातील आनंद येथेच पहायला मिळत आहे, असे मला वाटते. हा कुंभचा घडा भरण्यासाठी सनातनच्या ग्रंथांतील माहिती पुरेशी आहे.
५. हिंदु जनजागृती समितीचे उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ आणि ओडिशा राज्याचे समन्वयक श्री. प्रकाश मालोंडकर यांनी कुशल नेतृत्वाद्वारे हे प्रदर्शन लावले आहे.
६. देशात असे प्रदर्शन १०० ठिकाणी लावले, तर १२५ कोटी जनतेचे चित्र पालटू शकते. मी काहीही अतिरिक्त बोलत नाही, तर वर्तमानातील परिस्थितीनुसार मी बोलत आहे.
पठाणकोट (पंजाब) येथे प्रदर्शन लावण्यासाठी मी प्रयत्न करीन ! – आचार्य सतीश शास्त्री
‘प्रयागराज येथे कुंभमेळ्यात येणार्या सर्व भाविकांना मी आवाहन करतो की, प्रत्येकाने हे प्रदर्शन पाहिल्यास त्यांना अनादि काळापासून चालत आलेली भारतीय, ऋषि आणि सनातन परंपरा यांचे स्मरण होईल. हे प्रदर्शन पठाणकोट पंजाब येथे लावण्यासाठी प्रयत्न करतो. याच्यापेक्षा मनुष्याला आणखी दुसरी कोणती सेवा नाही. आपण या प्रदर्शनाच्या माध्यमातून स्वदेशाचा प्रचार करत आहात. यातून आपण पाश्चात्त्य संस्कृतीला बाहेर घालवत आहात. एखाद्या झाकणाप्रमाणे हिंदूंवर आवरण आले आहे, ते आवरण काढण्याचे कार्य हे प्रदर्शन करत आहे. राष्ट्रासह पूर्ण विश्वात या प्रदर्शनाची माहिती पसरू दे, अशी मी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो.’