प्रयागराज (कुंभनगरी) – देशात लव्ह जिहादच्या घटना वाढत आहेत, हा चिंताजनक विषय आहे, असे प्रतिपादन वाराणसी येथील श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे महंत श्री सोमेश्वरगिरी श्रीमंत रामानंदगिरी महाराज यांनी नुकतेच येथे केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेले ग्रंथ आणि धर्मशिक्षणफलक प्रदर्शन यांना भेट दिल्यानंतर ते बोलत होते. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी त्यांचा पुष्पहार घालून आणि ‘देवनदी गंगा की रक्षा करे’ हा ग्रंथ देऊन सन्मान केला. या प्रसंगी त्यांच्या सोबत असलेले महंत श्री पूर्णागिरी महाराज, महंत श्री कैलासगिरी महाराज, महंत श्री देवनगिरी बापू महाराज, महंत श्री सहजानंदगिरी महाराज आणि महंत श्री गुरुकाशीगिरी महाराज यांचाही सन्मान करण्यात आला.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट उपस्थित होते.
गोहत्या, धर्मांतर, धर्म आणि संतांवर होणारे आघात रोखण्यासाठी समितीने हाती घेतलेले कार्य महत्त्वाचे आणि कौतुकास्पद आहे. असे कार्य अन्य संघटनांनी करण्याची आवश्यकता आहे. समितीच्या कार्याला आमच्या शुभेच्छा आहेत, असे महंत श्री सोमेश्वरगिरी श्रीमंत रामानंदगिरी महाराज यांनी या वेळी सांगितले.