कुंभमेळा प्रयागराज २०१९
प्रयागराज (कुंभनगरी) – हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणफलक प्रदर्शनातून कुंभपर्वात आलेल्या भाविकांना उत्तम मार्गदर्शन मिळत आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हे प्रदर्शन पुष्कळ छान बनवले आहे. धर्मशिक्षणाचे हे प्रदर्शन पाहून छान वाटले, असे कौतुकोद्गार दक्षिण पीठ रत्नागिरी येथील नाणीजधामचे जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी येथे केले. कुंभनगरी येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने लावण्यात आलेल्या ग्रंथ अन् धर्मशिक्षणफलक प्रदर्शनाला ८ फेब्रुवारी या दिवशी ते भेट दिल्यावर बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे उत्तर-पूर्व भारत मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ आणि सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनी जगद्गुरु स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांना सर्व प्रदर्शन दाखवले.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कार्याची माहिती दिल्यावर जगद्गुरु स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी या कार्याची नितांत आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. जगात कोणत्या पंथाची किती राष्टे्र आहेत, याची माहिती देणारा तक्ता पाहिल्यावर त्याचे छायाचित्र काढण्याविषयी जगद्गुरु स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी त्यांच्यासमवेत आलेल्या छायाचित्रकाराला सांगितले. ‘जगात एकही हिंदु राष्ट्र नाही, हे मीदेखील माझ्या मार्गदर्शनातून सांगेन’, असे जगद्गुरु स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी या वेळी सांगितले.