
वर्धा, १ फेब्रुवारी (वार्ता.) : सनातन संस्थेच्या वतीने जानेवारी २०१९ मध्ये वर्धा जिल्ह्यात विविध ठिकाणी सनातनच्या धर्मरथातील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. पुलगाव, हिंंगणघाट, सेलू, सिंदी, आर्वी आणि देवळी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समाजात सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांद्वारे धर्मचैतन्य पसरवून रज-तम न्यून करणार्या या धर्मरथ प्रदर्शनाला १३ जानेवारी या दिवशी पुलगाव येथून प्रारंभ करण्यात आला. पुलगाव येथे श्री. राकेश आणि सौ. कोमल शर्मा, सेलू येथे श्री. प्रशांत देवतारे, सिंदी (रेल्वे) येथे नगराध्यक्षा सौ. संगीता शेंडे, तर देवळी येथे श्री. मोहनबाबू अग्रवाल यांच्या हस्ते धर्मरथ प्रदर्शनाचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये सनातन संस्थानिर्मित अध्यात्म, राष्ट्र, धर्म, स्वरक्षण, आयुर्वेद आदी विषयांवरील ग्रंथांचा समावेश होता.