प्रयागराज (कुंभनगरी) येथील सनातन संस्थेच्या प्रदर्शनाला संत-महंतांची भेट
प्रयागराज (कुंभनगरी) – जगात अन्य धर्मियांची राष्ट्रे आहेत; परंतु हिंदूंचे कोणतेही राष्ट्र नाही, ही दु:खाची गोष्ट आहे. भारत हिंदु राष्ट्र बनले पाहिजे. यासाठी सरकारकडे मागणी केली पाहिजे, असे प्रतिपादन श्री महंत हरिहरानंद भारतीजी महाराज यांनी प्रयागराज येथे केले. ते येथे सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर बोलत होते. श्री महंत हरिहरानंद भारतीजी महाराज हे गिरनार-जुनागढ, श्री भारती आश्रम, श्री पंच दशनाम जुना आखाडा येथील आहेत. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी त्यांचा सत्कार केला. या वेेळी श्री महंत हरिहरानंद भारतीजी महाराज म्हणाले, ‘‘हे प्रदर्शन पाहून आनंद वाटला. गोमाता हे हिंदु धर्माचे प्रतीक असून ते आपले श्रद्धाकेंद्र आहे. त्यामुळे गोहत्या बंद झाली पाहिजे. यासाठी देशातील पशूवधगृहे बंद झाले पाहिजेत. सनातन संस्थेने यासाठी चालवलेले अभियान चांगले आहे.’’