प्रयागराज (कुंभनगरी) – सनातनचे प्रदर्शन पाहून प्रसन्नता मिळाली. हे ग्रंथप्रदर्शन पाहून माझी भावजागृती झाली. सनातन धर्माला वाचवण्याचे मोठे कार्य सनातनचे साधक करत आहेत. आपण सर्व मिळून सनातन धर्माचे कार्य केले पाहिजे. मला केव्हाही बोलवा, मी तुम्हाला सहकार्य करीन. एकदा मी तुम्हाला माझ्या गोशाळेत घेऊन जातो, असे मार्गदर्शन गुजरात राज्यातील नवसारी येथील ‘श्रीकृष्ण कामधेनू गोशाळा’ आणि ‘माँ शाकंभरी आश्रम’ यांचे स्वामी श्री धर्मदास महाराज यांनी सनातनचे ग्रंथप्रदर्शन पाहून केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी स्वामी धर्मदास महाराज यांचा सन्मान करून संवाद साधला.
सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी स्वामी श्री धर्मदास महाराज यांचा पुष्पहार घालून सन्मान केला. महाराजांनी ‘सनातन धर्माचे तुम्ही खरे कार्य करत आहात’, असे म्हणत गळ्यातील पुष्पहार काढून पुन्हा तो सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांना घातला.