
प्रयागराज (कुंभनगरी) – सनातनचे ग्रंथप्रदर्शन एकदम सुंदर आहे. तुम्ही साधूंपेक्षाही श्रेष्ठ कार्य करत आहात. सर्व साधूंनी जर अशा पद्धतीने धर्मकार्य केले, तर हिंदु राष्ट्र सहज निर्माण होईल. बरेचजण स्वतःचा संप्रदाय आणि पंथ वाढवण्यासाठी कार्य करतात; मात्र तुम्ही (सनातन) केवळ हिंदु धर्मासाठी कार्य करत आहात, असे प्रतिपादन त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथील पू. फरशीवालेबाबा यांनी २४ जानेवारी या दिवशी येथे केले. या वेळी महामंडलेश्वर ईश्वर चर्हाटे महाराजही उपस्थित होते.
पू. फरशीवालेबाबा यांनी सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिल्यावर सनातनच्या कार्याचे कौतुक केले. या वेळी त्यांनी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांच्याशी राष्ट्र अन् धर्म कार्य यांविषयी संवादही साधला. सनातनचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनी पू. फरशीवालेबाबा यांना ग्रंथप्रदर्शनाची सविस्तर माहिती दिली.