कुंभ मेळा प्रयागराज २०१९
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने प्रयागराज येथे पहिल्या राजयोगी स्नानाच्या वेळी कुंभमेळ्याचे महत्त्व आणि शास्त्र फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून समिती अन् संस्थेच्या दर्शकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला. त्याला उपस्थित साधू-संत तथा भाविक यांनी प्रतिसाद दिला.
पहाटेच्या वेळी कडाक्याची थंडी असतांनाही हे फेसबूकचे थेट प्रक्षेपण करण्यात आले, तर काही चित्रफिती सिद्ध करून त्या फेसबूकवरून प्रसारित करण्यात येणार आहेत.

