- सनातनच्या ‘सात्त्विक वेशभूषा’ या ग्रंथमालिकेतील नूतन ग्रंथ प्रकाशित !
- सध्या संन्यासी अथवा शक्तीमार्गी नेसत असलेले लुंगीसारखे भगवे वस्त्र हेही सध्याच्या काळासाठी अयोग्य !
- आतापर्यंत पृथ्वीवर कोठेही उपलब्ध नसलेले अध्यात्मशास्त्रीय ज्ञान अंतर्भूत !
ग्रंथाचे संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले
सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक : श्री. निषाद देशमुख आणि श्री. राम होनप
ग्रंथाचे मनोगत
‘दक्षिण भारतियांना ‘मुंडू (लुंगीसारखे वस्त्र)’ या त्यांच्या पारंपरिक वेशभूषेचा विशेष अभिमान आहे. खरे पहाता ऋषिमुनींच्या काळापासून चालत आलेली हिंदूंची वेशभूषा ‘धोतर’ ही हिंदूंची प्राचीन परंपरा असून ते हिंदु संस्कृतीचे एक अविभाज्य अंगच आहे. पाश्चात्त्यांचे अंधानुकरण, धर्मशिक्षणाचा अभाव आदी कारणांमुळे धोतर नेसण्याची हिंदूंची प्राचीन संस्कृती हळूहळू र्हास पावत चालली असून मुंडू नेसण्याची प्रथा हिंदूंनी स्वीकारली आहे. आजच्या ‘फॅशन’च्या जगात ‘धोतर नेसणे’, हे मागासलेपणाचे लक्षणही मानले जाते; कारण ‘धोतर हे केवळ शेतकरी आणि पुरोहित यांनी नेसायचे वस्त्र आहे’, अशी लोकांची भ्रामक कल्पना झालेली आहे. बर्याच हिंदूंना धोतर नेसणे कठीण वाटते किंवा ते नेसायचा कंटाळाही येतो. एखादे अनुष्ठान किंवा धार्मिक विधी करतांना अथवा देवळात जातांनाही बरेच हिंदू धोतर नेसायला सिद्ध नसतात.
‘मुंडू नेसणे’, हे असात्त्विक असून मुंडू नेसलेल्या व्यक्तीकडे सूक्ष्मातील वाईट शक्ती आकृष्ट होतात अन् त्यामुळे व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांना सामोरे जावे लागते. मुंडू नेसण्यास धर्मशास्त्राचीही अनुमती नाही. याउलट ‘धोतर परिधान करणे’, हे सात्त्विक असून ते नेसल्याने ईश्वरी चैतन्य ग्रहण होते आणि धर्मपालनही होते. प्रस्तुत ग्रंथात या सर्वांमागील अध्यात्मशास्त्र विशद केले आहे. ‘सध्या संन्यासी अथवा शक्तीमार्गी नेसत असलेले ‘लुंगीसारखे भगवे वस्त्र’ हेही सध्याच्या काळासाठी अयोग्य कसे आहे’, यामागील अध्यात्मशास्त्रही ग्रंथात सांगितले आहे.
सध्याच्या विज्ञानयुगातील पिढीला प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक चाचणीद्वारे, म्हणजे यंत्राने सिद्ध करून दाखवली, तरच ती खरी वाटते. त्यामुळे ‘मुंडू असात्त्विक असून धोतर सात्त्विक आहे’, हे सिद्ध करणार्या ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने केलेल्या वैज्ञानिक चाचण्याही ग्रंथात दिल्या आहेत. हाही या ग्रंथाचा एक आगळावेगळा पैलू आहे.
‘हा ग्रंथ वाचून ‘धोतर नेसणे’ या हिंदु संस्कृतीतील वेशभूषेविषयीच्या एका महत्त्वाच्या आचाराविषयी वाचकांचा अभिमान वाढो, तसेच ईश्वरी चैतन्य प्राप्त करण्यासाठी त्यांनी धोतर नेसण्यास आरंभ करो’, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !’ – संकलक
१. मुंडू (मुंड, लुंगीसारखे वस्त्र)
मुंडू सुती किंवा रेशमी असते. ते पांढरे, भगवे अथवा फिकट पिवळ्या रंगाचे असते. ते गोल शिवलेले नसते. मुंडूला बारीक सोनेरी किंवा रंगीत किनार असते. त्याची लांबी धोतरापेक्षा अल्प असते. सर्वसाधारणतः दक्षिण भारतातील पुरुष धार्मिक विधीच्या वेळी रेशमाचे मुंडू आणि दैनंदिन व्यवहारात सुती मुंडू वापरतात.
१ अ. मुंडू नेसणे, हे हिंदूंच्या धर्मग्रंथांनुसार अयोग्य असणे
१ अ १. कासोटा न खोचता वस्त्र नेसणे, ही असुरांची पद्धत असणे
वस्त्राच्या, उदा. धोतराच्या निर्या काढून तो भाग कटीच्या (कंबरेच्या) मागच्या बाजूला खोचणे, याला ‘कासोटा (काष्टा) खोचणे’ असे म्हणतात.
परिधानाद् बहिः कक्षा निबद्धा ह्यासुरी भवेत् । – याज्ञवल्क्यस्मृति
अर्थ : गोल गुंडाळलेल्या वस्त्राचा कासोटा बाहेर सोडणे (म्हणजे कासोटा मागे न खोचता वस्त्र नेसणे), ही असुरांची पद्धत आहे.
१ आ. मुंडू नेसण्याचे दुष्परिणाम
१ आ १. लिंग आणि गुदद्वार यांतून संक्रमित होणार्या रज-तम लहरी किंवा देहातील टाकाऊ वायू आणि मल-मूत्र यांमुळे मुंडूची पोकळी त्रासदायक शक्तीने भारित होऊन पाताळातील त्रासदायक लहरी आकर्षित होणे
‘मुंडू नेसल्याने पुरुषांच्या पायांभोवती पोकळी निर्माण होते. मुंडू पोटावर बांधले जात असल्याने लिंग आणि गुदद्वार यांतून संक्रमित होणार्या रज-तम लहरी किंवा देहातील टाकाऊ वायू आणि मल-मूत्र यांमुळे मुंडूची पोकळी त्रासदायक शक्तीने भारित होऊन पाताळातील त्रासदायक लहरी आकर्षित करण्याचे कार्य करते. मुंडूच्या पोकळीत निर्माण झालेल्या पाताळातील त्रासदायक लहरी मूलाधारचक्र ते मणिपुरचक्र या भागात प्रसरण पावून जिवाला पाताळातील त्रासदायक शक्तीने भारित करते. यामुळे मुंडू नेसणे हिंदु धर्मात निषिद्ध आहे.
१ आ २. मुंडूतून मायावी शक्ती प्रक्षेपित होणे
वस्त्राच्या (उदा. धोतराच्या) निर्यांमुळे ग्रहण होणार्या सात्त्विक लहरी नाभीस्थळी घनीभूत होतात. वस्त्राला (उदा. पायजमा, परकर यांना) गाठ मारल्यामुळेही सात्त्विक लहरी नाभीस्थळी घनीभूत होतात, तसेच वस्त्राच्या पोकळीतून आकर्षित होणारी त्रासदायक शक्तीही अडवली जाते. याउलट मुंडूला नाडीची गाठ नसल्याने त्याच्या पोकळीतून आकर्षित होणारी त्रासदायक शक्ती कोणत्याही माध्यमातून अडवली न गेल्यामुळे व्यक्तीच्या कुंडलिनीचक्रांवर दुष्परिणाम होतो. मुंडूत पाताळातील त्रासदायक शक्ती आकर्षित होत असल्याने त्याच्या माध्यमातून अन्य जीव आणि वायूमंडल यांवर मायावी शक्ती प्रक्षेपितही केली जाते. यामुळे काही संतांनाही मुंडूतील मायावी शक्तीमुळे त्याचा वापर करणे चांगले वाटते.’
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.३.२०१८)
१ इ. सहावारी साडीमुळे पायांच्या ठिकाणी पोकळी निर्माण
होत असली, तरी सहावारी साडी सात्त्विक असण्यामागील कारण
‘घागरा, सहावारी साडी, मुंडू इत्यादी वस्त्रे उंचीला लांब असून त्यांचा मोठा घेर निर्माण होत असल्याने पायाभोवती पोकळी निर्माण होते. त्यामुळे सूक्ष्मातून पायापर्यंतच्या वस्त्रांमध्ये शक्ती कार्यरत ठेवली जाते आणि वस्त्रात जी शक्ती कार्यरत असेल तीच आकर्षित केली जाते, उदा. सहावारी साडीत ईश्वरी शक्ती असल्याने पोकळीत निर्गुण तत्त्व, तर मुंडूमध्ये त्रासदायक शक्ती असल्याने त्याच्या पोकळीत पाताळातील त्रासदायक शक्ती आकर्षित होतेे.’
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१०.२०१७ आणि २०.१०.२०१७)
२. धोतर
धोतर नेसणे, ही हिंदूंची प्राचीन परंपरा असून ते हिंदु संस्कृतीचे एक अविभाज्य अंगच आहे.
२ अ. धोतर नेसणे, हे हिंदु धर्मानुसार असणे
२ अ १. हिंदूंच्या प्राचीन धर्मग्रंथात धोतर नेसण्याविषयी असलेला उल्लेख
२ अ १ अ. ‘कासोटा असलेले वस्त्र (उदा. धोतर) नेसणे’, हे पावित्र्यदर्शक असणे
वस्त्राच्या, उदा. धोतराच्या निर्या काढून तो भाग कटीच्या (कंबरेच्या) मागच्या बाजूला पाठीच्या कण्यापाशी खोचणे, याला ‘कासोटा (काष्टा) खोचणे’ असे म्हणतात.
वामे पृष्ठे तथा नाभौ कक्षत्रयमुदाहृतम् ।
एभिः कक्षैः परीधत्ते यो विप्रः स शुचिः स्मृतः ॥
– बौधायनस्मृति
अर्थ : डावीकडे (पोटाच्या डावीकडे), मागे (पाठीच्या कण्यापाशी) आणि समोर नाभीकडे, या तिघांना ‘कक्षात्रय’ किंवा ‘त्रिकक्ष’ असे म्हणतात. जो विप्र (विद्यासंपन्न ब्राह्मण) (कमीतकमी) या तीन ठिकाणी वस्त्र खोचतो (धोतर नेसतो), तो पवित्र मानला जातो.
२ आ. धोतर नेसण्याचे महत्त्व
‘गृहस्थाश्रमी जिवांची आध्यात्मिक पातळी अधिक नसल्यास त्यांचा देह रज-तम प्रधान असतो. जिवाच्या पोटात असणारे मल-मूत्र आणि टाकाऊ ऊर्जा यांमुळे पोट ते लिंग हा देहाचा भाग अधिक प्रमाणात रज-तम प्रधान असतो. धोतर नाभीवर म्हणजे मणिपुरचक्रावर बांधले जाते. धोतर देहाला स्पर्श करून, तसेच देहाला एकदम चिकटून नेसलेले असल्याने देहातून प्रक्षेपित होणारे रज-तम धोतरातील सत्त्वगुणामुळे नष्ट होतात आणि धोतरामुळे देहाची सात्त्विकता वाढण्यास साहाय्य होते.’
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.३.२०१८)
२ इ. धोतर नेसल्याने होणारे काही लाभ
२ इ १. पचनक्रिया चांगली होण्यास साहाय्य होणे
‘धोतर नेसल्याने मणिपुरचक्रावर दाब निर्माण होऊन पचनक्रिया चांगली होण्यास साहाय्य होते.’ – श्री. जी. अरुकुमार शिवम् (शिवागम विद्यानिधी), इरोड, तमिळनाडू. (१८.५.२०१७)
२ इ २. आरोग्य सुधारण्यास साहाय्य होणे
‘बहुतेक वेळा व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडण्यास रज-तमप्रधान मन कारणीभूत ठरते. व्यक्तीच्या शरिरातील स्वाधिष्ठान आणि मणिपुर या चक्रांवर रज-तमाचा प्रभाव वाढल्याने व्यक्तीला विविध शारीरिक विकार होतात. सर्वसाधारणतः अनाहतचक्र हे मनाशी संबंधित असले, तरी स्वाधिष्ठान आणि मणिपुर या चक्रांवर रज-तमाचा प्रभाव वाढल्याने अनुक्रमे वासना आणि क्रोध हे विकार निर्माण होतात. धोतर नेसल्याने निर्माण होणारी सात्त्विकता या चक्रांना शुद्ध ठेवते. परिणामी या चक्रांवरील रज-तमाचा प्रभाव न्यून होण्यास साहाय्य होते. त्यामुळे मन नियंत्रित रहाते. साहजिकच नवनवीन विकार उत्पन्न होण्याची आणि जुने विकार परत होण्याची शक्यता न्यून होते. थोडक्यात अनिद्रा, मानसिक ताण, अतृप्तता, अशांती यांसारख्या अनेक समस्या न्यून होण्यासाठी धोतर नेसणे लाभदायी आहे.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.७.२०१७)
२ ई. पायजम्यासारखे घालता येणारे तयार स्वरूपात
मिळणारे धोतर (धोती-पायजमा) वापरणे अयोग्य असणे
‘तयार धोतर शिवतांना धोतराला छिद्रे पाडून शिलाई मारली जाते. छेद देणे, म्हणजेच वायूमंडलातील रज-तमात्मक लहरींना आकृष्ट करून घेणे. याउलट गाठ मारून वापरायच्या वस्त्रांना गुंड्या (बटणे) इत्यादी लावलेली नसल्याने वस्त्रांवर शिलाई न होऊन किंवा न्यूनतम शिलाई होऊन शिलाईतून छिद्रे पडून त्यातून रज-तमात्मक लहरी वस्त्रात घुसण्याची शक्यता अतिशय अल्प असते.’
– एक विद्वान, २९.१०.२००७ (सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचे लिखाण ‘एक विद्वान’, ‘गुरुतत्त्व’ आदी नावांनी प्रसिद्ध आहे.)
सनातनची ग्रंथसंपदा ‘ऑनलाईन’ खरेदी करा !
- सनातनच्या विक्रीकेंद्रांवर आणि वितरकांकडे उपलब्ध असलेले ग्रंथ आता SanatanShop.com वरही उपलब्ध !
- विशिष्ट मूल्याच्या खरेदीवर विनामूल्य घरपोच सेवा !
स्थानिक वितरकाचा संपर्क : ९३२२३१५३१७
कपड्यांच्या माध्यमांतून सात्त्विकता
वाढवण्याचे मार्गदर्शन करणारा सनातनचा ग्रंथ…
कपडे आध्यात्मिकदृष्ट्या कसे असावेत ?
- नेहमी सुती किंवा रेशमी कपडे का घालावेत ?
- कपड्यांचे रंग, कलाकुसर अन् शिवण कशी असावी ?
- नवीन वस्त्राची घडी शक्यतो सणवारी का मोडावी ?
- इतरांनी वापरलेले आणि काळ्या रंगाचे कपडे का वापरू नयेत ?
वाचा : कपड्यांसंबंधी मार्गदर्शन करणारे अन्य ग्रंथ
- स्त्रीसाठी आध्यात्मिकदृष्ट्या उपयुक्त असलेले कपडे
- पुरुषांसाठी आध्यात्मिकदृष्ट्या उपयुक्त असलेले कपडे