
रामनाथी – डिचोली येथील माजी आमदार श्री.नरेश सावळ यांनी ११ जानेवारी या दिवशी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाला सदिच्छा भेट दिली.त्यांच्यासमवेत डिचोलीचे माजी नगराध्यक्ष श्री.भगवान हरमलकर हेही उपस्थित होते.या वेळी सनातनचे साधक श्री.नितीन सहकारी यांनी त्यांना सनातनच्या आश्रमात चालू असलेले राष्ट्र,धर्म आणि संशोधन कार्य यांविषयी माहिती दिली.
आश्रमाविषयी मान्यवरांनी व्यक्त केलेले विचार
१.आश्रम पाहून मन प्रसन्न झाले ! – माजी आमदार नरेश सावळ
आश्रम पाहून मन प्रसन्न झाले.येथील शिस्त आणि व्यवस्था पाहून आनंद झाला.आश्रमात चालणारे कार्य महान आणि हिंदु धर्माला अभिमानास्पद आहे. आश्रमातील सूक्ष्म जगताशी संबंधित प्रदर्शनाविषयी मत व्यक्त करतांना ते म्हणाले की,प्रत्येक नास्तिक व्यक्तीला या प्रदर्शनाचा लाभ घडवून आणावा.त्याला दिशा मिळेल आणि त्याचे दैव पालटेल.
२. आश्रमात येऊन समाधान मिळाले ! – भगवान हरमलकर
आश्रमात येऊन समाधान मिळाले.आश्रमातील शांतता आणि व्यवस्था चांगली आहे.प्रत्येक गावागावात असा आश्रम असायला हवा.