परात्पर गुरु पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन
संकट प्रसंगी साधकांनी पुढील श्लोक सकाळी आणि संध्याकाळी २१ वेळा म्हणावा.
यो अन्धो यः पुनःसरो भगो वृक्षेष्वाहितः ।
तेन मा भगिनं कृण्वप द्रान्त्वरातयः ॥
– अथर्ववेद, कांड ६, सूक्त १२९, मंत्र ३
अर्थ : हे ईश्वरा, ऐश्वर्य, बल, वीर्य, यश आणि जीवनाला नित्य धारण करणारी अशी जी अमोघ अन् शाश्वत चैतन्यशक्ती तुझ्यामध्ये आहे, तीच शक्ती वृक्षांमध्येसुद्धा स्थित आहे. या चैतन्यशक्तीमुळेच वृक्षाच्या फांद्या वारंवार कापूनसुद्धा तो हिरवागार दिसतो. अशा प्रकारचे ऐश्वर्य, वीर्य आणि बल मलाही प्रदान कर, जेणेकरून माझे शत्रू, तसेच माझ्यावरील संकटे दूर होतील.