भाग्यनगर – प्रतिवर्षीप्रमाणे येथे नुकतेच ‘हैद्राबाद बूक फेअर’चे (पुस्तक मेळाव्याचे) आयोजन करण्यात आले होते. या पुस्तक मेळाव्यामध्ये सनातनचे तेलुगु, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमधील ग्रंथ, तसेच सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्याला प्रतिदिन सहस्रो जिज्ञासूंनी भेट दिली. या ठिकाणी एकूण ३५० प्रदर्शनांचे कक्ष लावण्यात आले होते. यात सनातनचे प्रदर्शन जिज्ञासूंसाठी प्रमुख आकर्षण ठरले.
१. प्रदर्शनस्थळी धर्मशिक्षण फलक लावण्यात आले होते. या फलकांचा लाभ सहस्रो जिज्ञासूंनी घेतला.
२. प्रदर्शनाच्या दर्शनी भागात सनातनच्या ग्रंथांवर आधारित एक फलक ठेवण्यात आला होता. हा फलक वाचून अनेक जिज्ञासूंनी ग्रंथ खरेदी केले.
३. मागील वर्षी या ठिकाणी ग्रंथ खरेदी केलेल्या जिज्ञासूंनी सनातनचे ग्रंथ आवडल्याचे आवर्जून सांगितले आणि या वर्षी अन्य नवीन ग्रंथ खरेदी केले.
४. ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने घेऊन गेलेल्या अनेक जिज्ञासूंनी सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनाला भेट देण्यासाठी इतरांना प्रवृत्त केले.
५. प्रदर्शनस्थळी सनातनचे साधक सांगत असलेली आध्यात्मिक माहिती ऐकून अनेक जिज्ञासू त्यांच्या कुटुंबियांना घेऊन येत आणि त्यांनाही माहिती सांगण्याची साधकांना विनंती करत होते.
६. ‘सनातनच्या ग्रंथप्रदर्शन कक्षावर माहिती दिली जाते, तशी माहिती अन्य प्रदर्शन कक्षांवर दिली जात नाही. तुम्ही निष्काम भावाने कार्य करत असल्यामुळे मन लावून ही सेवा करत आहात,’ असे जिज्ञासूंनी सांगितले.
७. ‘तुमची उत्पादने चांगल्या दर्जाची असूनही तुम्ही इतक्या अल्प मुल्यात ती देत आहात. तुमचे गुरु कोण आहेत ?’, असे काही जिज्ञासूंनी विचारले.
८. सात्त्विक उत्पादनांचा सुगंध जिज्ञासूंना सनातनच्या प्रदर्शनाकडे खेचून आणत होता, असे लक्षात आले.
९. प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी शेजारच्या प्रदर्शनातील व्यक्तीने सनातनचे तेलुगु भाषेतील सर्व ग्रंथ आणि प्रत्येक प्रकारची सात्त्विक उत्पादने खरेदी केली.
१०. पुस्तक मेळ्याच्या ठिकाणी एक ख्रिस्ती प्रचारक बायबलचे मोफत वाटप करत होता. त्याविषयी प्रदर्शनावरील एका जिज्ञासूने आयोजकांविषयी अप्रसन्नता व्यक्त केली.
११. ग्रंथप्रदर्शनस्थळी एक सूफी पंथाचे मार्गदर्शक आले होते. त्यांनी सनातनचे साधनेविषयीचे सर्व ग्रंथ खरेदी केले. ते म्हणाले, ‘‘मी हिंदु धर्मातील ग्रंथामधील माहिती वाचून ती माझ्या अनुयायांना शिकवतो.’’