संभाजीनगर – सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करत २५ डिसेंबर २०१८ ते २ जानेवारी २०१९ या कालावधीत फटाके फोडण्यास बंदी घालण्यात यावी आणि चीनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घालावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. आनंदी वानखडे यांनी या राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे केली.
सनातन संस्था आणि तिचे साधक गेली दोन दशकांहून अधिक काळ नि:स्वार्थपणे हिंदु धर्म आणि संस्कृती यांचा प्रसार करून समाजाला अध्यात्म, साधना, संस्कृती आणि राष्ट्र यांविषयी जागृत करत आहेत. तसेच भ्रष्टाचार, जनतेची लुटालूट अन्याय यांविरोधात वैध मार्गाने लढा देत आहेत. सातत्याने खोटी वृत्ते दाखवून संस्थेची नाहक बदनामी केली जात आहे. याच समवेत हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांची प्रसिद्धीमाध्यमांद्वारे नाहक अपकीर्ती केली जात आहे. अशाप्रकारे खोटी वृते देणार्यांवर कारवाई करण्यात यावी, असे हिंदू विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य अधिवक्ता सुरेश कुलकर्णी यांनी येथे सांगितले. संभाजीनगर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते. संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन झाले. या आंदोलनाला ४० हून अधिक धर्मप्रेमी हिंदूंची उपस्थिती होती.
या वेळी सनातन संस्थेच्या सौ. रोहिणी जोशी यांनी सांगितले की, केरळमध्ये लक्षावधी महिला आणि पुरुष भक्तांनी शबरीमला मंदिराच्या परंपरेच्या रक्षणार्थ मोठ्या प्रमाणात मोर्चे, आंदोलने आदी सनदशीर माध्यमातून निषेध नोंदवला. या आंदोलन करणार्या भक्तांपैकी ३५०० हून अधिक भक्तांना केरळ पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर गुन्हे प्रविष्ट केले आहेत, हे दुर्देवी अन् निषेधार्ह आहे. हे गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत.