प्रीती म्हणजे निरपेक्ष प्रेम. व्यवहारातील प्रेमात अपेक्षा असते. साधना केल्याने सात्त्विकता वाढल्यामुळे सान्निध्यातील चराचरसृष्टीला संतुष्ट करण्याची वृत्ती निर्माण होते. प्रत्येक वस्तूत परमेश्वराचे रूप दिसू लागते. ‘वसुधैव कुटुंबकम् ।’ म्हणजे विश्वाला एका प्रेमळ कुटुंबाचे स्वरूप येते. अशा रीतीने प्रेमात विशालता येऊन दुसर्यांबद्दल प्रीती निर्माण होते. हे लवकर साध्य होण्यासाठी आधी प्रयत्नपूर्वक प्रेम करावे लागते. यासाठी सत्संगात रहाणे महत्त्वाचे असते. प्रथम सत्संगात येणार्या साधकांबद्दल प्रीती वाटते, नंतर इतर संप्रदायांतील साधकांबद्दल, पुढे साधना न करणार्यांबद्दल आणि शेवटी सर्वच प्राणीमात्रांविषयी प्रीती निर्माण होते. खरी प्रीती असणार्यात प्राणीमात्रच नव्हे, तर चराचराविषयीही निरपेक्ष प्रेम असते. साधना करता करता पातळी आध्यात्मिक पातळी७० (सत्व गुण ७० टक्के )टक्केझाल्यावर इतरांविषयी खरी प्रीती वाटायला लागते. ताेपर्यंत मात्र आपण सर्व प्राणीमात्रांवर प्रेमकरत रहाणेच इष्ट !