संतांच्या वंदनीय उपस्थितीत ठाणे येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा !
हिंदूंना कायदे आणि इतर धर्मियांना लाभ अशी भूमिका
धर्मनिरपेक्ष राज्यात चालू आहे ! – नरेंद्र सुर्वे, हिंदु जनजागृती समिती
ठाणे – इतर धर्मियांना त्यांच्या धर्माचे शिक्षण चर्च आणि मशिदी यांतून दिले जाते; पण हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था नाही. मंदिरात भ्रष्टाचार होतो, असे सांगून मंदिरे कह्यात घेतली जातात. भक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेले पैसे शासन विकासकामासाठी वापरते; पण शासन चर्च, मशीद यांचा पैसा घेत नाही. आज हिंदूंना कायदे आणि इतर धर्मियांना लाभ अशी भूमिका घेणे धर्मनिरपेक्ष राज्यात चालू आहे. भगवद्गीता शाळेतून दिल्यावर लगेचच ‘शिक्षणाचे भगवेकरण केले जात आहे’, अशी ओरड केली जाते, मात्र कॉन्व्हेंट शाळेत जिझसची प्रार्थना चालते. ही स्थिती पालटायला हवी. १९७६ मध्ये राष्ट्रविरोधी साम्यवाद्यांनी संविधानात ‘सेक्युलर’ हा शब्द जोडला. तेव्हापासून भारत ‘सेक्युलर राष्ट्र’ झाले. हे होत असतांना लोकशाहीतील जनतेला याविषयी काहीच कळू दिले नाही. म्हणजे १९४२ पासून १९७६ पर्यंत भारत हे हिंदु राष्ट्रच होतेे, असे उद्गार हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांनी ठाण्यात हिंदु राष्ट्र-जागृती सभेत काढले.
येथील लक्ष्मी-चिरागनगर भागातील अमरदीप मित्र मंडळाच्या मैदानात ९ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु-राष्ट्र जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, पू. (सौ.) संगीता जाधव काकू आदी संतांच्या उपस्थित ही सभा संपन्न झाली. या सभेला २०० हून अधिक धर्माभिमानी हिंदु उपस्थित होते.
धर्मनिष्ठ संघटनांविषयी विकृत प्रचार हा षड्यंत्राचा
भाग ! – वैद्या दीक्षा पेंडभाजे, प्रवक्त्या, सनातन संस्था
समाजातील एक मोठा घटक पूर्वापार संस्कृतीनुसार भारत पुन्हा हिंदु राष्ट्र व्हावे, या मताचा आहे, तर हिंदु धर्म नष्ट करू पहाणार्या आक्रमकांचे वंशज आणि गुलामगिरीची मानसिकता बाळगणारे जन्महिंदू हे दुसर्या गटातील लोक जिवाच्या आकांताने हिंदुत्वाला आणि ‘हिंदु राष्ट्र’ या संकल्पनेला विरोध करत आहेत. हिंदुत्वाची शक्ती निष्प्रभ व्हावी, यासाठी ही मंडळी समाजाचा बुद्धीभेद करून हिंदुत्वाची मानहानी करत आहेत. धर्मनिष्ठ संघटनांच्याविषयी सध्या होणारा विकृत प्रचार हा त्या षड्यंत्राचा एक भाग आहे. सनातन अनेक संकटांवर मात करून विरोधाला न डगमगता मागील २५ वर्षांपासून हिंदु धर्माचे कार्य करत आहे. सनातनच्या साधकांमध्ये हे मनोबल त्यांची साधना आणि धर्माचरण यांमुळे निर्माण झाले. हिंदु धर्माची शक्ती साधनेमध्ये सामावली आहे; म्हणूनच प्रत्येक हिंदूने साधना करणे आवश्यक आहे.
प्रतिसाद !
१. आज एक हिंदु धर्मांतरीत झाला म्हणजे हिंदूंचा एक शत्रू निर्माण होतो; हे आपण लक्षात घ्यायला हवे आणि धर्मांतराला संघटित होऊन विरोध करायला हवा. आज गोमांस तस्करी करणार्याला पकडल्यावर त्याच्या मागे सहस्रो धर्मांध एकत्र येतात; पण ज्या गायीला आपण माता मानतो, तिच्या रक्षणासाठी हिंदू एकत्र येत नाहीत, हे हिंदूंचे दुर्दैव आहे. – श्री. प्रकाश यादव, हिंदुत्वनिष्ठ
२. ख्रिस्ती धर्मात धर्मांतरीत झालेल्या हिंदूंना हिंदूंच्या स्मशानभूमीत घेऊ द्यायचे नाही, असा कायदा व्हायला हवा. तेव्हाच धर्मांतराला आळा बसेल. – श्री. विजय खंडाळ, विश्व हिंदू परिषद
३. आठवड्यातील एक दिवस धर्मशिक्षणासाठी एकत्र येण्याचा निर्धार करत स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग घेण्याची मागणी महिलांनी केली.
४. स्थानिकांना वक्ते जे आघात सांगत होते, ते पटत होते; कारण ते आघात त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेले आहेत, असे त्यांनी सांगितले.