मक्का-मदिना या प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी मुसलमान युवती आणि हिंदु युवक यांची प्रेमकथा दाखवण्याचे धाडस निर्माते दाखवतील का ? – डॉ. दिक्षा पेंडभाजे, सनातन संस्था

‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणार्‍या ‘केदारनाथ’ चित्रपटावर
बंदी घालण्यासाठी ठाणे येथे हिंदुत्वनिष्ठ संघटना एकवटल्या !

ठाणे – श्रीक्षेत्र केदारनाथ येथे वर्ष २०१३ मध्ये आलेल्या जलप्रलयाची सत्यघटना ही नायक-नायिका यांच्या कथित प्रेमप्रकरणाला विरोध केल्यामुळे घडली, असा जावईशोध ‘केदारनाथ’ या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. तसेच या चित्रपटाच्या भित्तीपत्रकावर ‘लव्ह इज पिल्ग्रिमेज’ अर्थात ‘प्रेम ही तीर्थयात्रा आहे’, अशी ‘टॅगलाईन’ देत हिंदूंच्या तीर्थयात्रांच्या उद्देशालाच हरताळ फासण्यात आला आहे. लव्ह जिहाद चित्रपटसृष्टीत पहिल्यापासून आहेच. त्याचाच परिपाक असणारा केदारनाथ हा चित्रपट म्हणजे त्याची परिसीमाच म्हणावी लागेल. मक्का-मदिना या प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी मुसलमान युवती आणि हिंदु युवक यांची प्रेमकथा दाखवण्याचे धाडस निर्मात्यांनी दाखवले असते का, असा प्रश्‍न सनातन संस्थेच्या डॉ. दिक्षा पेंडभाजे यांनी उपस्थित केला.

येथील रेल्वे स्थानकाजवळ सॅटिस पुलाखाली ४ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता केदारनाथ चित्रपटाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. ‘या चित्रपटाला तीव्र विरोध असून हा चित्रपट प्रदर्शित केला जाऊ नये, यावर बंदी आणावी’, अशी मागणीही हिंदु जनजागृती समितीसह समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली. या वेळी केदारनाथ चित्रपटाच्या विरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.

आंदोलनात शिवसेना, वन्दे मातरम् प्रतिष्ठान, हिंदू युवा वाहिनी, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आदी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ७० हून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

क्षणचित्रे

१. विषय ऐकल्यावर या चित्रपटावर बंदी यायलाच हवी अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

२. शासनाला देण्यात येणार्‍या निवेदनावर नागरिकांनी स्वाक्षरी करून निषेध नोंदवला.

३. रस्त्यावरुन ये-जा करणारे नागरिक आंदोलनाचा विषय थांबून ऐकत होते.

४. गळ्यात क्रॉस घालून आलेल्या एका तरुणाचे हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी प्रबोधन केल्यावर त्याने क्रॉस काढून टाकला.

हिंदूंची दिशाभूल करणार्‍या चित्रपटावर बंदी घाला ! – अभिजीत भोजणे, हिंदु जनजागृती समिती

सध्या देशभरात ज्या समस्येने थैमान घातले आहे, अशा ‘लव्ह जिहाद’ला एकप्रकारे प्रोत्साहन देण्याचाच प्रकार या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. हे अतिशय निंदनीय आणि आक्षेपार्ह आहे. याचा विपरीत परिणाम हिंदु तरुणींवर होणार आहे. याचे गांभीर्य ओळखून हिंदूंची दिशाभूल करणार्‍या चित्रपटावर बंदी घाला. ‘केदारनाथ’ या आगामी हिंदी चित्रपटाचे नाव, ‘पोस्टर’, ‘ट्रेलर’ आणि ‘टीझर’ यांतून हा चित्रपट हिंदुद्रोही असल्याचे दिसून येते.

हिंदुस्थानात हिंदु धर्मावर घाला घालणारे केदारनाथसारखे
चित्रपट तयार केले जातात, हे दुर्दैव ! – राकेश हिंदुस्तानी, वन्दे मातरम् प्रतिष्ठान

हिंदूंना जागृत करणारे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, सावरकर तसेच देव, देश आणि धर्म यांवर आधारित चित्रपट काढले जात नाहीत, तर हिंदुस्थानात हिंदु धर्मावर घाला घालणारे केदारनाथसारखे चित्रपट तयार केले जात आहेत, हे आमचे दुर्दैव आहे. चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने यासंदर्भात गांभीर्याने लक्ष घालून या चित्रपटावर बंदी आणायला हवी.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment