वाद्यांची निर्मिती का केली ?

१. सूक्ष्मातून होणा-या कार्याची ओळख सर्व जिवांना व्हावी,तसेच
वाद्यांतून प्रक्षेपित होणा-या शक्तीमधून सर्वांना आनंद मिळावा, यांसाठी ईश्वर वाद्यांचा वापर करत असणे

ईश्वराने सृष्टीच्या पालन-पोषणाच्या दृष्टीने संगीताच्या माध्यमातून सर्व जिवांना आवश्यक अशी त्याची शक्ती देण्यासाठी निरनिराळ्या वस्तू आणि वाद्ये यांची निर्मिती केली. ईश्वराला केवळ शक्ती प्रक्षेपित करता आली असती; परंतु सूक्ष्मातून होणा-या कार्याची ओळख सर्व जिवांना व्हावी, तसेच प्रक्षेपित होणा-या शक्तीमधून सर्वांना आनंद मिळावा, यांसाठी ईश्वर वाद्यांचा वापर करतो. ज्यांना गाता येत नाही; पण संगीताची आवड आहे, अशांसाठी ईश्वराने वाद्यांची निर्मिती केली आहे.

 

२. विविध देवतांशी संबंधित असलेल्या वाद्यांच्या
माध्यमातून साधना करत असलेल्या जिवाला त्या त्या देवतेची अनुभूती घेता येणे

देवतांच्या हातात विविध प्रकारची वाद्ये आपल्याला दिसतात, उदा. सरस्वतीदेवीची वीणा, भगवान शिवाचे डमरू, श्रीकृष्णाची बासरी आणि देवर्षि नारदांची वीणा. त्यामुळे या वाद्यांच्या माध्यमातून साधना करत असलेल्या जिवाला त्या त्या वाद्यातून त्या त्या देवतेच्या तत्त्वाची अनुभूती घेता येते.

 

३. गोपींनी भगवान श्रीकृष्णाच्या बासरी
वादनाच्या माध्यमातून देहभान हरपून नादब्रह्माची श्रेष्ठ अनुभूती घेणे

वाद्यांच्या स्वरांच्या माध्यमातून देहभान हरपून नादब्रह्माची उच्च स्तराची अनुभूती येण्याचे उत्तम उदाहरण म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे बासरी वादन आणि त्याच्या परमभक्त गोपींनी अनुभवलेले बासरीच्या स्वरातील नादब्रह्म !

 

४. वादनात व्यंजने नसून केवळ स्वरच
असल्याने स्वरांच्या नादलहरी ईश्वराच्या निर्गुण तत्त्वाच्या अधिक जवळ असणे

साधनारत असलेल्या प्रत्येक जिवाला पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी निर्गुण निराकार ईश्वराशी एकरूप होणे महत्त्वाचे आहे. वादनात केवळ स्वरच असल्याने ते निर्गुणाच्या अधिक जवळचे असल्याचे खाली दिलेल्या सारणीवरून लक्षात येते.

वरील सारणीवरून आपल्या लक्षात येते की, विविध प्रकारची गीते आणि शास्त्रीय संगीत यांत शब्दांचे प्रमाण अधिक आहे. शब्दांमुळे जडत्व येते. त्यामुळे ते सगुणातील अनुभूती देतात, तर वादनात शब्दच नसल्याने त्याला जडत्व नसते. त्यामुळे वादनाच्या माध्यमातून ईश्वरी निर्गुण तत्त्व अधिक प्रमाणात आपण अनुभवू शकतो.

५. पाश्चात्त्य आणि भारतीय वाद्यांचा सूक्ष्मातून होणारा परिणाम

आजकाल पाश्चात्त्यांची वाद्ये भारतीय वाद्यांच्या तुलनेत प्रगत असल्याचे स्थुलातून दिसत असले, तरी सूक्ष्मातून त्यांचा परिणाम चांगला होत नाही. याचा एका कार्यक्रमामध्ये पुढीलप्रमाणे प्रयोग करून घेतला होता.

५ अ. सूर्योदयाचे वर्णन करण्यासाठी पाश्चात्त्य पद्धतीने सिद्ध केलेल्या चार वाद्यांचा वापर करूनही तशी अनुभूती न येणे; परंतु केवळ बासरी वाजवल्यावर सूर्योदय होत असल्याची अनुभूती येणे

सूर्योदयाचे वर्णन करण्यासाठी पाश्चात्त्य पद्धतीने सिद्ध केलेल्या चार वाद्यांचा वापर केला, तरीही ‘सूर्योदय होत आहे’, असे कुणालाही जाणवले नाही. याउलट भारतातील वाद्यांंपैकी केवळ बासरी वाजवल्यावर ‘सूर्योदय होत आहे’, असे दृश्य सर्वांना डोळ्यांसमोर दिसले आणि बासरीचे स्वर प्रगट होतांना ‘हा सूर्योदय टप्प्याटप्प्याने होत आहे’, असेही जाणवले. भारतीय संगीत हे ईश्वराला अपेक्षित असे आहे आणि त्यामुळे ते सत्याला धरून आहे; म्हणूनच अशा अनुभूती येतात.

अशा समृद्ध भारतीय संगीताच्या माध्यमातून साधना करण्याची अमूल्य संधी लाभली आहे. ‘जीवनाचा उद्धार करणा-या संगीतांतर्गत वादन कलेच्या माध्यमातून कलाप्रेमी जिवांना साधनेच्या प्रगतीपथावर आपणच घेऊन जावे’, अशी भगवान शिव आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना करते.’

– कु. तेजल पात्रीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

Leave a Comment