विजयपूर येथे हिंदू अधिवेशन संपन्न
विजयपूर – हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात अनेक संघटना कार्यरत आहेत; परंतु त्यातील बर्याच संघटना गुरूंच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत नाहीत. त्यामुळे त्यांचे ध्येय स्पष्ट नसते. गुरूंचे मार्गदर्शन घेऊन ध्येय स्पष्ट असलेले हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, असे बागलकोट येथील हिंदुत्वनिष्ठ डॉ. बाबू नायक यांनी सांगितले. २४ नोव्हेंबर २०१८ या दिवशी माहेश्वरी भवनात हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या हिंदू अधिवेशनात ते बोलत होते. या २ दिवसांच्या हिंदू अधिवेशनात विजयपूर, जमखंडी, महालिंगपूर, ताळीकोट, निडगुंजी, बागलकोट जिल्ह्यांतील २५ ते ३० संघटनांचे हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
हिंदु जनजागृती समितीचे कार्य प्रशंसनीय ! – सिद्रामेश अरमनी
हिंदु जनजागृती समिती उत्तम कार्य करत आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दृष्टीने हिंदु संघटनांंना एकत्रित जोडण्याचा उत्तम प्रयत्न करत आहे. त्यासाठी आम्ही समितीचे अभिनंदन करतो, असे निवृत्त सैन्याधिकारी श्री. सिद्रामेश अरमनी म्हणाले.
हिंदु राष्ट्राचे कार्य सातत्याने करणे आवश्यक ! –
गुरुप्रसाद गौडा, कर्नाटक राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
सध्या हिंदूंवर होणारे आघात, तसेच अन्याय यांविरुद्ध संघटितपणे कार्य करणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सर्व हिंदूंनी प्रतिदिन वेळ देणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्राचे कार्य करतांना सेवाभाव असला पाहिजे. आपल्याला धर्माच्या बाजूने राहून लढा द्यायचा आहे.
गोरक्षणासाठी आपण संघटितपणे प्रयत्न केला पाहिजे !
– महेश कुंबार, स्वामी विवेकानंद युवा सेवा संघ, विजयपूर
गोमाता ही विश्वाची माता आहे. गोमातेच्या रक्षणासाठी कटिबद्ध होणे आवश्यक आहे. गोमाता ही ३३ कोटी देवतांचे निवासस्थान आहे. देवतांची नित्य पूजा करणार्यांनी त्या सर्व देवता जिच्यात आहेत, त्या गोमातेचे रक्षण केले नाही, तर नित्य पूजा करून काय उपयोग ?
भारतमातेचे तुकडे करण्यासाठी शेजारची
शत्रूराष्ट्रे टपून बसली आहेत ! – काशिनाथ प्रभु, सनातन संस्था
जगाची सध्याची स्थिती पाहिल्यास तिसर्या महायुद्धाचे सावट स्पष्ट दिसत आहे. जिहादी आतंकवादी कधीही भारतावर आक्रमण करू शकतात. भारतमातेचे तुकडे करण्यासाठी शेजारची शत्रूराष्ट्रे टपून बसली आहेत. भारताच्या अंतरबाह्य दोन्ही व्यवस्था सुदृढ नाहीत. त्यासाठी हिंदूंनी भगवंताचे स्मरण करत धर्मरक्षण आणि राष्ट्ररक्षण यांचे कार्य करण्यासाठी अधिकाधिक वेळ देणे आवश्यक आहे. अशा आपत्काळात भगवंताचे स्मरण करून त्याच्या कृपेला पात्र झाले पाहिजे.