‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.टी.एस्.
(युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘इंडोनेशिया येथील गिटारवादक श्री. फ्रान्सिसकस् बुडाडजी (Fransiskus Satrio Budiadji) हे गत ४ वर्षांपासून साधना करत आहेत. ते एका संगीत संस्थेमधील (Music Institute) विद्यार्थ्यांना गिटार वाजवण्यास शिकवतात. श्री. फ्रान्सिसकस् यांनी ऑगस्ट २०१८ मध्ये गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली.
‘श्री. फ्रान्सिसकस् यांनी गिटारवर इंग्रजी पॉप गीताची धून आणि संतांच्या भजनाची (संत भक्तराज महाराज यांच्या भजनाची) धून वाजवल्यावर साधक-श्रोते, वादक, त्यांचे वाद्य, पक्षी आणि प्राणी यांवर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ८ ते १० ऑगस्ट २०१८ या कालावधीत एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजणीच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.
१. चाचणीचे स्वरूप
या चाचणीत तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली १ साधिका, आध्यात्मिक त्रास नसलेला १ साधक आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची १ साधिका हे श्रोते म्हणून सहभागी झाले होते.
‘श्री. फ्रान्सिसकस् यांनी गिटारवर इंग्रजी पॉप गीत आणि संतांचे भजन यांची धून वाजवल्यावर त्याचा पक्षी अन् प्राणी यांवर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी तेथे एका साधकाकडील १ पाळीव पक्षी आणि १ पाळीव प्राणी ठेवण्यात आले होते. या चाचणीत पहिल्या प्रयोगाच्या वेळी श्री. फ्रान्सिसकस् यांनी गिटारवर इंग्रजी पॉप गीताची धून २० मिनिटे वाजवली, तर दुसर्या प्रयोगाच्या वेळी गिटारवर संतांच्या भजनाची धून २० मिनिटे वाजवली. त्यांनी प्रत्येक प्रयोगामध्ये धून वाजवण्यापूर्वी आणि वाजवल्यानंतर वादक (श्री. फ्रान्सिसकस्), वाद्य (गिटार), साधक-श्रोते, पक्षी आणि प्राणी यांच्या ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजणीच्या नोंदी करण्यात आल्या. या केलेल्या सर्व मोजण्यांच्या नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.
२. सकारात्मक आणि नकातरात्मक ऊर्जा, तसेच
एकूण प्रभावळ यांच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन
सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही.
२ अ. इंग्रजी पॉप गीत आणि संतांचे भजन यांची
धून ऐकण्याने पुढील घटकांतील सकारात्मक ऊर्जेवर झालेला परिणाम
घटक | इंग्रजी पॉप गीत | संतांचे भजन यांची धून |
तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली साधिका | ऐकण्यापूर्वी आणि ऐकल्यानंतरही सकारात्मक ऊर्जा आढळली नाही | ऐकण्यापूर्वी आणि ऐकल्यानंतरही सकारात्मक ऊर्जा आढळली नाही |
आध्यात्मिक त्रास नसलेला साधक | सकारात्मक ऊर्जा नाहीशी होणे | सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे |
६१ टक्के आध्यात्मिक पातळीची साधिका | सकारात्मक ऊर्जा न्यून होणे | सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे |
गिटारवादक श्री. फ्रान्सिसकस् | सकारात्मक ऊर्जा न्यून होणे | सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे |
पक्षी आणि प्राणी | सकारात्मक ऊर्जा नाहीशी होणे | सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे |
गिटार | सकारात्मक ऊर्जा निर्माण न होणे | सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे |
२ आ. इंग्रजी पॉप गीत आणि संतांचे भजन यांची धून
ऐकण्याने पुढील घटकांतील नकारात्मक ऊर्जेवर झालेला परिणाम
घटक | इंग्रजी पॉप गीत | संतांच्या भजनाची धून |
तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली साधिका | नकारात्मक ऊर्जेत वाढ होणे | नकारात्मक ऊर्जेत वाढ होणे |
आध्यात्मिक त्रास नसलेला साधक | ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा निर्माण होणे | नकारात्मक ऊर्जा निर्माण न होणे |
गिटारवादक श्री. फ्रान्सिसकस् | ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा निर्माण होणे | नकारात्मक ऊर्जा निर्माण न होणे |
पक्षी आणि प्राणी | ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा निर्माण होणे | नकारात्मक ऊर्जा निर्माण न होणे |
६१ टक्के पातळीची साधिका | ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा ऐकण्यापूर्वी अन् ऐकल्यानंतरही आढळल्या नाहीत. | ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा ऐकण्यापूर्वी अन् ऐकल्यानंतरही आढळल्या नाहीत. |
गिटार | नकारात्मक ऊर्जेत वाढ होणे | नकारात्मक ऊर्जा नाहीशी होणे |
२ इ. इंग्रजी पॉप गीत आणि संतांचे भजन यांची धून
ऐकण्याने पुढील घटकांतील एकूण प्रभावळीवर झालेला परिणाम
घटक | इंग्रजी पॉप गीत | संतांच्या भजनाची धून |
तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली साधिका | एकूण प्रभावळ वाढणे | एकूण प्रभावळ न्यून होणे |
आध्यात्मिक त्रास नसलेला साधक | एकूण प्रभावळ न्यून होणे | एकूण प्रभावळ वाढणे |
६१ टक्के पातळीची साधिका | एकूण प्रभावळ न्यून होणे | एकूण प्रभावळ वाढणे |
गिटारवादक श्री. फ्रान्सिसकस् | एकूण प्रभावळ न्यून होणे | एकूण प्रभावळ वाढणे |
पक्षी आणि प्राणी | एकूण प्रभावळ न्यून होणे | एकूण प्रभावळ वाढणे |
गिटार | एकूण प्रभावळ वाढणे | एकूण प्रभावळ वाढणे |
निष्कर्ष
१. वरील सूत्रांतून लक्षात येते की, वाद्यावर आध्यात्मिक पाया नसलेल्या असात्त्विक गीताची धून वाजवल्यावर त्यातून प्रक्षेपित होणार्या नकारात्मक स्पंदनांमुळे श्रोते, वादक अन् त्याचे वाद्य, तसेच पशूपक्षी यांवर हानीकारक परिणाम होतो. थोडक्यात, ‘तमोगुणी गीताची धून वाद्यावर वाजवल्यावर त्यातून नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत असल्याने त्यांचा चाचणीतील घटकांवर (साधक-श्रोते, पक्षी, प्राणी, वादक आणि त्याचे वाद्य यांवर) हानीकारक परिणाम होतो. याउलट भारतीय शास्त्रीय संगीताला आध्यात्मिक पाया असल्याने सत्त्वगुणी भजनाची धून वाजवल्यावर त्यातून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत असल्याने त्यांचा चाचणीतील घटकांवर सकारात्मक परिणाम होतो’, हे या वैज्ञानिक चाचणीतून स्पष्ट झाले.
२. वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेल्या साधिकेमध्ये आधीपासूनच नकारात्मक ऊर्जा होती. तिच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा मुळीच नव्हती. तिने संतांच्या भजनाची धून ऐकल्यावर तिला त्रास देणार्या वाईट शक्तीला भजनांतील चैतन्य सहन न झाल्याने तिने त्या चैतन्याशी लढण्यासाठी स्वतःची त्रासदायक शक्ती (नकारात्मक स्पंदने) वाढवली. त्यामुळे त्या साधिकेतील नकारात्मक ऊर्जेत वाढ झाली. संत भक्तराज महाराज यांच्या भजनांतून प्रक्षेपित झालेल्या चैतन्याचा निर्गुण स्तरावर लाभ झाल्याने त्या साधिकेच्या एकूण प्रभावळीतील नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण न्यून (कमी) झाल्याने तिची एकूण प्रभावळ घटली. यातून ‘त्या साधिकेने संतांची भजने ऐकणे तिच्यासाठी लाभदायी आहे’, असे लक्षात येते.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१३.१०.२०१८)
ई-मेल : [email protected]