श्रीरामाचा नामजप : श्रीराम जय राम जय जय राम

श्रीराम Shriram
भगवान श्रीराम

भक्‍तीभाव लवकर निर्माण होण्यासाठी अन् देवतेच्या तत्त्वाचा अधिकाधिक लाभ होण्यासाठी नामाचा उच्चार योग्य असणे आवश्यक आहे. आता आपण श्रीरामाचा नामजप कसा करावा, ते समजून घेऊया.

श्रीरामाचा तारक नामजप

 

 

श्रीरामाची नामजप-पट्टी
श्रीरामाची नामजप-पट्टी

 

श्रीराम जय राम जय जय राम : श्रीरामाच्या नामजपाचा अर्थ

‘रामसे बडा रामका नाम‘, असे म्हटलेलेच आहे. ‘रामाचे एक नाम विष्णुसहस्रनामाच्या बरोबरीचे आहे’, अशी रामनामाची महती साक्षात् शिवाने गायिली आहे. देवतेचा नामजप भावपूर्ण झाला, तरच तो देवापर्यंत लवकर पोहोचतो. नामजप करतांना त्यातील अर्थाकडे लक्ष देऊन केला, तर तो अधिक भावपूर्ण होण्यास मदत होते. यासाठी ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ या नामजपातील शब्दांचा अर्थ समजून घेऊया. ‘श्रीराम‘ हे श्रीरामाचे आवाहन आहे. ‘जय राम’ हे स्तुतीवाचक आहे, तर ‘जय जय राम’ हे ‘नमः’ प्रमाणे शरणागतीचे दर्शक आहे. ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करतांना जपामध्ये तारक भाव येण्यासाठी प्रत्येक शब्दाचा उच्चार दीर्घ करावा. कोणत्याही शब्दावर जोर देऊ नये. प्रत्येक शब्दाचा उच्चार कोमल असावा. आता या तत्त्वानुसार आपणही नामजप करण्याचा प्रयत्‍न करूया. देवतेच्या तारक किंवा मारक रूपाशी संबंधित नामजप म्हणजे तारक किंवा मारक नामजप. याविषयीच्या सविस्तर विवेचनासाठी येथे पहा !

 

रामतत्त्वाचा अधिकाधिक लाभ करून घ्या !

येथे आवर्जून लक्षात ठेवण्यायोग्य सूत्र म्हणजे इतर दिवसांपेक्षा रामनवमीला, म्हणजेच चैत्र शुक्ल नवमीला श्रीरामाचे तत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटीने अधिक प्रमाणात कार्यरत असते; म्हणून या तिथीला ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप अधिकाधिक करावा आणि रामतत्त्वाचा लाभ करून घ्यावा.

 

संतांच्या मार्गदर्शनानुसार सिद्ध झालेला नामजप !

येथे देण्यात आलेल्या नामजपांचे वैशिष्ट्य म्हणजे प.पू. डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार श्रीराम जय राम जय जय राम हा नामजप सनातनच्या साधिका सुश्री. तेजल पात्रीकर यांनी शास्त्रीय प्रयोगांद्वारे सिद्ध केला आहे.

 

सनातन-निर्मित ‘श्रीरामाच्या नामजप-पट्टी’ची सूक्ष्मातील वैशिष्ट्ये दर्शवणारे चित्र

1366189014_shriram_namjap_patti_1000

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘श्रीराम’

Leave a Comment