देवतेच्या विविध उपासनांपैकी कलियुगातील सर्वांत श्रेष्ठ, तसेच सोपी, सुलभ आणि देवतेशी सतत अनुसंधान साधून देऊ शकणारी अशी एकमेव उपासना म्हणजे देवतेचा नामजप.
देवतेच्या नामजपाने देवतेचे तत्त्व जास्तीतजास्त ग्रहण होण्यासाठी तसेच भक्तीभाव लवकर निर्माण होण्यासाठी नामाचा उच्चार अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य करणे आवश्यक असते. देवतेचा नामजप भावपूर्ण झाला, तरच तो देवापर्यंत लवकर पोहोचतो. नामजप करतांना त्याच्या अर्थाकडे लक्ष देऊन केला, तर तो अधिक भावपूर्ण होण्यास मदत होते. मारुतीचा (हनुमंताचा) नामजप कसा करावा, हे आपण येथे ऐकूया.
सनातन-निर्मित हनुमानाच्या नामजप-पट्टीची सूक्ष्मातील वैशिष्ट्ये
हनुमानाच्या नामजपाचे महत्त्व
हनुमानाचा नामजप अखंड करणार्याला हनुमानाची शक्ती अन् चैतन्य अखंड लाभल्याने त्याचे अनिष्ट शक्तींपासून सदैव रक्षण होते; म्हणून हनुमानाचा नामजप हा अनिष्ट शक्तीमुळे होणार्या त्रासांच्या निवारणार्थ करावयाच्या विविध उपायांपैकी सर्वांत प्रभावी उपाय आहे.
हनुमानतत्त्वाचा अधिकाधिक लाभ घ्या !
येथे आवर्जून लक्षात ठेवण्यायोग्य सूत्र म्हणजे इतर दिवसांपेक्षा हनुमान जयंतीला, म्हणजेच चैत्र पौर्णिमेला हनुमानाचे तत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटीने अधिक प्रमाणात कार्यरत असते; म्हणून या तिथीला ‘श्री हनुमते नमः ।’ हा नामजप अधिकाधिक करावा आणि मारुतितत्त्वाचा लाभ करून घ्यावा.
नामजपाविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे ‘क्लिक’ करा !
संतांच्या मार्गदर्शनानुसार सिद्ध झालेला नामजप !
येथे देण्यात आलेल्या नामजपांचे वैशिष्ट्य म्हणजे प.पू. डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार हा नामजप सनातनच्या साधिका सुश्री. तेजल पात्रीकर यांनी शास्त्रीय प्रयोगांद्वारे सिद्ध केला आहे.