फिजिओथेरपी

फिजिओथेरपी अर्थात आपल्या शरीरातील एखाद्या दुखावलेल्या अंगास, स्नायूस, हाडास पुन्हा पूर्ववत करणे. व्यायाम आणि फिजिओथेरपी हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत.

व्याधीचे मूळ कारण शोधून काढून व्यायामाची शास्त्रीय पद्धतीने जोड देऊन दुखण्यावर मात करण्याची किमया फिजिओथेरपीमध्ये असते. त्यामुळे जुनी दुखणी, अपघातातील दुखापती, बदलत्या जीवनशैलीमुळे येणारे आजार, हाडांमधील जुनी दुखणी बरी करण्यासाठी मदत घेतली जाते.

 

कधी करावी ही थेरपी

शरीरावर जेव्हा आणि जेथे दुखणं येतं तेव्हा तेथे फिजिओथेरेपी करून घ्यावी लागते. विशेषतः सांधे किंवा स्नायू दुखावतात तेव्हा ही थेरपी करावीच लागते. पाठीच्या दुखण्यामध्ये मुख्यत्वे वेगवेगळी कारणे आहेत. लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, तणाव, स्नायू ताणून धरणे, चुकीच्या पद्धतीच्या बैठकी यामुळे हाडांमध्ये वा स्नायू दुखू लागले तर या फिजिओथेरपीच्या काही विशिष्ट दिवसांच्या कोर्सनंतर हे दुखणे आटोक्यात येते. मात्र, या आजाराची मूळ कारणं शोधून काढून त्यावर फिजिओथेरिपिस्टने सांगितल्यानुसार सवयी तसेच जीवनशैलीत बदल करणे आवश्यक असते. खूप जड वस्तू उचलणे वा तासनतास एकाच जागी बसून राहिल्यानेही पाठीवर ताण येऊन पाठ दुखू लागते.

Leave a Comment