परात्पर गुरु डॉक्टर यांच्या खोलीत येणार्‍या माश्या, किडे इत्यादी आपोआप मरून पडणे अन् त्यामागील शास्त्र

१. परात्पर गुरु डॉक्टर यांच्या खोलीत
माश्या, किडे इत्यादी मरून पडण्याचा घटनाक्रम

– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१ अ. संपूर्ण आश्रमात केवळ परात्पर गुरु
डॉक्टरांची खोली आणि त्याखालील वाहनतळ या ठिकाणीच
किड्यांच्या माध्यमातून वाईट शक्तींचे सूक्ष्मातील आक्रमण होणे

‘९.५.२०१४ या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीत अन् त्यांच्या सज्जांत शेकडो लहान-मोठे किडे आले होते. परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीत दोन साधकांनी सायंकाळी ७.३० ते रात्री १२ या कालावधीत ३ वेळा किडे मारून दरवाजे आणि खिडक्या यांच्या फटींत कीटकनाशक फवारले, तरीही ते येतच होते. तेव्हा संपूर्ण आश्रमात केवळ या खोलीत आणि खोलीच्या खाली असलेल्या वाहनतळाच्या ठिकाणीच एवढ्या प्रमाणात किडे असल्याचे आढळून आले.’ – (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, रामनाथी आश्रम, गोवा.

 

२. सूक्ष्मातील वाईट शक्तींच्या
आक्रमणामुळे होणारा माश्या, किडे इत्यादींचा मृत्यू

परात्पर गुरु डॉक्टरांच्या रहात्या खोलीत येणारे किडे आणि माश्या आपोआप मरून पडणे

२ अ. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

२ अ १. परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीत येणारे किडे आणि माश्या आपोआप मरून पडणे
२ अ १ अ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीत येणारे किडे आणि माश्या चौथ्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींनी पाठवलेल्या असल्याने खोलीच्या क्षेत्रात आल्यावर त्या आपोआपच नष्ट होणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत गेले दोन मास (महिने) माश्या आणि किडे मरून पडत आहेत. आश्रमात इतरत्र किंवा कोणाच्या घरीही असे होत नाही. याचे कारण पुढे दिले आहे.

२ अ १ अ १. चौथ्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींनी यज्ञ करून किडे आणि माश्या परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीवर आक्रमण करण्यासाठी सिद्ध करणे

‘चौथ्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींनी सिद्धीच्या जोरावर यज्ञ करून उत्पन्न केलेले किडे आणि माश्या परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीच्या क्षेत्रात आल्यावर नष्ट होतात, म्हणजेच मरून पडतात; कारण या माश्या आणि किडे सर्वसामान्य नसतात, तर त्यांच्या रूपातील वाईट शक्ती असतात.

२ अ १ अ २. किडे आणि माश्या यांच्या माध्यमातून आलेल्या वाईट शक्तींनी खोलीतील वायूमंडल दूषित करण्याचा प्रयत्न करणे अन् त्याचे स्वरूप

किडे, माश्या अशा कीटकांच्या माध्यमातून पाताळातील मोठ्या वाईट शक्ती चैतन्याने भारीत वायूमंडल दूषित करण्याचा प्रयत्न करतात.

२ अ १ अ २ अ. चैतन्याच्या कार्याला अडथळा आणणे

कीटकांच्या माध्यमातून होणार्‍या सूक्ष्म नादातील त्रासदायक कंपनांमुळे चैतन्याच्या प्रक्षेपणाच्या वेगाला अडथळा येतो.

२ अ १ अ २ आ. सर्वत्र विषारी वायूचे प्रक्षेपण होणे

कीटकांच्या तोंडातून स्रवणार्‍या लाळेतून उत्पन्न होणार्‍या कडवट स्वरूपाच्या वायूलहरींमुळे वातावरणात विषारी वायूचे प्रक्षेपण होते. हा वायू प्राणशक्ती वेगाने न्यून करणारा असतो.

२ अ १ अ २ इ. श्‍वास घुसमटून टाकणारा वायू

हा वायू श्‍वसनसंस्थेच्या संपर्कात आल्यास फुप्फुसांतील वायूकोषांचे कार्य करण्याचे प्रमाण अल्प होते आणि त्यांचे झपाट्याने आकुंचन चालू होते. परिणामतः हा वायू श्‍वास घुसमटून टाकणारा असतो.

२ अ १ अ २ ई. कीटकांच्या माध्यमातून त्रासदायक शक्तीचा प्रसार होणे

हे कीटक सर्वत्र उडत असल्याने ते अधो ते ऊर्ध्व या वायूमंडलात एकाच वेळी त्रासदायक शक्तीचा प्रसार त्वरित करू शकतात.

२ अ १ अ ३. निष्कर्ष

परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीत किडे आणि माश्या आपोआप मरून पडणे, म्हणजे खोलीतील शक्तीने भारित क्षेत्रात कीटकांच्या माध्यमातून खोलीवर केलेले चौथ्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचे आक्रमण अशा प्रकारे आपोआपच कसे परतवून लावले जाते, याचेच हे प्रत्यक्ष उदाहरण आहे.’

– एक विद्वान ((सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ ‘एक विद्वान’ या टोपण नावाने लिहितात. (९.११.२०११, सकाळी ७.५१))
२ अ १ आ. मोठ्या वाईट शक्तींनी किडे आणि माश्या यांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉक्टरांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्या खोलीतील मारक तत्त्वयुक्त वातावरणात किडे अन् माश्या मरून पडलेले आढळणे

ऋषीमुनींच्या आश्रमात सर्व प्राणी निर्भयतेने वावरत. असे असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत किडे आणि माश्या का मरून पडतात, याचे शास्त्र येथे दिले आहे.

२ अ १ आ १. पूर्वीच्या काळी वातावरणात मोठ्या प्रमाणात वाईट शक्तींचा प्रकोप नसल्याने, तसेच प्राण्यांच्या माध्यमातून वाईट शक्तींनी ऋषीमुनींवर आक्रमण करण्याचे प्रमाणही अल्प असल्याने साधना करणारे प्राणी आणि पक्षीच आश्रमाच्या आश्रयाला निर्भयपणे येऊ शकणे

‘पूर्वीच्या काळी आश्रमात येणारे प्राणी आणि पक्षी हे साधना करणारे असल्याने तेही त्यांचे हिंस्रत्व विसरून आश्रमातील तपोबलयुक्त वातावरणात साधना चालू ठेवत असत, तसेच निर्भयपणे वावरत असत. या प्राण्यांच्या माध्यमातून ऋषींवर वाईट शक्तींनी आक्रमण करण्याचे प्रमाणही त्या वेळी अल्प होते. पूर्वीच्या काळी वातावरणात कलियुगाचा एवढा प्रभाव नव्हता, तसेच सर्वत्र वाईट शक्तींचा मोठ्या प्रमाणात संचारही नव्हता. त्यामुळे ऋषीमुनींच्या साधनेत खंड पडण्याचे प्रमाणही आताच्या तुलनेत अल्प होते.

२ अ १ आ २. कलियुगात मोठ्या वाईट शक्तींनी किडे आणि माश्या यांच्या माध्यमांतून संत-महात्म्यांवर आक्रमण करण्यास आरंभ केल्याने त्याला प्रतिरोध करण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीतील मारक शक्तीने युक्त वातावरणात किडे अन् माश्या मरून पडण्याचे प्रमाण वाढणे

आता युग पालटले, तसा सर्वत्र सूक्ष्मातील वाईट शक्तींचा प्रकोप वाढला आहे. विविध रूपांतील वाईट शक्ती संत-महात्म्यांवर आक्रमण करण्यासाठी धावू लागल्याने सर्वत्रच संघर्षाचे, म्हणजेच धर्मयुद्धाचे प्रमाण वाढले आहे. आता तर आपत्काळामुळे अहोरात्र संघर्ष चालू आहे. यातीलच एक भाग म्हणून परात्पर गुरु डॉक्टरांवर आक्रमण करण्यासाठी किड्यांच्या, तसेच माश्यांच्या रूपातही मोठ्या वाईट शक्ती येत असल्याने युद्धातील मारक तत्त्वाचा परिणाम म्हणून ईश्‍वरी शक्तीचे प्रक्षेपण होऊन दैवी नियोजनाप्रमाणे त्यांना खोलीतच नष्ट केले जात आहे.

यातून परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीत किडे आणि माश्या मरून पडण्याचे कारण पूर्णपणे वेगळे असल्याचे यातून निदर्शनास येते.’

– एक विद्वान ((सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ ‘एक विद्वान’ या टोपण नावाने लिहितात. (४.१२.२०११, दुपारी २.५०))
२ अ २. खोलीत अचानक वाढलेल्या दाबामुळे डोंगळ्याचा मृत्यू होणे, ही घटना वाईट शक्तींनी दाबाच्या माध्यमातून केलेल्या आक्रमणाचे एक दर्शक असणे

२५.११.२०१२ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत प्रथमच एक डोंगळा मरून पडलेला आढळला. दुसर्‍या दिवसापासून परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीत पुष्कळ अधिक प्रमाणात आणि आश्रमात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात दाब जाणवत आहे. त्यामागील शास्त्र येथे दिले आहे.

‘मोठ्या वाईट शक्ती ‘पृथ्वीतत्त्वाच्या माध्यमातून त्रासदायक शक्ती भूमीलगतच्या पट्ट्यात प्रक्षेपित करून तेथील दाबाचे प्रमाण वाढवतात. या दाबाच्या पट्ट्याचा उपयोग करून तेथील वातावरण जड करण्याचा प्रयत्न केला जातो. जड वातावरणामुळे प्राणवायूच्या वहनास, तसेच चैतन्य आदान-प्रदान करण्याच्या प्रक्रियेतही अडथळा निर्माण होतो. या वातावरणात श्‍वास घेण्यासही अवरोध होऊ लागल्याने गुदमरल्यासारखे होऊ लागते.

हा दाब ३० टक्के झाल्यास कीटक मरून पडतात. दाबाचा परिणाम डोंगळ्यावर झाला आणि तो मेलेला आढळला. या दाबाचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाले, तर माणसाला धाप लागते आणि हेच प्रमाण ७० टक्क्यांच्या वर गेले, तर माणसाचा घुसमटून मृत्यूही येऊ शकतो.’

– एक विद्वान ((सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ ‘एक विद्वान’ या टोपण नावाने लिहितात. (१९.४.२०१४, दुपारी ३.०७))
२ अ ३. खोलीतील युद्धाची तीव्रता एवढी वाढणे की, त्या क्षेत्रात आलेला किडा तत्क्षणी मेल्याने त्याच्या वासाने त्याला लगेचच मुंग्या येणे

खोलीत मरून पडलेल्या किड्याला प्रथमच मुंग्या आल्या. त्याचे कारण येथे दिले आहे.

‘पूर्वी या क्षेत्रात किडे अर्धमेले होत असत; परंतु आता प.पू. डॉक्टरांच्या खोलीतील युद्धाची तीव्रता एवढी वाढली आहे की, त्या क्षेत्रात येणारा किडा तत्क्षण पूर्णपणे गतप्राण झाला. त्याच्या वासाने प्रथमच त्याकडे मुंग्या आकृष्ट झाल्या. जसे मेलेल्या प्राण्याकडे कावळे, गिधाडे आकृष्ट होऊन त्याचे लचके तोडतात, तसेच हे झाले. यातूनच सूक्ष्मातील युद्धाची भीषणता लक्षात येत आहे.’

– एक विद्वान ((सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ ‘एक विद्वान’ या टोपण नावाने लिहितात. २०.९.२०१३, सकाळी ९.१२)
२ अ ३ अ. वाईट शक्तींच्या आक्रमणांमुळे त्या त्या वातावरणात उपद्रवी कीटक आणि किडे यांचा संचार होण्याचे प्रमाण वाढणे अन् त्यानुसार परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीतही मुंग्या येणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत याआधीही किडे मरून पडायचे. तेव्हा त्यांना मुंग्या यायच्या नाहीत. याचे कारण येथे दिले आहे.

‘दिवसेंदिवस वाढत जाणार्‍या सूक्ष्मातील युद्धाच्या भीषणतेमुळे मोठ्या वाईट शक्तींच्या आक्रमणांचे प्रमाणही वाढते, तसे त्या त्या भागात तमोगुणी कीटकांचे, किड्यांचे संचार होण्याचे प्रमाण वाढते. अशा वातावरणात मुंग्या, झुरळे, पाली, कोळी, ढेकूण अशा उपद्रवी कीटकांचा संचार चालू होतो. कोळीष्टकांमध्येही त्रासदायक शक्ती साठवली जाते. भिंतीत बनवल्या जाणार्‍या कीटकांच्या घरांतूनही मोठ्या वाईट शक्ती त्या त्या ठिकाणी स्वतःची त्रासदायक शक्तीची स्थाने निर्माण करतात. उडणार्‍या झुरळांच्या पंख फडफडविण्यातून त्रासदायक कंपने आकृष्ट करून घेऊन वातावरणाला त्रासदायक बनवण्याचा प्रयत्न केला जातो. जेवढे वातावरण चैतन्यमय होत जाते, तेवढे ते दूषित बनवण्याचा प्रयत्न मोठ्या वाईट शक्ती करतात.’

– एक विद्वान ((सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ ‘एक विद्वान’ या टोपण नावाने लिहितात. २०.९.२०१३, दुपारी ३.५१)

२ आ. परात्पर गुरु डॉक्टर रहात असलेल्या खोलीत
माशी मरून पडणे आणि अन्यत्र माशी मरून पडणे यांमधील भेद

टीप १ – परात्पर गुरु डॉक्टर रहात असलेल्या खोलीत माशी आल्यावर तिच्यातील त्रासदायक शक्ती न्यून होऊन ती ५ टक्क्यांची ४ टक्के झाली

२ आ १. परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीत माशीचा मृत्यू होण्यामागील कारण आणि तिला मृत्यूनंतर मिळणारी गती
२ आ १ अ. माशीला परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीत मृत्यू आल्याने तिला पुढची गती मिळणे

परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीत मेलेल्या माशीला तेथील सात्त्विकतेचा लाभ झाला असून तिला पुढची गती मिळाली आहे. एखादा पक्षी, फुलपाखरू यांपैकी कोणत्यातरी एका योनीत तिला पुढील जन्म मिळू शकतो.

२ आ १ आ. मनुष्याच्या तुलनेत माशीवर सात्त्विकतेचा परिणाम अधिक होण्याचे कारण

माशी खालच्या योनीतील असून तिच्यात थोडीच शक्ती असते, तसेच ती संवेदनशील असते. त्यामुळे ती अधिक सात्त्विकता ग्रहण किंवा सहनही करू शकत नाही. मनुष्यात अधिक शक्ती असून त्याचा स्तरही माशीपेक्षा उच्च असल्याने तो अधिक प्रमाणात सात्त्विकता सहन करू शकतो. असे असले, तरी ‘तो कोणत्या वातावरणात आहे ? त्याची आध्यात्मिक पातळी काय आहे ? त्याचे प्रारब्ध कसे आहे ?’ यांवरही ते अवलंबून आहे.’

– (पू.) सौ. योया वाले, युरोप, एस्.एस्.आर्.एफ्. (८.११.२०१४)

 

वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणार्‍यांना विनंती !

‘सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे अनेक बुद्धीअगम्य घटना घडत असतात. त्यांपैकीच एक म्हणजे ९.५.२०१४ या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांची खोली आणि त्यांच्या सज्जांत शेकडो लहान-मोठे किडे आले होते. ३ वेळा किडे मारून दरवाजे आणि खिडक्या यांच्या फटींत कीटकनाशक फवारले, तरीही ते येतच होते. तेव्हा संपूर्ण आश्रमात केवळ या खोलीत आणि खोलीच्या खाली असलेल्या वाहनतळाच्या ठिकाणीच एवढ्या प्रमाणात किडे असल्याचे आढळून आले. या मागील वैज्ञानिकदृष्ट्या कारण कोणते ? कोणत्या वैज्ञानिक उपकरणांद्वारे याचे संशोधन करता येईल ?, या संदर्भात वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणार्‍यांचे साहाय्य लाभल्यास आम्ही कृतज्ञ असू.’

– व्यवस्थापक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(संपर्क : श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर इ-मेल : [email protected])

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Leave a Comment