परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा तोंडवळा, आश्रमातील भिंती आणि साधकांचे शरीर यांवर वाईट शक्तींचे तोंडवळे आणि दैवी आकृत्या दिसणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कपाळावर दिसणारे
शुभचिन्ह ‘ॐ’ आणि वाईट शक्तींचे तोंडवळे हे देवासुर लढ्याचे प्रतीक !

 

१. सप्तलोकांतील दैवी किंवा चांगल्या आणि सप्तपाताळांतील वाईट शक्ती यांत
चालू असणार्‍या लढ्याचे स्थुलातील प्रकटीकरण भूतलावरही विविध रूपांत दिसून येणे

‘प्राचीन काळी ऋषि-मुनी यज्ञयागादी विधी करत. त्या वेळी राक्षस त्यांत विघ्ने आणत. ते ऋषि-मुनींना जिवे मारत आणि गायींना मारून खात. हा इतिहास आपल्याला ठाऊक आहे. प्रत्येक युगात देवासुर लढा निरंतर चालू असतो. कलियुगांतर्गत कलियुगातही तो चालू आहे. सप्तलोकांतील दैवी किंवा चांगल्या आणि सप्तपाताळांतील वाईट शक्ती यांत चालू असणार्‍या या लढ्याचे स्थुलातील प्रकटीकरण भूतलावरही विविध रूपांत दिसून येते. ‘पृथ्वीवरील सात्त्विकता नष्ट करणे आणि दुष्प्रवृत्तींच्या माध्यमातून भूतलावर वाईट शक्तींच्या राज्याची स्थापना करणे’, ही सूक्ष्मातील वाईट शक्तींची ध्येये असतात अन् त्यासाठी त्या प्रयत्न करतात. साधक भूतलावर हिंदु राष्ट्र, म्हणजेच ‘विश्‍वकल्याणार्थ कार्यरत सात्त्विक लोकांचे राष्ट्र’ स्थापण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे वाईट शक्तींचे राज्य स्थापण्यासाठी प्रयत्नशील असणार्‍या वाईट शक्तींच्या प्रयत्नांना खीळ बसते; म्हणून त्या समष्टी साधना करणारे संत आणि साधक यांच्या कार्यात अन् सेवेत विघ्ने आणतात.

२. प्रथम गोव्यातील सनातनचा ‘सुखसागर’
आणि नंतर रामनाथी आश्रम येथील भिंतींवर अन्
काही काळाने साधकांच्या घरी वाईट शक्तींचे तोंडवळे दिसणे

वर्ष २००३ मध्ये प्रथमच गोव्यातील ‘सुखसागर’ येथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील आणि आश्रमातील इतर काही भिंतींवर वाईट शक्तींचे तोंडवळे दिसले. वर्ष २००५ मध्ये परात्पर गुरु डॉक्टर रामनाथी आश्रमात रहाण्यास आले. गेली सुमारे १० वर्षे रामनाथी आश्रमातील भिंतींवर वाईट शक्तींचे तोंडवळे दिसत आहेत. काही काळाने देश-विदेशांतील साधकांच्या घरीही भिंतींवर वाईट शक्तींचे तोंडवळे दिसले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चेहर्‍यावर त्रासदायक तोंडवळे उमटणे

१६.९.२०१८ या दिवशी आरशात पहात असतांना परात्पर गुरु डॉक्टरांना त्यांच्या चेहर्‍यावर वाईट शक्तींचे चेहरे दिसले. त्यानंतर दोन आठवड्यांनी उजव्या हातावरही वाईट शक्तीचा चेहरा दिसला. परात्पर गुरु डॉक्टरांच्या देहातून प्रक्षेपित होणारे चैतन्य ॐ, स्वस्तिक, त्रिशूळ इत्यादींच्या रूपांत त्यांच्या त्वचेवर उमटलेले गेली १० – १५ वर्षे दिसत आहेत. त्यांच्या देहातून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याला प्रतिकार करण्यासाठी वाईट शक्ती परात्पर गुरु डॉक्टरांवर आक्रमणे करतात. वाईट शक्तींच्या आक्रमणाचे परात्पर गुरूंच्या त्वचेवर पुढील स्वरूपात स्थुलातून प्रकटीकरण दिसते.

निरखून पाहिल्यास काही वेळा चेहरे अदृश्य होतांना दिसतात. काही वेळा छायाचित्रकाद्वारे (कॅमेर्‍याद्वारे) छायाचित्रे काढल्यावर ते त्यात दिसत नाहीत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चेहर्‍यावर लहान-मोठे बरेच ॐ आणि त्यांच्या कपाळावर ४० हून अधिक वाईट शक्तींचे चेहरे उमटले आहेत. त्यांतील काही चेहरे या मूळ छायाचित्रासमवेत छापलेल्या ५ छायाचित्रांंद्वारे येथे दाखवले आहेत. (छायाचित्र ‘अ’ पहा.)

अ. वाईट शक्तींच्या चेहर्‍यांंच्या हावभावांमध्ये विविधता आहे. १. काही चिडके, २. काही हसतांना, ३. काही घाबरलेले दिसतात, तर ४. काही चेहरे नुसतेच डोळे विस्फारून पहात आहेत. त्यांचे हावभावही पालटतात. (छायाचित्र ‘आ’, ‘इ’, ‘ई’ पहा.)

आ. वाईट शक्तींच्या चेहर्‍यांच्या आजूबाजूला ‘ॐ, स्वस्तिक आणि त्रिशूळ’ इत्यादी दैवी चिन्हेही उमटलेली आहेत. यांपैकी ‘ॐ’ चे चिन्ह येथील छायाचित्रात दाखवले आहे. ( छायाचित्र क्रमांक ‘उ’ पहा.) त्यामुळे वाईट शक्तींच्या तोंडवळ्यांतून प्रक्षेपित होणार्‍या त्रासदायक स्पंदनांचा परात्पर गुरु डॉक्टरांवर होणारा परिणाम न्यून होतो.

इ. दैवी चिन्हे स्थिर आहेत, तर वाईट शक्तींचे तोंडवळे, त्यांचा आकार आणि हावभाव पालटत असतात.

 

३. साधकांच्या शरिरावर त्रासदायक तोंडवळे उमटणे

काही साधकांच्या साधनेमुळे त्यांच्या शरिरावर शुभचिन्हे उमटतात. व्यष्टी आणि समष्टी साधना करणार्‍या साधकांवरही गेली काही वर्षे त्रासदायक शक्ती आक्रमण करत आहेत. काही साधकांना पूर्वजांचा त्रास असतो. वाईट शक्तींचे तोंडवळे उमटणे, हे स्थुलातून होणारे वाईट शक्तींचे प्रकटीकरण आहे. १३.१०.२०१८ या दिवशी एका साधिकेच्या हातांवर वाईट शक्तींचे तोंडवळे दिसले. (छायाचित्र ‘ऊ’ पहा.)

साधक आणि वाचक यांना संशोधनासाठी साहाय्य करण्याचे आवाहन

या विषयासंदर्भात संशोधन करायचे असल्यामुळे साधक आणि वाचक यांनी छायाचित्रांसह पुढील माहिती लिहून पाठवावी. त्याच्या संदर्भात दुसर्‍या साधकाने माहिती दिली असल्यास तसाही उल्लेख करावा. साधकांची आध्यात्मिक पातळी ज्ञात असल्यास लिहावी.

१. नाव

२. वय

३. जिल्हा

४. करत असलेली सेवा

५. आध्यात्मिक त्रास आहे का ?

६. वाईट शक्तींचे तोंडवळे शरिरावर कुठे दिसतात ?

७. शरिरावर दिसणार्‍या तोंडवळ्यांची संख्या

८. घराच्या भिंतींवर उमटलेल्या वाईट शक्तींच्या तोंडवळ्यांची संख्या

९. वाईट शक्तींचे तोंडवळे उमटण्याचे वर्ष, दिनांक आणि वेळ लक्षात असल्यास, नाहीतर अनुमाने लिहावे.

१०. वाईट शक्तींचे तोंडवळे उमटल्यानंतर झालेले शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, कौटुंबिक इत्यादी प्रकारचे त्रास

११. आकृत्या स्थिर असतात कि अस्थिर ?

१२. इतरत्र, उदा. विविध विधींच्या प्रसंगी, देवतांची चित्रे, झाडे, डोंगर, आकाश, समुद्र, चंद्र, विविध देशांचे नकाशे इत्यादी ठिकाणी दिसणारे वाईट शक्तींचे तोंडवळे

वाचकांना निवेदन !

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहावर दिसलेले हे आकार निरखून पाहिल्यास स्पष्ट दिसतात. त्यामुळे त्यांच्या इतर छायाचित्रांत ते दिसतीलच, असे नाही. वाचकांनी ही चित्रे एकाग्रतेने पहावीत.

२. या आकारांचे मूळ कारण आध्यात्मिक आहे. सूक्ष्म घडामोडींच्या देहावर झालेला परिणामस्वरूप ही दैवी चिन्हे दिसतात. यामुळे ‘ज्यांची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता चांगली आहे, त्यांना ती अधिक सुस्पष्ट दिसतात.’

३. ‘छपाईतील तांत्रिक अडचणींमुळे येथे प्रसिद्ध केलेली छायाचित्रे जशी आहेत, तशी छापून येतीलच’, असे नाही. यावर उपाय म्हणून आणि प्रत्येकाला हे आकार दिसावेत अन् विषय कळावा, यासाठी छायाचित्रांतील आकार संगणकाच्या साहाय्याने अधिक उठावदार केली आहेत, याची नोंद घ्यावी.

सनातनचे साधक करत असलेल्या
आध्यात्मिक संशोधनाकडे शिकण्याच्या दृष्टीकोनातून पहा !

‘सनातनचे साधक आध्यात्मिक संशोधनाच्या दृष्टीकोनातून साधनेमुळे व्यक्तीचे अंतर्मन, बाह्यमन आणि शरीर यांच्यावर होणार्‍या परिणामांचा अभ्यास करत आहेत. या संशोधनाचा एक भाग म्हणून सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या शरिरावर उमटणारी चिन्हे (उदा. ॐ, वाईट शक्तींचे तोंडवळे) सनातन प्रभातच्या नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध होत आहेत. ही चिन्हे कोणत्या कारणांमुळे उमटतात, हे शोधण्यात साहाय्य करण्याविषयी सनातनने वैज्ञानिकांनाही आवाहन केले आहे. ‘जिज्ञासूच ज्ञानाचा अधिकारी असतो’, या उक्तीप्रमाणे साधनेमुळे होणार्‍या परिणामांकडे जिज्ञासू वृत्तीने पाहिले, शिकण्याची आणि विचारण्याची वृत्ती ठेवली, तरच ईश्‍वर या संदर्भातील अमूल्य ज्ञान आपणाला देईल अन्यथा ‘हे खोटे आहे !’, ‘हे असे कसे होऊ शकते ?’, अशा बुद्धीप्रामाण्यवादात अडकल्यास ईश्‍वर भरभरून देत असलेल्या देणगीपासून मुकण्याचा करंटेपणा तुमच्याकडून होईल.’ – संपादक

साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती

‘एकमेकांचा तोंडवळा पाहून ‘कोणाच्या चेहर्‍यावर वाईट शक्तीचा तोंडवळा अथवा शुभचिन्हे दिसतात का ?’, याचा अभ्यास करा. अशा प्रकारे शुभचिन्हे अथवा वाईट शक्तींचे तोंडवळे उमटल्याचे लक्षात आल्यास त्यासंदर्भातील माहिती छायाचित्रासह पाठवावी. छायाचित्रामध्ये दिसणार्‍या तोंडवळ्याभोवती वर्तुळ करून ते छायाचित्र पाठवावे. त्यासोबत मूळ छायाचित्रही पाठवावे.

नमुन्यासाठी काही छायाचित्रे येथे छापली आहेत. शरिराच्या कोणत्याही भागात तोंडवळा दिसल्यास त्या ठिकाणी विभूती लावा आणि त्या ठिकाणी न्यास करून नेहमीचा जप कमीतकमी २ घंटे करा. निराळा जप करण्याची आवश्यकता नाही. यासंदर्भात ‘त्वचा रोगतज्ञ काय सांगतात ?’, याचाही संशोधनाच्या दृष्टीने अभ्यास करता येईल. यासंदर्भात काही प्रश्‍न असल्यास पुढील क्रमांकावर विचारावी आणि माहिती सौ. भाग्यश्री सावंत यांच्या नावे पुढील पत्त्यावर पाठवावी.

पोस्टाचा पत्ता : पोस्ट बॉक्स क्र. ४६, ‘सनातन आश्रम, २४/बी, रामनाथी, फोंडा, गोवा.

संगणकीय पत्ता : [email protected]

भ्रमणभाष क्रमांक : ७०५८८८५६१०

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment