‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल
थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘जीन्स, टी-शर्ट, चुडीदार यांसारखी परकीय परंपरेतून आलेली वेशभूषा ही सध्या हिंदु स्त्रीच्या जीवनशैलीचा अविभाज्य घटक बनली आहे. याउलट हिंदु संस्कृतीची ओळख सांगणार्या पारंपरिक नऊवारी साडीचे अस्तित्व आता बहुतांश खेडेगावापुरतेच सीमित राहिले आहे. व्यक्तीच्या वेशभूषेचा परिणाम नकळत तिच्या मनोवृत्तीवर होत असतो. टी-शर्ट, जीन्स यांसारख्या सध्याच्या प्रचलित राजसिक-तामसिक वेशभूषेमुळे स्त्रीची वृत्ती उच्छृंखल आणि भोगवादी बनते, तर सहावारी अन् नऊवारी साडी या सात्त्विक वेशभूषेमुळे स्त्रीची वृत्ती शालीन आणि धर्माचरणी बनते. धर्माचरणातून ईश्वराप्रती भक्तीभाव निर्माण होऊन व्यक्तीचा प्रवास ईश्वरप्राप्तीकडे होऊ लागतो.
ऑगस्ट २०१८ मध्ये रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘स्त्रीने परकीय परंपरेनुसार (संस्कृतीनुसार) असात्त्विक पोशाख परिधान केल्यावर आणि हिंदु संस्कृतीनुसार सात्त्विक पोशाख परिधान केल्यावर त्यांचा स्त्रीवर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजणीच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.
१. चाचणीचे स्वरूप
या चाचणीत तीव्र आध्यात्मिक त्रास (टीप) असलेल्या एका साधिकेने परकीय परंपरेतून आलेले पुढील ५ पोशाख ‘प्रतिदिन एक’ याप्रमाणे परिधान केले.
१. एका पंथातील पोशाख
२. ‘व्हाईट इव्हिनिंग गाऊन’ (पायघोळ पांढरा झगा)
३. ‘ब्लॅक ट्यूब टॉप ड्रेस’ (‘ऑफ शेल्डर’, म्हणजे खांद्यांकडे उघडा असणारा काळ्या रंगाचा पाश्चात्त्य पोशाख)
४. टी-शर्ट आणि काळी पॅन्ट
५. सलवार-कुडता
त्यानंतर त्या साधिकेने पुढील एक दिवस हिंदु संस्कृतीनुसार सहावारी साडी आणि दुसर्या दिवशी नऊवारी साडी परिधान केली. हा प्रत्येक पोशाख तिने ३० मिनिटे परिधान केला. साधिकेने प्रत्येक दिवशी चाचणीतील पोशाख परिधान करण्यापूर्वी आणि परिधान केल्यानंतर तिच्या ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजणीच्या नोंदी करण्यात आल्या. या केलेल्या सर्व मोजणीच्या नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.
टीप – आध्यात्मिक त्रास : आध्यात्मिक त्रास असणे, म्हणजे व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.टी.एस्’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या संकेतस्थळाच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.
२. केलेल्या मोजणीच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन
२ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन
२ अ १. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेने एका पंथातील पोशाख, ‘व्हाईट इव्हिनिंग गाऊन’, ‘ब्लॅक ट्यूब टॉप ड्रेस’ अन् ‘टी-शर्ट आणि काळी पॅन्ट’ हे पोशाख परिधान केल्यावर तिच्यातील ‘इन्फ्रारेड’ या नकारात्मक ऊर्जेत वाढ होणे; पण तिने सलवार-कुडता परिधान केल्यावर तिच्यातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होणे
तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेमध्ये आरंभी ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा होती. नकारात्मक ऊर्जा मोजतांना साधिकेच्या संदर्भात प्रत्येक वेळी ‘यू.टी.’स्कॅनरच्या भुजांनी १८० अंशाचा कोन केल्याने तिच्यातील त्या नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ मोजता आली. साधिकेने परकीय पोशाख परिधान केल्यावर तिच्यातील नकारात्मक ऊर्जेत झालेली वाढ पुढे दिली आहे.
टीप १ – तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेने सलवार-कुडता परिधान केल्यावर तिच्यातील ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली. त्यामुळे त्या ऊर्जेत १.५७ मीटर घट झाली.
२ अ २. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेने एका पंथातील पोशाख, ‘व्हाईट इव्हिनिंग गाऊन’, ‘ब्लॅक ट्यूब टॉप ड्रेस’ अन् ‘टी-शर्ट आणि काळी पॅन्ट’ हे पोशाख परिधान केल्यावर तिच्यातील ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जेत वाढ होणे; पण तिने सलवार-कुडता परिधान केल्यावर तिच्यातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होणे
तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेमध्ये आरंभी ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा होती. तिने परकीय पोशाख परिधान केल्यावर तिच्यातील ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जेत झालेली वाढ पुढे दिली आहे.
टीप २ – तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेने ‘व्हाईट इव्हिनिंग गाऊन’ परिधान करण्यापूर्वी तिच्यामध्ये ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा नव्हती; पण तिने तो पोशाख परिधान केल्यावर तिच्यामध्ये ती नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.
टीप ३ – तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेने सलवार-कुडता परिधान केल्यावर तिच्यातील ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली. त्यामुळे त्या ऊर्जेत १.४५ मीटर घट झाली.
वरील सूत्रांतून असे लक्षात येते की, एका पंथातील पोशाख परिधान केल्यावर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेतील दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जांमध्ये सर्वाधिक प्रमाणात वाढ झाली.
२ अ ३. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेने सहावारी साडी आणि नऊवारी साडी नेसल्यावर तिच्यातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होणे
तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेमध्ये आरंभी ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जा होत्या. तिने सहावारी साडी आणि नऊवारी साडी नेसल्यावर तिच्यातील त्या नकारात्मक ऊर्जा नाहीशा झाल्या.
टीप ४ – तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेने सहावारी साडी नेसल्यावर तिच्यातील ‘अल्ट्राव्हायोलेट’ आणि ‘इन्फ्रारेड’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा नाहीशा झाल्या.
टीप ५ – तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेमध्ये नऊवारी साडी नेसण्यापूर्वी ‘अल्ट्राव्हायोलेट’ आणि ‘इन्फ्रारेड’ या नकारात्मक ऊर्जांपैकी केवळ ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा होती. तिने नऊवारी साडी नेसल्यावर तिच्यातील ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली.
२ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन
२ आ १. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेमध्ये आरंभी सकारात्मक ऊर्जा नसणे आणि तिने एका पंथातील पोशाख, ‘ब्लॅक ट्यूब टॉप ड्रेस’, ‘व्हाईट इव्हिनिंग गाऊन’ अन् ‘टी-शर्ट आणि काळी पॅन्ट’ हे पोशाख परिधान केल्यानंतरही तिच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण न होणे; पण तिने सलवार-कुडता परिधान केल्यावर तिच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे
सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेमध्ये आरंभी सकारात्मक ऊर्जा मुळीच नव्हती. तिने एका पंथातील पोशाख, ‘ब्लॅक ट्यूब टॉप ड्रेस’, ‘व्हाईट इव्हिनिंग गाऊन’ अन् ‘टी-शर्ट आणि काळी पॅन्ट’ हे पोशाख परिधान केल्यानंतर तिच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली नाही. तिने सलवार-कुडता परिधान केल्यावर मात्र तिच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. त्या ऊर्जेची प्रभावळ १.२९ मीटर होती.
२ आ २. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेने सहावारी साडी आणि नऊवारी साडी नेसल्यावर तिच्यामध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे
तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेमध्ये आरंभी सकारात्मक ऊर्जा मुळीच नव्हती. तिने सहावारी साडी आणि नऊवारी साडी नेसल्यावर तिच्यामध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन तिची प्रभावळ अनुक्रमे २.३३ मीटर आणि ३.५८ मीटर होती.
२ इ. एकूण प्रभावळीच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन
२ इ १. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेने परकीय संस्कृतीनुसार परिधान केलेल्या पोशाखांपैकी ‘एका पंथातील पोशाख’ परिधान केल्यावर तिच्या एकूण प्रभावळीत सर्वाधिक प्रमाणात वाढ होणे, तर तिने सलवार-कुडता परिधान केल्यावर तिच्या एकूण प्रभावळीत सर्वांत अल्प प्रमाणात वाढ होणे
सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेने परकीय संस्कृतीनुसार पोशाख परिधान केल्यानंतर तिच्या एकूण प्रभावळीत झालेली वाढ पुढे दिली आहे.
२ इ २. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेने सहावारी साडी नऊवारी साडी नेसल्यावर तिच्या एकूण प्रभावळीत पुष्कळ प्रमाणात वाढ होणे
वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण ‘सूत्र ३’ मध्ये दिले आहे.
३. केलेल्या मोजणीच्या नोंदींचेे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
३ अ. परकीय परंपरेनुसार (संस्कृतीनुसार) असलेले कपडे हे रज-तमप्रधान
असल्याने या कपड्यांच्या माध्यमातून वाईट शक्तींचा (टीप) शरिरात शिरकाव होण्याची
शक्यता असणे आणि ते कपडे घातल्याने वातावरणात त्रासदायक स्पंदनांची निर्मिती होणे
फ्रॉक, स्कर्ट, मिडी, शर्ट-पँट, अर्धी पॅन्ट, जीन्स-टी-शर्ट, पंजाबी वेश (यातील सलवार सैलसर असते.), चुडीदार (यातील सलवार पायांना घट्ट बसणारी आणि चुण्या असणारी असते.), पायघोळ झगा (गाऊन) इत्यादी कपडे हे रज-तमप्रधान असल्याने या कपड्यांच्या माध्यमातून वाईट शक्तींचा शरिरात शिरकाव होण्याची शक्यता वाढते. तसेच हे कपडे घातल्याने वातावरणात त्रासदायक स्पंदनांची निर्मितीही होते. परकीय परंपरेतून आलेल्या अन्य कपड्यांच्या तुलनेत त्यातल्यात्यात सात्त्विक असलेला सलवार-कुडता वेश (पोशाख) आता हिंदु संस्कृतीत इतका रुळला आहे की, हिंदूंना तो आपलाच वाटू लागला आहे !
टीप – वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत.
३ आ. साडी नेसल्यावर स्त्रीमधील शक्तीतत्त्व
कार्यरत होऊन भावाप्रमाणे त्याचे प्रमाण न्यून-अधिक होणे
‘साडी नेसल्यामुळे स्त्रीमधील शक्तीतत्त्व कार्यरत होण्यास साहाय्य होते. पंजाबी वेश (सलवार-कुडता) घातल्यामुळे ती कार्यरत शक्ती स्थूलदेहात अप्रकट अवस्थेतच रहाते. साडी नेसल्यानंतर कार्यरत शक्तीचा व्यास जिवाच्या स्थूलदेहापासून ५ फुटांपर्यंत निर्माण होतो. जिवाच्या भावाप्रमाणे त्याचे प्रमाण न्यून-अधिक होते.’- सौ. रंजना गौतम गडेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
३ इ. स्त्रियांनी नऊवारी साडी नेसल्याने स्त्रियांचे
पंचप्राण कार्यरत होऊन शरिरात सगळीकडे चैतन्य संक्रमित होणे
‘नऊवारी साडीला घड्यांचे अनेक स्तर असल्याने या साडीची इतर वस्त्रांपेक्षा आवश्यकतेनुसार चैतन्य ग्रहण करणे, प्रक्षेपित करणे आणि धरून ठेवणे ही क्षमता जास्त असते. नऊवार घडीतील आतला स्तर चैतन्य धरून ठेवण्याचे, मधला स्तर चैतन्य ग्रहण करण्याचे आणि बाहेरील स्तर चैतन्य प्रक्षेपणाचे कार्य करतो. नऊवारी साडीतील कटीच्या (कमरेच्या) लगत असलेल्या गाठीत चैतन्य साठून राहिल्याने, या चैतन्याच्या संपर्कामुळे मणिपुरचक्राच्या सभोवती असलेले पंचप्राण कार्यरत होऊन, यथावकाश शरिरात सगळीकडे चैतन्य संक्रमित होते.’
– एक विद्वान, ६.५.२००५ (सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचे लिखाण ‘एक विद्वान’, ‘गुरुतत्त्व’ आदी नावांनी प्रसिद्ध आहे.)
३ ई. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेने परकीय परंपरेनुसार
एका पंथातील पोशाख, ‘व्हाईट इव्हिनिंग गाऊन’, ‘ब्लॅक ट्यूब टॉप ड्रेस’ आणि ‘टी-शर्ट अन्
काळी पॅन्ट’ हे असात्त्विक पोशाख परिधान केल्यामुळे तिच्यातील नकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ होणे
असात्त्विक पोशाखांकडे वातावरणातील नकारात्मक स्पंदने आकृष्ट होतात, हे वरील सूत्रांतून लक्षात येते. एका पंथातील पोशाख, ‘व्हाईट इव्हिनिंग गाऊन’, ‘ब्लॅक ट्यूब टॉप ड्रेस’ आणि ‘टी-शर्ट अन् काळी पॅन्ट’ हे परकीय परंपरेनुसार (संस्कृतीनुसार) असलेले पोशाख असात्त्विक असल्याने ते तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेने परिधान केल्यावर तिच्याकडे पुष्कळ प्रमाणात नकारात्मक स्पंदने आकृष्ट झाली. त्यामुळे तिच्यावर पुढील हानीकारक परिणाम झाले.
१. या साधिकेला वाईट शक्तींचा तीव्र त्रास आहे. त्यामुळे तिच्यामध्ये आधीपासूनच नकारात्मक स्पंदने होती. तिने परकीय परंपरेनुसार आलेले असात्त्विक पोशाख परिधान केल्यावर तिच्याकडे वातावरणातील नकारात्मक स्पंदने पुष्कळ प्रमाणात आकृष्ट झाली. त्यामुळे तिच्यातील नकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ वाढ झाली.
२. तिच्या एकूण प्रभावळीत त्या नकारात्मक स्पंदनांची भर पडल्याने तिच्या एकूण प्रभावळीत वाढ झाली.
३. तिने परिधान केलेल्या एका पंथातील पोशाखामुळे तिला सर्वाधिक प्रमाणात हानी झाली. याचे कारण या पोशाखाने संपूर्ण शरीर झाकले जाते, तसेच त्याचा रंगही काळा आहे. त्यामुळे त्या पोशाखाकडे सर्वाधिक प्रमाणात नकारात्मक स्पंदने आकृष्ट झाली. त्या खालोखाल उतरत्या क्रमाने हानीकारक परिणाम त्या साधिकेने अनुक्रमे ‘ब्लॅक ट्यूब टॉप ड्रेस’, ‘व्हाईट इव्हिनिंग गाऊन’ आणि ‘टी-शर्ट आणि काळी पॅन्ट’ हे पोशाख परिधान केल्यावर झालेले चाचणीतून दिसून आले.
३ उ. परकीय परंपरेतून आलेल्या अन्य कपड्यांच्या तुलनेत त्यातल्या
त्यात सात्त्विक असलेला सलवार-कुडता हा पोशाख परिधान केल्यावर झालेला परिणाम
परकीय परंपरेतून आलेल्या अन्य कपड्यांच्या तुलनेत त्यातल्या त्यात सात्त्विक असलेला सलवार-कुडता हा पोशाख परिधान केल्यावर साधिकेला काही प्रमाणात चैतन्य मिळाल्याने तिच्यातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली आणि तिच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. तिच्या एकूण प्रभावळीतील नकारात्मक स्पंदने नाहीशी होऊन तिच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याने तिच्या एकूण प्रभावळीत थोडी वाढ झाली.
३ ऊ. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेने सहावारी आणि नऊवारी
साडी नेसल्यावर तिला पुष्कळ प्रमाणात चैतन्य मिळाल्याने तिला ‘तिच्यातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होणे, तिच्यामध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे अन् तिची एकूण प्रभावळ वाढणे
सहावारी साडी सात्त्विक आहे. नऊवारी साडी सहावारी साडीपेक्षाही अधिक सात्त्विक आहे. सात्त्विक पोशाखांकडे सकारात्मक स्पंदने (चैतन्य) आकृष्ट होतात. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेने सहावारी साडी आणि नऊवारी साडी नेसल्यावर तिला पुष्कळ प्रमाणात चैतन्य मिळाले. त्यामुळे तिला पुढीलप्रमाणे आध्यात्मिक स्तरावरील लाभ झाले.
१. तिच्याकडे पुष्कळ प्रमाणात सकारात्मक स्पंदने (चैतन्य) आकृष्ट झाल्याने तिच्यातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली आणि तिच्यामध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.
२. तिच्या एकूण प्रभावळीतील नकारात्मक स्पंदने नाहीशी झाल्याने, तसेच तिच्यामध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याने तिच्या एकूण प्रभावळीत पुष्कळ वाढ झाली.
४. हिंदु संस्कृतीचे जतन आणि जोपासना
करण्यासाठी स्त्रियांनी नियमितपणे साडी नेसणे आवश्यक !
हिंदु धर्मात स्त्रियांनी साडी नेसण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आताच्या स्त्रियांनी साडी न नेसता पाश्चात्त्य पद्धतीचे कपडे परिधान केले, तर भावी पिढीवरही पाश्चात्त्य पद्धतीचा वेश परिधान करण्याचे संस्कार होतील. हिंदु संस्कृतीचेे जतन आणि जोपासना करण्यासाठी सर्वच स्त्रियांनी नियमितपणे साडी नेसून धर्माचा अभिमान राखावा. नियमितपणे साडी नेसणे शक्य नसल्यास सण, उत्सव, धार्मिक विधी आणि काही चांगल्या तिथी यांच्या प्रसंगी तरी आवर्जून साडी नेसावी.
थोडक्यात सांगायचे, तर ‘स्त्रियांनी टी-शर्ट, गाऊन, अंगप्रदर्शन करणारी तोकडी वस्त्रे यांसारखे परकीय परंपरेतून आलेले पोशाख परिधान करणे अतिशय हानीकारक असल्याने ते त्यागून हिंदु संस्कृतीनुसार आध्यात्मिक लाभ मिळवून देणारी सहावारी साडी आणि नऊवारी साडी नेसणे श्रेयस्कर आहे’, हे या वैज्ञानिक चाचणीतून स्पष्ट झाले.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१.१०.२०१८)
ई-मेल : [email protected]
वाईट शक्तींचा त्रास असलेल्यांना परकीय
परंपरेनुसार (संस्कृतीनुसार) असलेले कपडे आवडणे
‘वाईट शक्तींचा त्रास असलेल्या काही साधिकांकडून त्यांच्या लहानपणापासूनच्या कपड्यांच्या आवडी-निवडींविषयी जाणून घेतले. त्यांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे आहे.
१. एका साधिकेला लहानपणापासून मुलांप्रमाणे जीन्सची पॅन्ट-शर्ट घालणे पुष्कळ (खूप) आवडत असे. नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यासमवेत असतांना ती असेच कपडे वापरत असे.
२. दुसर्या साधिकेला साधनेत येण्यापूर्वी पाश्चात्त्य पद्धतीचे कपडे, उदा. शर्ट-पॅन्ट, फ्रॉक, स्कर्ट-टॉप आदी कपडे पुष्कळ आवडायचे आणि तेच कपडे वापरण्याकडे तिचा कल असायचा. तिला आखूड कपडे घालण्याची इच्छा व्हायची.
३. तिसर्या साधिकेला साधनेत येण्यापूर्वी भडक रंगांचे, चमकदार कपडे आवडायचे. तिला जीन्सची पॅन्ट आणि शर्ट घालणे भरपूर आवडत असे. याउलट तिला सात्त्विक कपडे आवडत नव्हते. साधनेत आल्यानंतर तिला सौम्य रंगाचे आणि काही प्रमाणात चमकीचेकपडे घालावेसे वाटू लागले.
४. चौथ्या साधिकेला लहानपणापासून एक विशिष्ट प्रकारचा पांढर्या रंगाचा फ्रॉक फार आवडायचा. त्यामुळे अगदी तसाच पांढरा फ्रॉक मिळवण्यासाठी तिने अगदी पहिलीत असल्यापासून ते वयाच्या १६ व्या वर्षापर्यंत प्रयत्न केले. तिला पांढरा फ्रॉक मिळायचा; मात्र तिला हवा तसा मिळायचा नाही. त्यामुळे तिची चिडचीड होत असे. त्या फ्रॉकशी थोडे साम्य असलेला पांढरा फ्रॉक तिच्या बहिणीने शिवला. शेवटी तोच ती आवडीने महाविद्यालयात असेपर्यंत घालत होती.
५. पाचव्या साधिकेला काळ्या रंगाचा पायघोळ झगा (गाऊन) फार आवडत असे.
निष्कर्ष
सात्त्विक व्यक्तींना सात्त्विक वस्तू आवडतात. त्याप्रमाणेच तामसिक व्यक्तींना तामसिक वस्तू आवडतात. आपण आपल्या सवयींचे निरीक्षण केल्यास आपल्याला आपला स्वभाव सत्त्वप्रधान आहे कि तमप्रधान आहे, हे सहज लक्षात येईल. आपला स्वभाव तमप्रधान असणे, हे बहुतांश आपल्याला असलेल्या वाईट शक्तींच्या त्रासामुळे असते. त्यामुळे ‘तमप्रधान प्रवृत्तीच्या व्यक्तींना तोकडे कपडे आवडणे, साडीपेक्षा फ्रॉक आवडणे यांसारख्या आवडीनिवडी असतात’, असे दिसून येते; कारण त्यांतून वाईट स्पंदने मिळतात. वाईट शक्तींचा त्रास असलेल्या वरील काही साधिकांचे अनुभव हेच दर्शवतात. साधनेमुळे त्रास अल्प होऊ लागला की, आवडी-निवडींमध्ये आश्चर्यकारक पालट होऊ लागतात. आपल्यालाही अशा तामसिक आवडी-निवडी असल्यास ‘आपल्याला वाईट शक्तींचा त्रास आहे’, हे ओळखून त्या आवडी-निवडी पालटायला हव्यात. त्यासाठी साधना करायला हवी.’