
बेंगळूरू – येथील राजराजेश्वरी नगरामध्ये ३० सप्टेंबर या दिवशी ‘प्रथम कन्नड साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले होते. या ठिकाणी सनातन संस्थेकडून ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. या वेळी संमेलनाचे अध्यक्ष असणारे चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते श्री. सुचेंद्र प्रसाद यांनी सनातनच्या साधकांना स्मरणिका देऊन त्यांचा सत्कार केला. या वेळी सनातनचे साधक सर्वश्री मंजुनाथ यडीयुर, मनू कुमार आणि सुनील हे उपस्थित होते.