संतांचे आशीर्वाद

प.पू. भक्‍तराज महाराज

‘सनातन मी चालवीन !’

प.पू. भक्‍तराज महाराज (प.पू. बाबा) एकदा पलंगावर पहुडले होते. मी तेथेच उभा होतो. मध्येच ते ताडकन उठले आणि बोट पुढे करून म्हणाले, ‘‘सनातन मी चालवीन !’’ – श्री. अनिल जोग, इंदूर

 

 

प.पू. रामानंद महाराज, इंदूर, मध्यप्रदेश

निष्ठा, त्याग, सेवा आणि सदाचार यांमुळे सनातन संस्था व्यापक रूप धारण करील !

सनातन संस्थेची स्थापना श्रीमद् सद्गुरु भक्‍तराज महाराज यांच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने झाली. त्यांच्या आशीर्वादाने आज छोट्या रोपाचे रूपांतर एका विशाल वटवृक्षाच्या रूपात झालेले दिसत आहे. त्याचे एकच कारण आहे आणि ते म्हणजे साधकांनी सर्वस्वाचा त्याग करून संस्थेचे कार्य निष्ठेने अन् प्रेमाने केले आणि करत आहेत. सनातन संस्था दिवसेंदिवस व्यापक रूप धारण करील. केवळ निष्ठा, त्याग, सेवा आणि सदाचार या चार गोष्टींमुळेच हे साध्य होणार आहे, अशी माझी निश्‍चिती आहे. गुरुचरणी हीच प्रार्थना !’ – प.पू. रामानंद महाराज, इंदूर, मध्यप्रदेश.

 

जगद्‍गुरु श्री शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती, कांची कामकोटी पीठ

सनातन संस्थेचे कार्य घराघरांत पोहोचल्यामुळे भ्रष्टाचार आणि दुराचार यांचे निर्मूलन होईल !

सनातन संस्था सध्या समाजाला धर्माचरणाचे महत्त्व पटवून देऊन धर्मजागृतीचे कार्य मोठ्या परिश्रमाने करत आहे. सनातन संस्थेचे हे कार्य देशभर पसरेल. सनातन संस्था घराघरांत सर्व वयोगटांतील लोकांना धर्माचरणाचे महत्त्व सांगत आहे. तिला सर्वांनी सहकार्य करायला हवे. त्यातून भ्रष्टाचार आणि दुराचार यांचे निर्मूलन होईल. सनातन संस्थेचे कार्य उत्तम प्रकारे चालू आहे. दुष्ट शक्‍तींचा विनाश करून चांगल्या शक्‍ती निर्माण करणे, हे कार्य मनुष्यजिवाकडून घडणे अभिप्रेतच आहे. नेमके हेच कार्य सनातन संस्था करत असून ते यशस्वी होईल.’ – जगद्‍गुरु श्री शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती, कांची कामकोटी पीठ.

 

प.पू. आचार्य धर्मेंद्रजी महाराज, विश्‍व हिंदु परिषद

जे शाश्‍वत आहे, तेच सनातन आहे. प.पू. डॉ. आठवले यांनी संस्थेला ‘सनातन’ म्हणून दिलेले नाव, हे शाश्‍वत असल्याने ते योग्यच आहे !’ – प.पू. आचार्य धर्मेंद्रजी महाराज, विश्‍व हिंदु परिषद.

 

 

ब्रह्मर्षी डॉ. प.वि. वर्तक, पुणे

धर्मरक्षणाचे पवित्र कार्य करण्यासाठी सनातनने पुढाकार घेतला आहे. माझा सनातनला या कार्याला पूर्ण पाठिंबा आहे !’ – ब्रह्मर्षी डॉ. प.वि. वर्तक, पुणे.

 

 

समर्थभक्‍त पू. सुनील चिंचोलकर

सध्याच्या कठीण काळात
हिंदु धर्मासाठी केवळ सनातन संस्था हाच आधार !

समर्थ रामदासस्वामी यांनी राष्ट्र आणि धर्म यांसाठी जे कार्य केले, तेच कार्य सनातन संस्था करत आहेत. ज्यांना धर्माविषयी काही करायचे असेल, त्यांनी या धर्मकार्यात सहभागी व्हावे. सध्याच्या कठीण काळात हिंदु धर्मासाठी केवळ सनातन संस्था हाच आधार आहे; म्हणूनच मला सनातन आणि सनातनचे संस्थापक प.पू. डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी अत्यंत आदर आहे.’ – समर्थभक्‍त पू. सुनील चिंचोलकर.

 

प.पू. गगनगिरी महाराजांचे
शिष्य प.पू. उल्हासगिरी महाराज, रत्‍नागिरी

सनातनचे साधक प.पू. गगनगिरी महाराजांनी
मला सांगितल्याप्रमाणे राष्ट्र आणि धर्माची सेवा करत आहेत !

‘प.पू. गगनगिरी महाराजांनी मला राष्ट्र आणि धर्माची सेवा करण्यास सांगितली. ही सेवा आज खर्‍या अर्थाने सनातनचे साधकच करत आहेत. ते माझ्या गुरूंच्या शिकवणीप्रमाणे करत असल्याने मला त्यांच्याविषयी जिव्हाळा, प्रेम वाटते. सनातनचे साधक कुठलाही स्वार्थ मनात न ठेवता निरपेक्षपणे सेवा करत असल्याने आमचे त्यांच्याकडे विशेष लक्ष आहे आणि सदैव राहील. मी साधकांच्या सतत पाठीशी राहीन !’ – प.पू. गगनगिरी महाराजांचे शिष्य प.पू. उल्हासगिरी महाराज, रत्‍नागिरी.

 

प.पू. मोहनबुवा रामदासी, सज्जनगड

‘अधर्माच्या विरोधात सनातन संस्था देत असलेला लढा स्पृहणीय आहे !’ – प.पू. मोहनबुवा रामदासी, सज्जनगड.

Leave a Comment