श्री गणेशाचा नामजप !

Article also available in :

 

श्री गणपति Ganpati
श्री गणपति

भक्‍तीभाव लवकर निर्माण होण्यासाठी अन् देवतेच्या तत्त्वाचा अधिकाधिक लाभ होण्यासाठी नामजपाचा उच्चार योग्य असणे आवश्यक आहे. श्री गणेशाचे नामजप कसे करावेत, ते जाणून घेऊया.

 

१. ‘ॐ गँ गणपतये नमः ।’ हा श्री गणेशाचा तारक नामजप ऐका


१. ‘श्री गणेशाय नमः ।’ हा नामजप ऐका

<br />सात्त्विक नामपट्टी
सात्त्विक नामपट्टी

 

खालील सूक्ष्म-चित्र मोठ्या आकारात पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा !

भगवंताच्या प्राप्तीसाठी करावयाच्या युगपरत्वे वेगवेगळ्या उपासना होत्या. ‘कलियुगी नामची आधार’, असे संतांनी सांगितले आहे. याचा अर्थ, कलियुगात नामजप हीच साधना आहे. आता आपण ‘श्री गणेशाचा ‘ॐ गँ गणपतये नमः ।’ हा नामजप कसा करावा’, ते समजून घेऊया.

नामजप भावपूर्ण करावा !

देवतेचा नामजप भावपूर्ण झाला, तरच तो देवापर्यंत लवकर पोहोचतो. नामजप करतांना त्यातील अर्थाकडे लक्ष देऊन केला, तर तो अधिक भावपूर्ण होण्यास साहाय्य होते. ‘ॐ गँ गणपतये नमः ।’ या नामजपातील ‘ॐ’ हे ईश्‍वरवाचक आहे आणि ‘गँ ‘ हा मूळ बीजमंत्र आहे. बीजमंत्र ‘गँ ’ हे अक्षर ईश्‍वराच्या निर्गुण रूपाचे प्रतीक आहे, तर ‘गणपतये’ ही अक्षरे ईश्‍वराच्या सगुण रूपाची प्रतीक आहेत. ‘नमः’ म्हणजे नमस्कार करतो. ‘ॐ गँ गणपतये नमः ।’ हा नामजप करतांना नामजपात तारक भाव येण्यासाठी ‘नमः’ या शब्दावर जोर न देता तो हळूवारपणे म्हणावा. या वेळी ‘आपण श्री गणेशाला साष्टांग नमस्कार करत आहोत’, असा भाव ठेवावा. ‘गणपतये’ या शब्दानंतर थोडा वेळ थांबून त्यानंतर ‘नमः’ हा शब्द म्हणावा. येथे सांगितल्याप्रमाणे आपल्यालाही शास्त्रशुद्ध पद्धतीने श्री गणेशाचा नामजप करून अनुभूती घेता येवो, अशी श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना आहे. देवतेच्या तारक किंवा मारक रूपाशी संबंधित नामजप म्हणजे तारक किंवा मारक नामजप. येथे आवर्जून लक्षात ठेवण्यायोग्य सूत्र म्हणजे इतर दिवसांपेक्षा गणेश चतुर्थीला श्री गणेशाचे तत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटीने अधिक प्रमाणात कार्यरत असते; म्हणून या तिथीला ‘ॐ गँ गणपतये नमः ।’ हा नामजप अधिकाधिक करावा आणि गणेशतत्त्वाचा लाभ करून घ्यावा.

संतांच्या मार्गदर्शनानुसार म्हटलेला नामजप !

येथे देण्यात आलेल्या नामजपाचे वैशिष्ट्य म्हणजे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार हा नामजप सनातनच्या साधिका कु. तेजल पात्रीकर यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने म्हटला आहे.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘श्री गणपति’

गँ गणपतये नमः । या बीजमंत्रातील गँ चा उच्चार करण्याची पद्धत

गं गणपतये नमः । हा बीजमंत्र गँ गणपतये नमः । असाही लिहितात. यातील  गवरील अर्धचंद्र हे अनुनासिकाचे चिन्ह आहे. त्यामुळे गँ याचा उच्चार गॅम् असा नसून गङ् असा आहे. संस्कृत उच्चारशास्त्रानुसार गम् गणपतये नमः । यापेक्षा गङ् गणपतये नमः । असे म्हणणे अधिक योग्य आहे. – वैद्य मेघराज पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.१.२०१८)

Leave a Comment