आध्यात्मिक संज्ञांचा अर्थ

सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रकार काढत असलेल्या चित्रांना प्रमाणित करण्यासाठी त्यांना जाणवत असलेल्या विविध स्पंदनांना कोणत्या संज्ञा वापरायच्या, हे निश्‍चित केले आहे. त्या संज्ञा आणि त्यांचा अर्थ पुढे दिला आहे. स्पंदने चढत्या स्तराच्या क्रमाने घेतली आहेत. त्यावरून एका गटातील स्पंदनांमध्ये कार्यकारी कनिष्ठ ते उच्च स्तर कसा असतो, हेही लक्षात येईल.

संज्ञा

अर्थ

१. अहं

अहंकार

२. शक्‍ती

अ. अप्रकट शक्‍ती

संत आणि देवता यांच्या स्तरांवरील अकार्यरत शक्‍ती

आ. प्रकट शक्‍ती

कार्यरत शक्‍ती

आ १. तारक शक्‍ती

साधनेत साहाय्यभूत असणारी आणि संकटापासून तारणारी शक्‍ती

आ २. मारक शक्‍ती

त्रास दूर करणारी शक्‍ती

इ. प्राणशक्‍ती

देहाला चेतना देणारी शक्‍ती

ई. विघटन शक्‍ती

वाईट शक्‍ती / रज-तम यांचे विघटन करणारी शक्‍ती

३. भावना आणि भाव

अ. भावना

मानसिक स्तरावरील जाणीव / संवेदना

आ. भाव

ईश्‍वराविषयी वाटणारी आत्मियता / जवळीक

आ १. व्यक्‍त भाव

भावाचे प्रकटीकरण होणे, अनुभूती येणे

आ २. अव्यक्‍त भाव

भाव अप्रकट असणे

इ. कृतज्ञता भाव

कृतज्ञ असण्याचा भाव

ई. शरणागत भाव

शरण असण्याचा भाव

उ. प्रेमभाव (प्रीती)

दुसर्‍यातील देवत्वाला स्मरून प्रेम करणे (निरपेक्ष प्रेम)

ऊ. ईश्‍वरेच्छाभाव

ईश्‍वराच्या इच्छेप्रमाणे वागणे

ए. साक्षीभाव

प्रसंगाकडे अलिप्ततेने पहाणे

ऐ. भक्‍ती

देवाशी एकरूप होण्याची प्रक्रिया

४. चैतन्य

अ. निर्गुण चैतन्य

अकार्यरत चैतन्य

आ. सगुण चैतन्य

कार्यरत चैतन्य

५. आनंद

अ. परमानंद

परब्रह्मानंद (सर्वोच्च ब्रह्मानंद) (परमेश्‍वराशी संबंधित)

आ. आनंद

ब्रह्मानंद, त्रिगुणातीत झाल्यावर होणारा ईश्‍वराशी संबंधित आनंद

६. शांती

जिवाला अनुभवता येणारी ब्रह्माशी संबंधित शून्यावस्था

७. तत्त्व

अ. गुरुतत्त्व

साधकाला मार्गदर्शन करणारी ईश्‍वरी शक्‍ती

आ. देवतातत्त्व (उदा. गणेशतत्त्व)

देवतेचे तत्त्व

८. पंचतत्त्व

अ. पृथ्वीतत्त्व

गंधाची अनुभूती येते

आ. आपतत्त्व

चवीची अनुभूती येते

इ. तेजतत्त्व

प्रकाशाची अनुभूती येते

ई. वायुतत्त्व

स्पर्शाची अनुभूती येते

उ. आकाशतत्त्व

नादाची अनुभूती येते

९. वाईट शक्‍ती

अ. त्रासदायक शक्‍ती

त्रास अनुभवता येतो अशी शक्‍ती

आ. काळी शक्‍ती

वाईट शक्‍तीकडून येणारी शक्‍ती

इ. आकर्षण शक्‍ती

वातावरणातील वाईट शक्‍ती किंवा चांगली शक्‍ती आकृष्ट करणारी शक्‍ती

ई. मायावी शक्‍ती

फसवी शक्‍ती

उ. मोहिनी शक्‍ती

इतरांना आकर्षित करणारी वाईट शक्‍ती

१०. साधकात प्रकट होणारी शक्‍ती

अ. प्रकट वाईट शक्‍ती

वाईट शक्‍तीचे रूप

Leave a Comment