एके काळी विश्वात हिंदु संस्कृतीचाच प्रभाव असणे
‘गणेशभक्ती करणारे भृशुंडीऋषि, गणकऋषि, पराशरऋषि आदी अनेक ऋषिमुनी या पवित्र भारतभूमीत होऊन गेले. या थोर ऋषिमुनींचे आदर्श जीवनचरित्र आणि उज्ज्वल वाङ्मय संपूर्ण जगताचे चिरंतन प्रेरणास्थान आहे. प्राचीन काळापासून जगातील अनेक देशांनी भारतातील आर्यांच्या श्रेष्ठतम हिंदु धर्माचे अनुसरण केले आहे. एके काळी संपूर्ण विश्वात केवळ हिंदूंच्या गौरवशाली संस्कृतीचाच प्रभाव होता. याचे अनेक ठोस पुरावे आजही उपलब्ध आहेत.
‘जपानमध्ये आजही श्री सरस्वती, श्री लक्ष्मी, ब्रह्मदेव आणि श्री गणेश या हिंदु देवतांची पूजाअर्चा श्रद्धेने केली जाते. जपानी जीवनात ज्ञान आणि आपुलकी या सद्गुणांतून प्राप्त होणार्या शक्तींचे प्रतीक म्हणजे श्री गणेशाचे स्वरूप असे मानले जाते. ११ व्या शतकातील ‘श्री गणेश मंदिर’ हे येथील सर्वांत प्राचीन मंदिर आहे.
अ. इ.स. पूर्व ८०६ मध्ये ‘कोबोदेशी’ या जपानी संतांनी चीनचा प्रवास करून जपानमध्ये मंत्रायाना या पंथाचे ग्रंथ, विविध मूर्ती, तसेच धार्मिक ग्रंथ आणले होते. याच संतांनी जपानमध्ये हिंदु देवतांच्या प्रार्थना आणि पूजा करण्यास आरंभ केला.
आ. जर्मनीचा विचारवंत फिलीफ फ्रांझ व्हान शिबोल्ड याने वर्ष १८३२ मध्ये टोकियोत श्री सरस्वतीदेवीची १३१ मंदिरे आणि श्री गणेशाची १०० मंदिरे मोजून त्यांची संख्या नमूद केली होती.
इ. डॉ. चंद्रा यांच्या मते मंत्रांवर आधारित पूजेअर्चेसाठी बुद्ध तत्त्वज्ञानामध्ये ‘मंत्रायाना’ नावाचा एक पंथ आहे आणि जपानी लोक होमाप्रमाणे ‘गोमा’ या नावाने आजही हा यज्ञविधी करतात. त्यासाठी ऑस्ट्रेलिया येथून मुद्दाम तूप मागवण्यात येते.
ई. जपानच्या कुसा या भागातील १२ व्या शतकातील ‘श्री गणेश मंदिरा’ला राष्ट्रीय संपत्ती मानले जाते.
उ. जपानचे सांस्कृतिक सल्लागार शिगेयुकी शिमानोरी यांनी ‘हिंदुस्थान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, ‘‘हिंदु देवतांच्या अभ्यासासाठी बुद्धीवंतांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न जपान करत आहे.’’
संकलक : कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.१.२०१५)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात, ८.७.२००७