१. जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष फ्यूडरर हिटलर यांनी
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी मनापासून काढलेले गौरवोद्गार !
‘महान भारताच्या नागरिकांनो, आपण धन्य आहात आणि आपले नेताजी सुभाषचंद्र बोसही धन्य आहेत.आपल्या नेताजींचे स्थान माझ्यापेक्षा पुष्कळ मोठे आहे. मी केवळ ८ कोटी लोकसंख्या असलेल्या जर्मनीतील लोकांचा नेता आहे; परंतु नेताजी ४० कोटी भारतियांचे नेते आहेत. ते प्रत्येक गोष्टीत माझ्यापेक्षा फार मोठे राष्ट्रनायक आहेत. मी आणि माझेे जर्मन सैनिक त्यांना नमस्कार करतो. ‘नेताजींच्या नेतृत्वानेच भारत स्वतंत्र होईल’, असा मला पूर्ण विश्वास आहे.’ नेताजींनी ‘आझाद हिंद सेने’च्या परेड सलामीचे औचित्य साधून बोलावलेल्या विशेष प्रसंगी जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष फ्यूडरर हिटलर यांनी अगदी मनापासून वरील उद्गार काढले.
२. जपानच्या सम्राटाने नेताजींना केलेले साहाय्य !
२ अ. सम्राटाने भारतातील सहस्रो युद्धबंदी सैनिकांना इंंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी सिद्ध करण्यास सांगणे
इंग्रजांच्या विरुद्ध युद्ध करण्यासाठी आवश्यक असलेली युद्धसामग्री देण्याचे वचन जपानच्या सम्राटाने दिले होते; पण प्रश्न होता, तो रणभूमीवर युद्ध करणार्या जवानांचा; कारण युद्धात लढवय्ये जवानच तळहातावर प्राण घेऊन शत्रूंवर तुटून पडतात. शस्त्रास्त्रे चालवण्यासाठी हाडे, रक्त, मांस आणि लढवय्या सैनिक यांच्या आवश्यकतेचा प्रश्न निर्माण झाल्यावर जपानच्या सम्राटाने नेताजींना सांगितले, ‘‘माझ्याकडे भारतातील सहस्रो सैनिक युद्धबंदी म्हणून आहेत. आपण जर त्यांना प्रभावित करून इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठी सिद्ध केले, तर तुम्हाला एक प्रशिक्षित सैन्य मिळेल !’’
२ आ. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ओजस्वी व्याख्यानाने
प्रभावित झालेले युद्धबंदी सैनिक इंग्रजांविरुद्ध लढण्यास सिद्ध होणे
सम्राटाचा आदेश होताच सर्व युद्धबंद्यांना रंगूनच्या मैदानावर एकत्र करण्यात आले.नेताजींनी त्या सर्वांसमोर एक प्रभावशाली, ओजस्वी आणि भावपूर्ण व्याख्यान दिले. त्यांच्या वाणीत जणू अग्नीसारखे प्रखर तेज होते, ज्याने तत्क्षणी सर्वांच्या मनात ठिणगीच्या रूपाने प्रवेश केला. सर्व युद्धबंदी सैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या व्याख्यानाने प्रभावित होऊन ‘आझाद हिंद सेने’च्या रूपात नेताजींच्या नेतृत्वाखाली युद्धासाठी सिद्ध झाले.
३. नेताजींच्या आकस्मिक मृत्यूमुळे देशाची अपरिमित हानी होणे
आकस्मिक दुर्घटना घडली नसती, तर आमचा देश दोन वर्षे अगोदरच, म्हणजे वर्ष १९४५ मध्येच नेताजींच्या नेतृत्वाखाली आला असता. या महान भारत देशाची सत्ता नेताजींच्या हातात असती, तर आज आपण या भ्रष्टाचारी नेत्यांपासून मुक्त होऊन आपल्याला पुनः ‘विश्वगुरु’ आणि ‘समृद्ध राष्ट्राचा नागरिक’ असण्याचा सन्मान प्राप्त झाला असता.’