देवद (पनवेल) – ‘श्री गणेश पूजा आणि आरती’ या ‘अँड्रॉईड अॅप’चे उद्घाटन येथील सनातनच्या आश्रमामध्ये परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या हस्ते १२ ऑगस्टला झाले. या अॅपमध्ये ‘गणपतीची उपासना आणि त्या संदर्भातील धार्मिक कृती करण्याच्या शास्त्रीय पद्धत, त्यामागील कारणे आणि त्यांचे लाभ’ यांविषयीची माहिती दिली आहे. ‘प्रत्येक व्यक्ती ईश्वरप्राप्तीसाठी करत असलेले प्रयत्न अध्यात्मशास्त्रीय दृष्टीकोनातून व्हावेत आणि त्यांची फलप्राप्ती व्हावी’, हा दृष्टीकोन ‘गणेश पूजा आणि आरती’ या अॅपद्वारे देण्याचा प्रयत्न केला आहे.
मनुष्याचे जीवन ईश्वरप्राप्तीसाठीच आहे, याचे
अवलोकन गणेशतत्त्व करून देते ! – (परात्पर गुरु) पांडे महाराज
‘अँड्रॉईड अॅप’च्या उद्घाटनाच्या वेळी मार्गदर्शन करतांना परात्पर गुरु पांडे महाराज म्हणाले, ‘‘श्री गणेश देवता ही ॐकारस्वरूप आहे. त्यातूनच वेदांची निर्मिती झालेली आहे. निर्गुण ब्रह्म आणि सगुण सृष्टी यांना जोडणारा श्री गणेश हा दुवा आहे. श्री गणेश स्वसंवेद्य आत्मशक्ती आहे. ॐ कारस्वरूप दर्शक आणि ब्रह्मतत्त्व आहे. त्यामुळे श्री गणेशाला वंदन करून प्रत्येक कार्य केले, तर यश मिळते. मनुष्याचे जीवन ईश्वरप्राप्तीसाठी आहे, याची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. याचे अवलोकन गणेशतत्त्व करून देते. अथर्वशीर्षात गणेश विद्या आहे. श्री गणेश अथर्वशीर्षाचे २१ पाठ २१ दिवस केले, तर प्रचीती येतेच. गणक ऋषींनी अथर्वशीर्षाची देणगी दिली आहे. ईश्वरप्राप्तीसाठी गणेशतत्त्व आवश्यक आहे.’’
क्षणचित्रे
१. या वेळी परात्पर गुरु पांडे महाराज यांनी संपूर्ण अथर्वशीर्ष म्हटले. त्यांनी शेवटी गणेशतत्त्वाला वंदन केले.
२. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी स्वतः लिहिलेल्या ‘श्री गणेश अध्यात्म दर्शन’ या ग्रंथाचा उल्लेख करून ‘त्यामध्ये श्री गणेशाविषयी सर्व शास्त्रीय माहिती दिली आहे’, असे सांगितले.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने गणेशभक्तांसाठी अनमोल भेट
सनातन संस्थेच्या ‘गणेशपूजा आणि आरती’ या ‘अँड्रॉईड अॅप’ची वैशिष्ट्ये
१. श्री गणेश पूजाविधी कसा करावा ?
२. आरती संग्रह आणि नामजप (ऑडिओसहित)
३. श्री गणपति अथर्वशीर्ष (ऑडिओसहित)
४. आणि बरेच काही…
हे अॅप मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये उपलब्ध आहे.
आजच डाऊनलोड करावे आणि आपले मित्र, तसेच आप्तेष्टांना पुढील लिंक शेअर करा !
https://www.sanatan.org/ganeshapp
तसेच वर दिलेला ‘क्यू आर् कोड (QR code – क्विक रिस्पॉन्स कोड)’ स्कॅन केल्यावरही हे अॅप तुम्हाला डाऊनलोड करता येणार आहे.