‘इको फ्रेंडली गणेशोत्सव’ साजरा करण्याच्या नावाखाली अशी गणेशमूर्ती बनवण्याचे अशास्त्रीय आवाहन करणार्या पर्यावरणवाद्यांचे पितळ उघड !
‘अलीकडे कथित पर्यावरणप्रेमी कागदी लगद्यापासून बनवलेल्या श्री गणेशमूर्तीचा पुरस्कार करतात. तथापि त्याने किती प्रदूषण होते, हेही जाणणे आवश्यक आहे.
१. मुंबईतील प्रसिद्ध ‘शासकीय रसायन तंत्रज्ञान संस्था’ (Institute of Chemical Tecnhology Mumbai) यांनी कागदी लगद्यापासून बनवलेल्या ४ मूर्ती घेऊन या विषयावर संशोधन केले. या संशोधनाअंती त्यांनी पुढील माहिती दिली –
अ. १० किलो कागदी मूर्तीमुळे १ सहस्र लिटर पाणी प्रदूषित होते.
आ. त्या पाण्यात झिंक, क्रोमियम, कॅड्मियम, टायटॅनिअम ऑक्साईड, असे विषारी धातू आढळून आले.
२. सांगली येथील ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. सुब्बाराव यांच्या ‘एन्व्हायरनमेंटल प्रोटेक्शन रिसर्च फाऊंडेशन’, या संस्थेने साधा कागद ‘डिस्टिल्ड वॉटर’मध्ये टाकून संशोधन केले. कागद विरघळवलेल्या या पाण्यात ‘ऑक्सिजन’ची मात्रा शून्यावर आल्याचे त्यांच्या प्रयोगात स्पष्ट झाले. हे अत्यंत घातक आहे.
वरील प्रयोगांवरून ‘कागदी लगदा किती हानीकारक आहे’, हे वैज्ञानिक स्तरावरही सिद्ध होते.’
गणेशभक्तांनो, कोणत्याही भूलथापांना बळी न पडता शास्त्राप्रमाणे शाडू मातीची श्री गणेशमूर्ती बसवून धर्मपालन करा आणि श्री गणेशाची कृपा संपादन करा !