प्रत्येक व्यक्तीने प्रतिदिन न्यूनतम ३० मिनिटे ‘मृत संजीवनी मुद्रा’ केल्यास हृदय सशक्त होऊन अकालीन हृदयविकाराचा झटका’(हार्ट अ‍ॅटॅक) येण्याचे प्रमाण न्यून होईल ! – डॉ. रवींद्र भोसले

‘सध्याच्या काळात अनेक लोकांना ‘हृदयविकाराचा झटका’(हार्ट अ‍ॅटॅक) येऊन त्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. तसेच तरुणवयातही हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर उपाय म्हणून प्रत्येक व्यक्तीने हाताच्या तर्जनीचे (अंगठ्याच्या शेजारील बोटाचे) टोक तळहाताला टेकवावे आणि अंगठा, मध्यमा अन् अनामिका (करंगळीच्या शेजारचे बोट) या बोटांची टोके एकमेकांना जुळवावीत. ही ‘मृत संजीवनी मुद्रा’ प्रतिदिन न्यूनतम ३० मिनिटे केल्यास आपले हृदय सशक्त राहील आणि अवकाळी हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण निश्‍चितच न्यून होईल. ही मुद्रा करून अनाहतचक्र किंवा हृदयाच्या ठिकाणी न्यास केला, तर त्याचा अधिक लाभ होईल.

काही मासांपूर्वी माझ्या हृदयावर अधूनमधून दाब जाणवायचा. त्या वेळी ‘मी ही मुद्रा केल्यावर तो दाब निघून जायचा’, असे मला जाणवले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीही ‘प्राणशक्तीवहन उपाय’ पद्धतीत मुद्रांचे महत्त्व सांगितले आहे. त्यामुळे माझा मुद्राशास्त्रावरील विश्‍वास अधिकच वाढला आहे.’

– डॉ. रवींद्र भोसले, जिल्हा नगर (८.४.२०१८)

1 thought on “प्रत्येक व्यक्तीने प्रतिदिन न्यूनतम ३० मिनिटे ‘मृत संजीवनी मुद्रा’ केल्यास हृदय सशक्त होऊन अकालीन हृदयविकाराचा झटका’(हार्ट अ‍ॅटॅक) येण्याचे प्रमाण न्यून होईल ! – डॉ. रवींद्र भोसले”

  1. खूप छान माहिती,वर्तमान स्थितीत सर्वांना उपयोग होईल
    कृतज्ञ
    नमस्कार
    धन्यवाद!!!!

    Reply

Leave a Comment