अंतर्मनातून साधना करणार्‍या आणि देवाशी अनुसंधान असणार्‍या पू. (श्रीमती) पार्वती ननावरेआजी !

१ ऑगस्टला पुणे येथील श्रीमती पार्वती ननावरेआजी (वय ७४ वर्षे) ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून संतपदी विराजमान झाल्या.

पू. (श्रीमती) पार्वती ननावरेआजी घरी राहून व्यष्टी साधना, तसेच आश्रमासाठी पायपोस शिवण्याची सेवा करायच्या. त्यांचे अंतर्मनातून ईश्‍वराशी अखंड अनुसंधान होते. त्यांची आंतरिक साधना, तळमळ आणि भाव यांमुळे एका वर्षात चार टक्के आध्यात्मिक पातळी वाढून त्या संतपदी पोहोचल्या.

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी पुष्पहार अर्पण करून, भेटवस्तू देऊन पू. ननावरेआजींचा सन्मान केला. सद्गुरु ताईंनी त्यांना आलिंगन दिले आणि नंतर त्यांच्या चरणांवर डोके टेकवून नमस्कारही केला.

 

प.पू. डॉक्टरांच्या चरणांचा पायपोस व्हायचे आहे ! – पू. ननावरेआजी

‘मला काही कळत नाही आणि काही करताही येत नाही. मला प.पू. डॉक्टरांच्या चरणांचा पायपोस व्हायचे आहे. मी श्रीकृष्णांच्या चरणांची दासी आहे. मी प्रतिदिन मानसपूजा करते आणि गुरुदेवांना साधनेचा आढावा देते. मी मनाने सतत गुरुदेवांच्या समवेतच असते. (या वेळी त्यांची भावजागृती झाली होती.)

सौ. शारदा सोनवणे (पू. ननावरेआजींची मुलगी) – आईने मला आणि भावाला कौटुंबिक अडचणींचा सामना करत पुष्कळ कष्टात सांभाळले. आई साधनारत आहे.

 

पू. ननावरेआजी यांनी साधकांना दिलेला संदेश

भावपूर्ण नामजप, प्रार्थना आणि आज्ञापालन करा !

पू. आजी एका संतांना आत्मनिवेदन करून त्यांची पाद्यपूजा करत. याविषयी संत म्हणाले, ‘‘तुम्ही माझी किती वेळा पाद्यपूजा करता आणि किती आत्मनिवेदन करता !’’

Leave a Comment