महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने यू.टी.एस्.
(युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
१. चाचणीचे स्वरूप
या चाचणीत त्या गायिकेने रंगभूषा करण्यापूर्वी आणि केल्यानंतर यू.टी.एस्. उपकरणाद्वारे केलेल्या तिच्या मोजणीच्या नोंदी करण्यात आल्या. या केलेल्या मोजणीच्या नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.
२. केलेल्या मोजणीच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन
२ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचेे विवेचन – रंगभूषा केल्यामुळे गायिकेतील नकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत वाढ होणे
गायिकेने रंगभूषा करण्यापूर्वी तिच्यामध्ये इन्फ्रारेड ही नकारात्मक ऊर्जा होती, हे तिच्या संदर्भात यू.टी.एस्. स्कॅनर पूर्णपणे उघडून त्याने केलेल्या १८० अंशाच्या कोनावरून लक्षात आले. त्यामुळे त्या नकारात्मक ऊर्जेची प्रभावळही मोजता आली. ती १.२० मीटर होती. तिने रंगभूषा केल्यानंतर तिच्यातील या नकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत २१ सें.मी. वाढ होऊन ती १.४१ मीटर झाली.
या गायिकेने रंगभूषा करण्यापूर्वी आणि केल्यानंतरही तिच्यामध्ये अल्ट्राव्हायोलेट ही नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.
२ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचेे विवेचन
रंगभूषा करण्यापूर्वी आणि रंगभूषा केल्यानंतर गायिकेमध्ये सकारात्मक ऊर्जा आढळली नाही.
२ इ. गायिकेच्या प्रभावळीच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचेे विवेचन – रंगभूषा केल्यामुळे गायिकेची प्रभावळ न्यून होणे
सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची प्रभावळ साधारण १ मीटर असते. गायिकेने रंगभूषा करण्यापूर्वी तिची प्रभावळ २.३४ मीटर होती. तिने रंगभूषा केल्यानंतर तिची प्रभावळ ३६ सें.मी.घटून ती १.९८ मीटर झाली.
वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण सूत्र ३ मध्ये दिले आहे.
३. केलेल्या मोजणीच्या नोंदींचेे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
३ अ. गायिकेने केलेल्या असात्त्विक रंगभूषेमुळे तिच्याकडे वातावरणातील नकारात्मक स्पंदने आकृष्ट झाल्याने तिच्यातील नकारात्मक ऊर्जेत वाढ होणे अन् तिची प्रभावळही घटणे
या गायिकेला मध्यम स्वरूपाचा आध्यात्मिक त्रास (टीप) असल्यामुळे तिच्यामध्ये आधीपासूनच नकारात्मक स्पंदने होती. तिने पाश्चिमात्य पद्धतीची वेशभूषा केली होती, तसेच आकर्षक दिसण्याच्या दृष्टीने तिने तोंडवळ्यावर भडक रंगभूषाही केली होती. तिने तिचे केस मोकळे सोडले होते. थोडक्यात सांगायचे, तर तिने केलेली रंगभूषा, केशभूषा आणि वेशभूषा या असात्त्विक होत्या. त्यामुळे त्यांकडे वातावरणातील नकारात्मक स्पंदने आकृष्ट झाली. याचा परिणाम म्हणून गायिकेतील नकारात्मक ऊर्जेत वाढ झाली. त्यामुळे तिची एकूण प्रभावळही घटली. यातून पाश्चात्त्य जीवनपद्धतीनुसार आचरण केल्याने मानवाची आध्यात्मिकदृष्ट्या कशी हानी होते, हे या वैज्ञानिक चाचणीतून लक्षात येते.
टीप – आध्यात्मिक त्रास : आध्यात्मिक त्रास असणे, म्हणजे व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास. नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करणार्या भारतीय तरुण-तरुणींनी या प्रयोगातील निष्कर्षातून बोध घ्यावा आणि आपल्या महान हिंदु संस्कृतीनुसार आचारधर्माचे पालन करण्यात आपले हित आहे, हे लक्षात घ्यावे.
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (६.४.२०१८)
ई-मेल : mav.research२०१४@gmail.com