गुरुदेवांप्रती उत्कट भाव असलेले छत्तीसगडचे पू. चत्तरसिंग इंगळे (वय ८७ वर्षे)

अनुक्रमणिका

 

१. निवासस्थानी सेवाकेंद्रासाठी जागा उपलब्ध करून देणे

‘पू. इंगळेकाका यांचे छत्तीसगड येथे दोन मजली निवासस्थान आहे. ते दुसर्‍या माळ्यावर रहातात आणि तळमजल्यावर त्यांचा मुलगा कुटुंबासह रहातो. पू. काकांना तीन मुले असून त्यांचा एक मुलगा पुणे येथे नोकरी करतो. दुसरा मुलगा छत्तीसगड येथे अन्य ठिकाणी रहातो.

पू. इंगळेकाकांच्या निवासस्थानी छत्तीसगड येथील सेवाकेंद्र आहे. प्रसारानिमित्त आलेले साधक आणि संत या ठिकाणी निवासाला असतात.

 

२. दिनक्रम

पू. काका सकाळी लवकर उठून ध्यानमंदिरातील देवतांची पूजा करतात. ते सकाळी स्वतः चहा बनवून घेतात. त्यांची दोन मुले त्यांना सकाळचा अल्पाहार आणि दोन वेळचे जेवण देतात.

 

३. एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून मान

पू. इंगळेकाका शासकीय आय.टी.आय.मध्ये प्राचार्य होते. त्यांना समाजात एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून मान आहे.

 

४. गुरुकार्याची तळमळ

४ अ. ‘छत्तीसगड राज्यात प्रसारकार्य वाढावे’, ही इच्छा असणे

‘प्रसारानिमित्त साधकांनी अन्य राज्यांतून येऊन त्यांच्या निवासस्थानी रहावे. ‘छत्तीसगड राज्यात प्रसारकार्य वाढले पाहिजे. साधकांनी येऊन संपूर्ण शहरात प्रसार करावा’, अशी त्यांची इच्छा आहे. यासाठी सर्व प्रकारचे साहाय्य करायला त्यांची सिद्धता आहे.

४ आ. ‘राज्यस्तरीय हिंदू अधिवेशन चांगले व्हावे’, असे वाटणे

छत्तीसगड येथील राज्यस्तरीय हिंदू अधिवेशनाच्या वेळी होणार्‍या व्ययाविषयी ते आम्हाला सातत्याने विचारणा करत होते. ते आम्हाला सांगत, ‘‘तुम्हाला काहीही न्यून पडल्यास मी पैसे देतो. अधिवेशनासाठी व्ययाचा विचार करू नका. देव आपल्याला देणार आहे.’’

छत्तीसगड येथील साधकांना त्यांचा आधार वाटतो. साधक पू. काकांना साधनेतील अडचणी विचारून त्यांचे मार्गदर्शन घेतात.

 

५. उत्कट भाव

पू. काकांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती उत्कट भाव आहे. त्यांचे नाव घेतल्यावर पू. काकांची भावजागृती होते.

 

६. पू. काकांमुळे त्यांच्या नित्य वापरातील वस्तूंमध्ये झालेले पालट !

अ. पू. काका वापरत असलेल्या वस्तूंमध्ये पालट झाला आहे.

आ. त्यांच्या खोलीतील संत भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रात पालट झाला असून त्यात निर्गुण तत्त्व असल्यामुळे ते फिकट झाले आहे.

इ. सेवाकेंद्रातील ध्यानमंदिरातील देवतांच्या चित्रातील पांढरेपणा वाढला असून त्यांच्यात निर्गुण तत्त्व आले आहे.’

– श्री. सुनील घनवट (२१.७.२०१८)

 

७. वयाच्या ७० व्या वर्षीही उत्साहाने आणि
तळमळीने सर्व सेवा करणारे सेवाभावी वृत्तीचे पू. इंगळेकाका !

श्री. श्रीकांत पाध्ये

 

इंगळेकाकांनी त्यांच्या घराचा वरचा माळा सेवेसाठी, म्हणजे ‘सनातन संस्थे’च्या कार्यासाठी वापरण्यास दिला होता. आम्ही नसतांना ते स्वतःच तेथील स्वच्छता करायचे. नंतर त्यांनी त्यांच्या घरी सत्संग चालू केला. सत्संगासाठी संपर्क करणे आणि सत्संगाची सिद्धता करणे, शाळांमध्ये प्रश्नमंजुषा घेणे, तसेच ग्रंथ-प्रदर्शनाचे नियोजन करून सर्व हिशोब पहाणे, यांसारख्या अनेक सेवा ते उत्साहाने अन् तळमळीने करायचे.

 

८. शस्त्रकर्म झाल्यावर चेहर्‍यावर वेदनेचा लवलेश नसणे

एकदा काकांचा अपघात झाला आणि त्यांच्या पायाचे शस्त्रकर्म करावे लागले. आम्ही त्यांना भेटायला रुग्णालयात गेलो होतो. तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावर वेदनेचा लवलेशही नव्हता. त्यांचा आनंद आणि उत्साह पाहून आम्हाला आश्चर्य वाटले अन् आमची श्री गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त झाली.

सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉक्टर यांच्या कृपेने पू. इंगळेकाकांच्या प्रेमळ सहवासात रहाण्याची आणि त्यांची कृपा  अनुभवण्याची संधी आम्हाला मिळाली. याबद्दल गुरुदेवांच्या पावन चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.

कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. श्रीकांत रामचंद्र पाध्ये (वय ७१ वर्षे) आणि सौ. अंजली श्रीकांत पाध्ये (वय ६५ वर्षे), नागपूर (३.१०.२०२२)

 

९. देहभान हरपून सेवा करणे

‘वर्ष २००२ मध्ये दुर्ग येथील सर्व साधक नागपूर येथील गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. तेव्हा इंगळेकाकांचा प्रत्येक सेवेत सक्रीय सहभाग होता. प्रत्येक सेवा ते व्यवस्थित समजून घ्यायचे. त्यानंतर दुर्ग जिल्ह्यात गुरुपौर्णिमा महोत्सव करतांना ते तन, मन आणि धन या माध्यमांतून सहभागी होऊन सर्वांना साधनेसाठी प्रेरित करायचे. तेथे एक जाहीर सभासुद्धा घेण्यात आली होती. तेव्हा या सर्वच सेवांमध्ये काकांना स्वतःचे वय आणि प्रकृती यांचा विसर पडायचा.

 

१०. पू. इंगळेकाकांचे अनुभवलेले पितृछत्र

सौ. अंजली पाध्ये

 

१० अ. नातेसंबंध सांभाळणे

पू. इंगळेकाका मला ‘मुलगी’ मानत होते. त्यांनी हे नाते शेवटपर्यंत सांभाळले. माझ्या दोन्ही मुलींच्या लग्नात ते खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे राहिले.

१० आ. साधिकेच्या यजमानांची प्रकृती ठीक नसतांना तिला धीर देणे

वर्ष २०१६ मध्ये माझ्या यजमानांची (श्री. श्रीकांत पाध्ये यांची) प्रकृती अत्यंत खालावली होती. तेव्हा ते प्रत्येक ३ – ४ दिवसांनी भ्रमणभाष करायचे आणि यजमानांची विचारपूस करून मला धीर द्यायचे. मला आर्थिक साहाय्य करण्याचीही पू. इंगळेकाकांची पूर्ण सिद्धता होती.

– सौ. अंजली श्रीकांत पाध्ये (वय ६५ वर्षे), नागपूर (३.१०.२०२२)

 

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

 

Leave a Comment