सनातनच्या १५ व्या सद्गुरु श्रीमती प्रेमा कुवेलकरआजी यांची गुणवैशिष्ट्ये !

सनातन परिवारावर निस्सीम प्रेम करणार्‍या आणि प.पू. गुरुदेवांच्याअनुसंधानात असणार्‍या सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी यांची सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये !

‘२८.६.२०१८ या दिवशी आम्ही सर्व जण, म्हणजे मी, सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, पू. नीलेश सिंगबाळ आणि पू. (सौ.) संगीता जाधव पू. (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी यांना भेटायला गेलो होतो. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती आणि पू. आजींची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

मागे उभ्या असलेल्या डावीकडून सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि पू. (सौ.) संगीता जाधव, बसलेल्या डावीकडून सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी आणि सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

 

१. अनुभूती

१ अ.’मंदिरात जात आहोत’, असे जाणवणे

‘पू. कुवेलकर आजींच्या घरात जातांना एखाद्या मंदिरात जात आहोत’, असे मला जाणवले.

१ आ. सोप्यात उभे असतांना नीरव शांतता जाणवणे

घराबाहेर असणार्‍या सोप्यात (व्हरांड्यात) आम्ही उभे असतांना मला नीरव शांतता जाणवली. त्या वेळी सद्गुरु (सौ.) बिंदाताई म्हणाल्या, ‘‘पू. आजी इथे सोफ्यावर बसतात आणि त्या वेळी त्यांना ‘संत भक्तराज महाराज झोपाळ्यावर बसले आहेत’, अशी अनुभूती येते.’’

१ इ.’देवी आमचे स्वागत करत आहे’, असे जाणवणे

आत जातांना पू. आजी दारात आल्यावर ‘देवी आमचे स्वागत करत आहे’, असे मला जाणवले.

 

२. पू. कुवलेकरआजींची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

२ अ. ‘सुंदर रूप असलेल्या पू. आजींना न्याहाळत रहावे’, असे वाटणे

पू. आजींचा स्पर्श अतिशय मुलायम आहे. सुंदर, चमकदार कांती आणि गोरापान तोंडवळा, असे त्यांचे सुंदर रूप आहे. ‘पू. आजींना न्याहाळतच रहावे’, असे मला वाटत होते.

२ आ. पू. कुवलेकरआजींनी दैनिक सनातन प्रभातमधील माहिती लक्षात ठेवून प्रत्येक संतांशी आत्मीयतेने बोलणे आणि ‘त्या संपूर्ण सनातन कुटुंबालाच आतून जोडलेल्या आहेत’, याची जाणीव होणे

पू. आजी वयोमानामुळे घराबाहेर पडू शकत नाहीत. त्या दैनिक सनातन प्रभात वाचून त्यातील माहिती लक्षात ठेवतात. त्यांची स्मरणशक्ती चांगली आहे. त्यांनी सद्गुरु (सौ.) बिंदाताईंना ‘तुझे गणपति उत्सवाच्या काळातील घरातील अनुभव आणि तू केलेले प्रयत्न आवडले’, असे सांगितले. त्या  पू. नीलेश सिंगबाळ यांच्याशी त्यांनी केलेल्या उत्तर भारत आणि नेपाळ यांच्या दौर्‍याविषयी बोलत होत्या. त्या मला म्हणाल्या, ‘‘तुझे आजच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये शालेय जीवनापासून महाविद्यालयातील शिक्षणापर्यंत सर्व आले आहे.’’ त्या सद्गुरु स्वातीताईंशी प्रसारसेवेविषयी बोलल्या. त्यांनी पू. (सौ.) जाधवकाकाकूंना ‘तुम्हाला प्रथमच पाहिले’, असे सांगून त्या संत झाल्याविषयीही बोलल्या. त्यांच्या बोलण्यात इतकी आत्मीयता होती की, त्या प्रत्येक साधकाशी आतून जोडलेल्या आहेत. त्या प्रत्येक साधकाची दैनिकात आलेली माहिती वाचून संपूर्ण सनातन कुटुंबालाच आतून जोडलेल्या आहेत आणि प्रत्येकाविषयी त्यांना ज्ञात आहे. यावरून ‘त्या सनातन परिवाराशी किती समरस आणि एकरूप झाल्या आहेत’, हे लक्षात आले.

२ इ. गुरुकार्याविषयी जाणून घेण्याची ओढ !

त्या ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ आणि त्यानंतर आश्रमात झालेले शिबीर यांविषयी जिज्ञासेने जाणून घेत होत्या. त्यातून ‘त्यांच्यात शिकण्याची वृत्ती किती आहे’, हे लक्षात आले.

२ ई. ‘केवळ स्वतःच्या मुलाचीच प्रगती व्हावी’, असे
न वाटता ‘सर्वच साधकांची प्रगती व्हायला हवी’, असे वाटणे

पू. आजी म्हणाल्या, ‘‘माझ्या मोठ्या मुलाची (श्री. मनोज कुवेलकर यांची) प्रगती झाली. त्यामुळे त्याची काळजी नाही. लहान मुलाचीही प्रगती व्हायला हवी.’’ त्यांच्या मुलामध्ये प.पू. गुरुदेव आणि आई यांच्याप्रती भाव जाणवत होता. त्या म्हणाल्या, ‘‘माझ्या मुलाचीच नाही, तर सनातनच्या सर्वच मुलांची प्रगती व्हायला हवी. तीही आईची लेकरेच आहेत ना !’’ त्यांचे सनातन परिवारावर असलेले निस्सीम प्रेम मला अनुभवायला आले आणि माझे मन भरून आले.

२ उ. प.पू. गुरुदेवांच्या अनुसंधानात असणे

त्यांना प.पू. गुरुदेवांविषयी सतत अनुभूती येत असतात आणि घरात प.पू. गुरुदेवांचे अस्तित्व सतत जाणवते. त्यांना प.पू. गुरुदेव सूक्ष्मातून योग्य-अयोग्य सांगतात. ‘भगवंत भक्ताच्या सान्निध्यात असतो’, हे मला अनुभवायला मिळाले. आश्रम त्यांच्या घराजवळ असला, तरी त्या आश्रमात जाऊन प.पू. गुरुदेवांना भेटू शकत नाहीत आणि प.पू. गुरुमाऊलींची प्राणशक्ती अल्प असल्याने ते पू. आजींना भेटायला जाऊ शकत नाहीत, तरी दोघांची सूक्ष्मातून भेट होतच असते.’

– (सद्गुरु) कु. अनुराधा वाडेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.६.२०१८)

 

३. गुणवैशिष्ट्ये

३ अ. इतरांना साहाय्य करणे आणि प्रेमभावाने सर्वांना आपलेसे करणे

‘आमच्या आईला गावात, तसेच नातेवाइकांमध्ये मान आहे. ती घरात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीशी प्रेमाने बोलते. त्यांना जेवायला थांबायचा आग्रह करते. गावात कोणाच्या घरी काही खाऊ बनवायचा असेल, तर ते माझ्या आईला साहाय्याला बोलवायचे. आई त्यांच्या घरी जाऊन तो खाऊ आवडीने करायची. नातेवाइकांकडे एखादा समारंभ असला, तर ती तिथेही साहाय्याला जायची. तिने प्रेमाने सर्वांना आपलेसे केले आहे.

३ आ. काटकसरी

‘अन्न वाया घालवू नये आणि पानात काही टाकू नये’, असे ती आम्हाला सांगते. यातून आम्हाला काटकसर शिकायला मिळाली.

३ इ. आर्थिक परिस्थिती चांगली नसतांनाही दानधर्म करणे

पूर्वी आमची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती; पण त्याही स्थितीत सद्गुरु आई तिला जमेल तेवढा दानधर्म करायची. घरात कुणी गरीब व्यक्ती आली असेल किंवा काम करायला कुणी आले असेल, तर त्यांना चहा, जेवण दिल्याविना ती पाठवायची नाही. स्वतःची आर्थिक परिस्थिती चांगली नसतांनासुद्धा ती असा त्याग करायची.

३ ई. सर्वांचे भले चिंतणे

आई प्रत्येक गोष्टीकडे साक्षीभावाने पहायची. कुणी तिच्याशी कितीही वाईट वागले असेल, तरी ‘त्याचे भलेच व्हावे’, अशी प्रार्थना ती परमेश्‍वराजवळ करायची. ‘जे वाईट घडले, ‘ते आपल्या प्रारब्धानुसार घडले’, अशी तिची भावना असते.

३ उ. स्वावलंबी

पूर्वी सद्गुरु आईंना पुष्कळ त्रास व्हायचा; पण त्यांनी कधीही बोलून दाखवले नाही. त्यांनी घरकामात सवलत घेतली नाही. त्या आताही स्वतःचे काम स्वतः करतात आणि कधीही आमच्याकडून सेवा करून घेत नाहीत. त्या नेहमी म्हणतात, ‘‘माझे करण्यात कुणाचाही वेळ वाया जाऊ नये आणि माझ्यामुळे कुणालाही त्रास होऊ नये.’’

३ ऊ. आदरातिथ्य करणे

आमची परिस्थिती हलाखीची होती. आम्हाला दोन वेळचे जेवण मिळणेही कठीण होते. सद्गुरु आई अशा परिस्थितीतही घरी येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला चहा किंवा जेवण द्यायच्या.

३ ए. कष्टाळू

त्यांनी संसारासाठी आणि आमच्या शिक्षणासाठी पुष्कळ कष्ट घेतले. आमच्या शाळेत काही असल्यास किंवा पालकांना बोलावले असल्यास आम्ही सद्गुरु आईंना शाळेत घेऊन जायचो; कारण बाबा साधे होते. ‘आमचे शिक्षण पूर्ण होण्यात पैशांची उणीव भासू नये आणि मला कसलाच त्रास होऊ नये’, यासाठी कार्यालयात जाऊन सद्गुरु आईंनी मला शिष्यवृत्ती मिळवून दिली.

३ ऐ. सर्वांशी जुळवून घेणे आणि इतरांना साहाय्य करणे

अ. त्या पूर्वीपासून शांत आणि प्रेमळ आहेत. त्यांनी घरातील सर्वांशी जुळवून घेतले. त्या शेजारी करंज्या, मोदक, तसेच पापड करायला जायच्या. त्या वेळी त्यांना आर्थिक साहाय्य व्हायचे नाही, तरीही त्यांनी कुणालाही ‘नाही’ म्हटले नाही.

आ. आम्हाला काका आणि काकू यांच्याकडून वाईट वागणूक मिळाली. काकूच्या शेवटच्या आजारपणात तिच्या मुलांनी तिला सांभाळले नाही. त्या वेळी काकू अंथरूणावर असतांना सद्गुरु आईंनी तिची ८ मास सेवा केली.

३ ओ. विचारण्याची आणि शिकण्याची वृत्ती

त्यांना या वयातही सर्वकाही जाणून घेण्याची इच्छा आहे. आम्हाला घरी सेवेसाठी संगणक मिळाल्यावर सद्गुरु आईंनी ‘सीपीयू’ आणि ‘यूपीएस’ यांचे महत्त्व विचारून घेतले.

३ औ. परात्पर गुरु डॉक्टरांप्रती उच्च कोटीचा भाव

परात्पर गुरु डॉक्टरांचे नाव जरी उच्चारले, तरी सद्गुरु आईंची भावजागृती होते. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी आमच्यावर पुष्कळ उपकार केले आहेत आणि ते आमच्या सर्व कुटुंबाची काळजी घेणारच आहेत’, असा त्यांचा भाव आहे.

‘परात्पर गुरुदेवा, तुम्हीच मला ही सूत्रे सुचवली आणि लिहून घेतली’, त्याविषयी मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

 

४. शिकवण

अ. कुणी आपल्याशी कितीही वाईट वागले असेल, तरी ‘त्याचे भले व्हावे’, अशी प्रार्थना परमेश्‍वराकडे करावी. ‘जे वाईट घडले, ‘ते आपल्या प्रारब्धानुसार घडले’, अशी भावना असावी.

आ. आपल्याला कितीही त्रास झाला, तर तो त्रास सहन करण्यासाठी आपण ईश्‍वराकडे सहनशक्ती मागायची; म्हणजे आपण त्या वेळी स्थिर रहातो.

इ. आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत, त्यातच आपण समाधानी रहावे. अधिक पैशांची अपेक्षा करू नये. आर्थिकदृष्ट्या आपल्यापेक्षा कनिष्ठ लोकांकडे बघितल्यावर ‘आपण किती सुखी आहोत’, हे आपल्याला कळते.

ई. प्रत्येक व्यक्तीत ईश्‍वर असल्याने कुणाशीही बोलतांना जपून बोलायला पाहिजे. आपल्या वागण्याने किंवा बोलण्याने कुठलीही व्यक्ती दुखावली जाऊ नये. ‘आपण गरिबीतून मोठे झालो आहोत’, याचे सदैव भान असावे.

उ. इतरांनी आपल्यावर केलेल्या उपकारांची जाणीव ठेवावी

ऊ. कुठल्याही प्रसंगात देवावरचा विश्‍वास डगमगू देता कामा नये
कुलदेवी ही आपली आई आहे. ‘तिने आपल्याला प्रत्येक कठीण प्रसंगात तारले आहे’, याविषयी सद्गुरु आई आम्हाला सांगतात. काही वेळा माझे महाविद्यालयाचे शुल्क भरण्यासाठी घरात पैसे नसायचे. त्या वेळी कुणाकडून तरी घरात पैसे यायचे.

ए. स्वतःची तुलना श्रीमंत व्यक्तीशी करू नये
आपण कधीही आपली तुलना आपल्यापेक्षा वरच्या (श्रीमंत) माणसाशी करू नये. तुलना करायचीच असेल, तर आपल्यापेक्षा गरीब माणसाशी करावी. ज्या माणसाकडे गाडी आहे, बंगला आहे, त्याची आपल्याशी तुलना करू नये. असे केल्यामुळे आपल्याला दुःख होते; कारण आपल्याकडे ते नाही.

ऐ. कुलदेवीला सांगून नवीन वस्तू घेतली, तर ती चांगली टिकते
‘कुलदेवीला सांगून एखादी वस्तू घेतली, तर ती चांगली रहाते’, अशी तिची श्रद्धा आहे. मी महाविद्यालयात शिकत असतांना नवीन घड्याळ घेतले होते. मी नवीन घड्याळ घरी आणून हातात बांधल्यावर ते काही वेळाने बंद पडले. नंतर मी देवीकडे क्षमा मागितली, ‘मला क्षमा कर आणि माझे घड्याळ व्यवस्थित चालू दे.’ थोड्या वेळाने घड्याळ परत चालू झाले. ‘देवीला सांगितल्याविना कोणतीही वस्तू घरात आणू नये’, हे माझ्या लक्षात आले.’

 

५. प्रार्थनेमुळे आलेल्या अनुभूती

५ अ. सद्गुरु आईने नवीन वस्तू घेण्यापूर्वी कुलदेवीला प्रार्थना करण्यास सांगणे, तसे न करता विकत घेतलेले मनगटी घड्याळ लगेच बंद पडणे आणि सद्गुरु आईने सांगितल्याप्रमाणे प्रार्थना करून देवीची क्षमा मागितल्यावर घड्याळ आपोआप चालू होणे

एकदा सद्गुरु आईने मला सांगितले, ‘‘स्वतःसाठी एखादी नवीन वस्तू घ्यायची असेल, तर आपली कुलदेवी श्री शांतादुर्गा हिला प्रार्थना करून घ्यावी.’’ ही गोष्ट तिने आमच्या मनावर बिंबवली. एकदा मी एक मनगटी घड्याळ घेतले आणि ते लगेच हातावर बांधले. त्याच दिवशी काही वेळाने ते बंद पडले आणि दुरुस्त होईना. हे मी आईला सांगितल्यावर तिने मला विचारले, ‘‘तू हे घड्याळ घेतांना देवीला प्रार्थना केली होतीस का ?’’ मी म्हटले, ‘‘नाही.’’ त्या वेळी आई म्हणाली, ‘‘देवीला प्रार्थना कर आणि तिची क्षमा माग.’’ मी देवीची क्षमा मागून प्रार्थना केल्यावर घड्याळ आपोआप चालू झाले. या प्रसंगामधून मला आईमध्ये असलेला देवीप्रतीचा भाव जाणवला.

५ आ. पुष्कळ औषधे घेऊनही पाठीवर आलेले गोलाकार चट्टे बरे न होणे आणि सद्गुरु आईने कुलदेवीला प्रार्थना करून चांदीचा पत्रा दिल्यावर चट्टे नाहीसे होणे

एकदा माझ्या पाठीवर गोल आकाराचे चट्टे आले होते. पुष्कळ औषधे घेऊनही ते जात नव्हते. त्या वेळी आईने आमच्या कुलदेवीला प्रार्थना केली, ‘हे चट्टे बरे कर. मी तुला गोल आकाराचा चांदीचा पत्रा देईन !’ तो पत्रा बनवून श्री शांतादुर्गा देवीला अर्पण केल्यावर माझे चट्टे नाहीसे झाले.’

– श्री. नागराज नारायण कुवेलकर (सद्गुरु प्रेमा कुवेलकरआजींचे कनिष्ठ चिरंजीव), कवळे, फोंडा, गोवा. (७.७.२०१८)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment