स्नानानंतर आपापल्या संप्रदायाप्रमाणे कपाळावर टिळा लावावा, उदा. वैष्णवपंथीय कपाळावर उभे तिलक लावतात, तर शैवपंथीय आडव्या रेषा म्हणजे ‘त्रिपुंड्र’ काढतात.
तिलक धारण करणे चलच्चित्रपट (Videos : 4)
अ. कपाळावर तिलक धारण करण्यामागील कारण
अ १. मायेची उपाधी असेपर्यंत सगुण परमेश्वराचीच पूजा करणे प्रशस्त असणे
‘मनुष्याचा देह हे ईश्वराचे मंदिर मानले गेले आहे. सहस्रारचक्र मूर्धास्थानी (शेंडीच्या ठिकाणी) असते. तेथे निर्गुण परमेश्वर वास करतो. भृकुटीमध्यात (दोन्ही भुवयांच्या मधोमध) आज्ञाचक्रावर सगुण परमेश्वर वास करतो. मायेची उपाधी असेपर्यंत सगुण परमेश्वराचीच पूजा करणे प्रशस्त असते.
अ २. भृकुटीमध्यात निवास करणार्या परमेश्वरास
तिलक लावल्याने दिवसभर मनात भक्तीभाव आणि शांती नांदणे
१. तिलक धारण म्हणजे एक छोटी देवपूजाच होय.
२. तिलक धारण करतांना मध्यमेचा उपयोग करावा, असे शास्त्र आहे. मध्यमेचा संबंध हृदयाशी असल्यामुळे या बोटातून प्रवाहित होणारी स्पंदने हृदयापर्यंत जाऊन भिडतात. भृकुटीमध्यात निवास करणार्या परमेश्वरास तिलक लावतांना तृतीय नेत्रातून स्फुरणारी स्पंदने मध्यमेद्वारा हृदयात जाऊन भिडल्यामुळे दिवसभर मनात भक्तीभाव आणि शांती नांदते.’
(तिलक धारणाची वरील कृती पुरुषांच्या संदर्भात आहे. स्त्रियांनी स्वतःला कुंकू लावतांना अनामिकेने, तर दुसर्या स्त्रीला किंवा पुरुषाला कुंकू लावतांना मध्यमेने लावावे. – संकलक)
सूक्ष्म-चित्र मोठे करून पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा !
आ. टिळा लावण्याचे प्रकार
आ १. ऊर्ध्वपुंड्र
कपाळावर काढलेल्या एक अथवा अधिक उभ्या रेघांना ‘ऊर्ध्वपुंड्र’ म्हणतात. श्रीविष्णूमुळे पवित्र झालेल्या क्षेत्रातील माती; गंगा, सिंधू यांसारख्या पवित्र नद्यांच्या काठची माती / गोपीचंदन ऊर्ध्वपुंड्र काढण्याकरिता घ्यावे.
आ २. त्रिपुंड्र
कपाळावर काढलेल्या तीन आडव्या रेषांना ‘त्रिपुंड्र’ म्हणतात. त्रिपुंड्रमुद्रा भस्माच्या असतात.
आ ३. तिलकमुद्रा (टिळा) चंदनाची करतात.