- गोमूत्रामुळे कर्करोग बरा होऊ शकतो, हे जरी सिद्ध झाले, तरी गोमूत्रासाठी भारतात गायी शेष असल्या पाहिजेत !
- भाजप सरकारमुळे भारत जगातील सर्वाधिक गोमांस निर्यात करणारा देश बनला आहे, हे लक्षात घ्यायला हवे !
- देशात संपूर्ण गोवंश हत्या बंदी नाही आणि ज्या राज्यांत ती आहे, तेथे त्याची नीट कार्यवाही होत नाही, ही वस्तूस्थिती आहे !
- गोहत्या करण्याचे समर्थन करणारे याविषयी काही बोलतील का ?
जुनागड (गुजरात) – गोमूत्रामुळे तोंड, यकृत, मूत्रपिंड, त्वचा आणि स्तन यांना झालेला कर्करोग बरा होऊ शकतो, असा दावा येथील जुनागड कृषी विद्यापिठाच्या संशोधकांनी केला आहे. कृषी विद्यापिठाचे श्रद्धा भट, रुकमसिंग तोमर आणि कविता जोशी यांनी वर्षभर केलेल्या संशोधनातून हा निष्कर्ष काढला आहे. (गोमूत्रामुळे अनेक रोगांवर उपचार होऊ शकतात, हे प्राचीन काळापासून भारतियांना ज्ञात असल्याने प्रत्येक घरात गाय पाळली जात होती; मात्र ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक भारतात गोहत्या करणारे पशूवधगृह निर्माण करून गायी नष्ट होण्यासाठी प्रयत्न केले ! – संपादक)
१. श्रद्धा भट म्हणाल्या की, हे संशोधन खूप धोकादायक होते; कारण आम्ही कर्करोगाच्या पेशींवर संशोधन करत होतो की, जे आम्ही एका बाटलीत ठेवले होते. दिवसाला नेमके किती गोमूत्र प्राशन केल्यास कर्करोग बरा होईल, त्याचा शोध घेण्यात आम्हाला यश आले आहे. पुढे एका उंदरावर ही चाचणी केली जाईल, जर ती यशस्वी झाली, तर वेगवेगळ्या कर्करोगांसाठी आम्ही गोळ्या बनवू.
२. रुकमसिंग तोमर म्हणाले की, ‘केमो थेरपी’ ही आरोग्यदायी पेशी नष्ट करते, तर गोमूत्र केवळ कर्करोगाने ग्रस्त पेशी नष्ट करते. (विज्ञानाने लावलेल्या शोधाचा असाही दुष्परिणाम ! – संपादक)