अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी उपासना करा !

अतृप्त पूर्वजांचा त्रास होण्याचे कारण आणि त्रासाचे स्वरूप

हल्लीच्या काळी पूर्वीप्रमाणे कोणी कुटुंबातील मृत व्यक्तीचे श्राद्ध-पक्ष करत नाही, तसेच साधनाही करीत नसल्याने बहुतेक सर्वांनाच पूर्वजांच्या लिंगदेहांमुळे त्रास होतो. पूर्वजांमुळे त्रास होण्याची शक्यता आहे किंवा त्रास होत आहे, हे उन्नतच सांगू शकतात. तसे सांगणारे उन्नत न भेटल्यास पुढे दिल्याप्रमाणे काही तर्‍हेचे त्रास पूर्वजांमुळे होतात असे समजावे – विवाह न होणे, विवाह झाल्यास पतीपत्नीचे न जुळणे, जुळल्यास गर्भधारणा न होणे, गर्भधारणा झाल्यास गर्भपात होणे, गर्भपात न झाल्यास मूल वेळेआधी जन्मणे, मतीमंद किंवा विकलांग अपत्य होणे, अपत्ये बालपणातच मृत्युमुखी पडणे वगैरे. दारिद्र्य, शारीरिक आजार अशीही लक्षणे असू शकतात.

दत्ताच्या नामजपाने अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण कसे होते ?

अ. संरक्षक-कवच निर्माण होणे

दत्ताच्या नामजपातून निर्माण होणार्‍या शक्‍तीने नामजप करणार्‍याच्या भोवती संरक्षक-कवच निर्माण होते.

आ. अतृप्त पूर्वजांना गती मिळणे

बहुतेक जण साधना करत नसल्यामुळे ते मायेत गुरफटलेले असतात. त्यामुळे मृत्यूनंतर अशांचा लिंगदेह अतृप्त रहातो. असे अतृप्त लिंगदेह मर्त्यलोकात (मृत्युलोकात) अडकतात. दत्ताच्या नामजपामुळे मृत्युलोकात अडकलेल्या पूर्वजांना गती मिळते. ( भूलोक आणि भुवर्लोक यांच्या मध्ये मृत्युलोक आहे.) त्यामुळे पुढे ते त्यांच्या कर्मानुसार पुढच्या पुढच्या लोकात गेल्याने साहजिकच त्यांच्यापासून व्यक्‍तीला होणार्‍या त्रासाचे प्रमाण कमी होते.

 

आता आपण ‘दत्ताचा ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप कसा करावा’, हे येथे ऐकूया.

“श्री गुरुदेव दत्त तारक जप” आणि “श्री गुरुदेव दत्त मारक जप” हे नामजप ऐकण्यासाठी खालील लिंकवर भेट द्या.

दत्ताचा नामजप

अतृप्त पूर्वजांच्या त्रासावर उपाययोजना

१. कोणत्याही तर्‍हेचा त्रास होत नसल्यास पुढे त्रास होऊ नये म्हणून, तसेच जरासा त्रास असल्यास कमीतकमी १ ते २ घंटे (तास) किंवा तीन तास `श्री गुरुदेव दत्त ।’ हा जप नेहमीच करावा. एरव्ही प्रारब्धामुळे त्रास होऊ नये, तसेच आध्यात्मिक उन्नती व्हावी म्हणून सर्वसामान्य मनुष्याने किंवा प्राथमिक अवस्थेतील साधकाने आपल्या कुलदेवतेचा नामजप जास्तीतजास्त करावा.

२. मध्यम तर्‍हेचा त्रास असल्यास कुलदेवतेच्या जपाबरोबरच `श्री गुरुदेव दत्त ।’ हा जप कमीतकमी २ ते ४ घंटे तरी करावा. तसेच गुरुवारी दत्ताच्या देवळात जाऊन सात प्रदक्षिणा घालाव्यात आणि बसून एक-दोन माळा जप वर्षभर तरी करावा. त्यानंतर तीन माळा जप चालू ठेवावा.

३. तीव्र त्रास असल्यास कमीतकमी ४ ते ६ घंटे जप करावा. एखाद्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी जाऊन नारायणबली, नागबली, त्रिपिंडी श्राद्ध, कालसर्पशांती अशांसारखे विधी करावे. त्याच्याच जोडीला एखाद्या दत्तक्षेत्री राहून साधना करावी किंवा संतसेवा करून त्यांचा आशीर्वाद मिळवावा.

एखादी व्यक्‍ती जेव्हा `श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करते,
तेव्हा तो तिच्या पूर्वजांपैकी कोणाला सर्वाधिक लाभदायक ठरतो ?

एखादी व्यक्‍ती `श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करते, तेव्हा `आपल्याला पुढील गती मिळावी’, अशी तीव्र तळमळ असलेल्या तिच्या पूर्वजाला या नामजपाचा सर्वाधिक लाभ होतो.

`असे जर आहे, तर बहुतांश पूर्वज नामजप करणार्‍या वारसदारालाच लक्ष्य का करतील’, असा प्रश्‍न कुणालाही पडू शकेल. याचे उत्तर असे आहे – `स्वत:ची आध्यात्मिक प्रगती व्हावी’, अशी इच्छा असणारे पूर्वज साधना करणार्‍या वारसदारांकडून साहाय्य घेतात आणि ज्या पूर्वजांच्या अतृप्त इच्छा भौतिक विषयांशी निगडित असतात (खाणे-पिणे आदी), ते पूर्वज त्याच प्रकारच्या वासना असणार्‍या वारसदारांकडून साहाय्य घेतात.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘दत्त’

आपल्या आध्यात्मिक प्रवासाला आत्तापासूनच आरंभ करा ! –
सनातन संस्थेच्या ‘साधना संवाद’साठी आताच नोंदणी करा !

2 thoughts on “अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी उपासना करा !”

  1. People like you are creating superstition by enforcing karma kands to weak mind. I know a person with psychosis who reading such bullsheet and not seeing doctor. She is hearing voices and hallucinating and your article are creating an obstacle to take her to Psychologist. She is geeting in to this karma kanda which will not elivate any pains and it will only increase. You and people like you who are knowingly and unknowingly promoting this superstitious mumbo jumbo and backward evil illogical thought to such mentally suffering people will suffer in this life due to these bad karma.

    Reply
    • Namaste Shri. Anmol Gandhi ji,

      We have never prescribed replacing medical treatment with spiritual remedies. If we were so inclined on recommending only karmakanda to our readers, then we would have never given articles and guidance about ayurved, medicinal plants, homeopathic medicines, flower remedy, acupressure therapy, reflexology etc. on our website. We request you to go through our website once again.

      We have always encouraged people to do spiritual remedies along with taking appropriate treatment from medical practitioners. Since mental and spiritual fitness have a great impact on the recovery rate, we are sure that people will become better if spiritual remedies are done along with taking medical treatment.

      Reply

Leave a Comment