बंगालमधील डॉ. शिवनारायण सेन यांनी ६५ टक्के, तर डॉ. कौशकचंद्र मल्लिक आणि तमिळनाडू येथील अर्जुन संपथ यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

ईश्‍वराचा हिंदुत्वनिष्ठांना आशीर्वाद !

प्रतिकूल परिस्थितीत धर्मशास्त्राची ज्योत तेवत ठेवण्याचे कार्य करणारे
बंगालमधील डॉ. शिवनारायण सेन यांनी गाठली ६५ टक्के आध्यात्मिक पातळी !

डॉ. शिवनारायण सेन (डावीकडे) यांचा सत्कार करतांना हिंदु जनजागृती समितीचे पूर्व भारत मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ

बंगालसारख्या प्रतिकूल परिस्थितीत धर्मशास्त्राची ज्योत तेवत ठेवण्याचे कार्य करणारे शास्त्रधर्म प्रचारसभेचे सचिव डॉ. शिवनारायण सेन यांनी ६५ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, असे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी हिंदू अधिवेशनात घोषित केले. वर्ष २०१५ मध्ये त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होती. सनातनचे संत पू. नीलेश सिंगबाळ यांच्या हस्ते श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन डॉ. सेन यांचा सन्मान करण्यात आला.

डॉ. शिवनारायण सेन यांच्याविषयी सांगतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे म्हणाले, डॉ. सेन लहानपणापासून साधना करत आहेत. शेतीमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. ते जिथे जिथे जातात, तिथे तिथे ते समाजाला तत्त्वनिष्ठेने धर्मशास्त्राच्या संदर्भातील दिशा देतात.

 

साम्यवादी आणि मुसलमान यांचे तुष्टीकरण होत असलेल्या परिसरात धर्मप्रसाराचे कार्य करणारे डॉ. कौशकचंद्र मल्लिक यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

डॉ. कौशकचंद्र मल्लिक (डावीकडे) यांचा सत्कार करतांना हिंदु जनजागृती समितीचे पूर्व भारत मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ

साम्यवादी आणि मुसलमान यांचे तुष्टीकरण होत असलेल्या पश्‍चिम बंगालसारख्या क्षेत्रात धर्मप्रसाराचे कार्य करणारे शास्त्रधर्म प्रचारसभेच्या टथचे उपसंपादक डॉ. कौशकचंद्र मल्लिक यांनी ६१ टक्के अध्यात्मिक पातळी गाठली आहे, असे सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी या वेळी घोषित केले. पू. नीलेश सिंगबाळ यांच्या हस्ते श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्याविषयी अधिक माहिती देतांना सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे म्हणाले, डॉ. कौशकचंद्र मल्लिक हे एक निष्णात शल्यचिकित्सक आहेत. इतरांसाठी काहीतरी करण्याची तळमळ असल्याने ते अनेकांना व्यावसायिक स्तरावर विनामूल्य उपचार देतात. त्यांचा इतिहासाचा गाढा अभ्यास असून युवकांसाठी सभा घेणे आणि त्यांच्यात जागृती करणे आदी कार्य ते तळमळीने करतात. धर्माप्रती तळमळ असल्यामुळे डॉ. कौशकचंद्र मल्लिक यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे.

 

‘धर्मो रक्षति: रक्षित:’ याची अनुभूती घेणारे हिंदुत्वनिष्ठ अर्जुन संपथ !

श्री. अर्जुन संपथ (डावीकडे) यांचा सत्कार करतांना कर्नाटकमधील सनातनचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा

हिंदू अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीच्या प्रथम सत्रात तमिळनाडू येथील हिंदूंच्या समस्या या विषयावर हिंदू मक्कल कत्छी, कोईमतूर, तमिळनाडू या संघटनेचे अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ यांनी उद्बोधन केले. त्यानंतर पू. उमा रविचंद्रन् यांनी श्री. संपथ यांची गुणवैशिष्ट्ये सांगून ते ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जीवनमुक्त झाल्याची घोषणा केली. कर्नाटकमधील सनातनचे धर्मप्रसारक पू. रमानंद गौडा यांच्या हस्ते त्यांचा भगवान शिवाची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

श्री. संपथ यांचे मनोगत

केवळ कुलदेवता आणि श्री गुरुदेव दत्त नामजप केल्यानेच मला शक्ती मिळाली. धर्मो रक्षति: रक्षित: या उक्तीप्रमाणे धर्मकार्य करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला; परंतु गुरुकृपेनेच या सर्व अडचणींवर मात करून धर्मप्रसाराचे कार्य करू शकलो.

 

धर्माविषयी तळमळ असलेले डॉ. शिवकुमार ओझा यांची आध्यात्मिक पातळी ६२ टक्क्यांवरून ६५ टक्के झाली ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

हिंदु धर्माचा प्रसार जलदगतीने होणे आवश्यक : डॉ. शिवकुमार ओझा

डॉ. शिवकुमार ओझा, हिंदु धर्माचे अभ्यासक आणि संशोधक

डॉ. शिवकुमार ओझा यांनी ध्वनीचित्रफितीद्वारे व्यक्त केलेले मनोगत

हिंदु धर्माचा प्रसार ज्या गतीने होणे आवश्यक आहे, त्या गतीने तो होत नाही. त्यामुळे हिंदु धर्माचा प्रसार जलदगतीने होणे आवश्यक आहे. त्यासाठी मी ‘भारतीय संस्कृती – महान अन् विलक्षण’ या ग्रंथातून बुद्धीला समजणारी आणि बुद्धीअगम्य अशा भारतीय संस्कृतीचा परिचय करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

धर्माविषयी तळमळ असलेले डॉ. शिवकुमार ओझा यांची आध्यात्मिक पातळी ६२ टक्क्यांवरून ६५ टक्के झाली ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी डॉ. शिवकुमार ओझा यांची गुणवैशिष्ट्ये सांगितली. त्या वेळी सद्गुरु (डॉ.) पिंगळेे म्हणाले, ‘‘डॉ. ओझा हे धर्मसंशोधक आहेत. त्यांच्यामध्ये हिंदु धर्माविषयी तळमळ आहे. त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे ज्ञानाचे भांडार आहेत. त्यांच्यातील धर्माविषयीच्या तळमळीमुळे त्यांची आध्यात्मिक पातळी गेल्या वर्षी ६२ टक्के होती, आता ती ६५ टक्के झाली आहे, असे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी घोषित केले आहे. डॉ. ओझा यांनी धर्मासाठी दिलेल्या योगदानाविषयी हिंदू अधिवेशन कृतज्ञ आहे.’’

हिंदु धर्मातील सिद्धांताविषयी संशोधन करणारे डॉ. शिवकुमार ओझा यांनी लिहिलेल्या १० ग्रंथांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

अधिवेशनामध्ये हिंदु धर्माचे संशोधक डॉ. शिवकुमार ओझा यांनी हिंदु धर्मावर लिहिलेल्या हिंदी भाषेतील ८ आणि इंग्रजी भाषेतील २, अशा एकूण १० विविध ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. हे प्रकाशन साध्वी रेखा बहनजी, लोकेंद्रसिंह कालवी, ह.भ.प. श्याम महाराज राठोड, ह.भ.प. अभय महाराज सहस्रबुद्धे, सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

Leave a Comment