प्रार्थनेमुळे होणारे लाभ

‘देव किंवा गुरु यांना शरण जाऊन इच्छित गोष्ट प्रकर्षाने याचना करून मागणे, म्हणजे प्रार्थना. मनापासून केलेल्या प्रार्थनेमुळे देव किंवा गुरु यांचा कृपाशीर्वाद सत्वर लाभतो.

उषःकाली प्रार्थनेच्या किल्लीने दिवसाचे दार उघडावे आणि रात्री प्रार्थनेची कडी घालून ते बंद करावे, असे सुवचन आहे. दैनंदिन धकाधकीच्या जीवनात आपण मनःशांती हरवून बसतो. ती मनःशांती प्रार्थनेमुळे मिळते. अशक्य गोष्टी शक्य वाटतात; कारण प्रार्थनेमुळे श्रद्धेचे बळ आणि ईश्‍वराचा आशीर्वाद लाभतो. प्रार्थनेचे महत्त्व वैज्ञानिकांनीही मान्य केले आहे. प्रार्थनांचा आरोग्यावर सुपरिणाम होतो, असे जपानी वैज्ञानिक डॉ. मासारू इमोटो म्हणतात.

 

प्रार्थनेमुळे होणारे लाभ

१. चिंता न्यून होऊन देवावरील श्रद्धा वाढते.

२. अशक्यप्राय गोष्ट शक्य होते.

३. साधनेतील अडथळे न्यून होतात.

४. अहंमध्ये लवकर घट होते.

५. आसुरी शक्‍तींपासून रक्षण होते.

 

विद्यार्थ्यांनी करावयाच्या प्रार्थना

अभ्यासाच्या आधी प्रार्थना करतांना

अभ्यासाच्या आधी प्रार्थना करतांना

१. कुलदेवता

‘तुझ्या कृपेने मला तुझ्या नामजपाचे सतत स्मरण राहू दे आणि तुझी कृपा माझ्यावर सदैव राहू दे.’

२. श्री गणपति

‘तू विघ्नहर्ता आणि बुद्धीदाता आहेस. माझ्या अभ्यासात येणार्‍या सर्व अडथळ्यांचे तुझ्या कृपेने निवारण होऊ दे. माझा अभ्यास चांगला होण्यासाठी मला सुबुद्धी दे.’

३. श्री सरस्वतीदेवी

‘तू विद्येची देवता आहेस. त्यामुळे अभ्यासासाठी तूच मला योग्य ते मार्गदर्शन कर.’

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘भावजागृतीसाठी साधना’

Leave a Comment