हिंदुत्वनिष्ठांसाठी कार्यशाळा, हिंदु अधिवेशने इत्यादींचे आयोजन !
केवळ हिंदूसंघटन करणारी विचारधाराच देश आणि धर्म यांचे रक्षण अन् हिंदु राष्ट्राची स्थापना करू शकते, हे जाणून विविध हिंदु संघटना, संप्रदाय, अधिवक्ते (वकील), विचारवंत आदींना दिशादर्शन करण्यासाठी आश्रमात कार्यशाळा, अधिवेशने इत्यादींचे आयोजन केले जाते.
हिंदु राष्ट्राच्या विचारांचे वक्ते-प्रवक्ते सिद्ध करणारे सनातन अध्ययन केंद्र !
आश्रमातील या केंद्राद्वारे प्रसारमाध्यमांमध्ये हिंदु धर्माची बाजू माडंण्यासाठी हिंदुत्त्वनिष्ठांना वैचारिक साहाय्य केले जाते. या केंद्राच्या वक्ता प्रशिक्षण कार्यशाळांद्वारे प्रशिक्षित झालेल्या या ४० हून अधिक वक्त्यांनी दूरचित्रवाहिन्यांवरील १०० हून अधिक चर्चासत्रांत हिंदु धर्माची बाजू प्रभावीपणे मांडली आहे.